
Iran Protest
गेल्या ४८ तासांत सुरक्षा दलांकडून आंदोलकांवर भीषण गोळीबार झाला आहे. यामुळे राजधानी तेहरानसह देशातील अनेक शहरांमध्ये प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. संपूर्ण देशात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेईंनी आंदोलकांना चिरडण्यासाठी आक्रमक कारवाईचे आदेश दिले आहेत. यामुळे सुरक्षा दलांनी निदर्शनकर्त्यांवर थेट गोळीबारा केल्याचा आरोप केला जात आहे. या गोळीबारानंतर रस्त्यांवर मृतदेह पडलेले दिसत आहेत. तसेच रुग्णालयातांमध्ये मोठ्या प्रमाणावर मृतहेद आणले जात आहेत. परंतु ते मृतहेद ठेवण्यास जागा नसल्याचे व्हिडिओंमध्ये स्पष्ट दिसत आहे.
गेल्या अनेक आठवड्यांपासून हे आंदोलन सुरु आहे. देशभरात इंटरनेट सुविधा ठप्प झाल्या आहेत. यामुळे या घटनांची सध्या अधिकृत पुष्टी झालेली नाही. परंतु आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तांनुसार आणि मानवाधिका संघटनांच्या माहितीनुसार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. इराणच्या, तेहरान, कराड, फर्दिस, रश्त, इलाम आणि करमानशाह यांसारख्या शहरांमध्ये तीव्र हिंसाचार सुरु आहे. आंदोलांवर दडपशाहीचा प्रयत्न केला जात असल्याचे वृत्त मिळाले आहे.
Islamic Republic security forces firing on Iranian protesters during January 2026 protests#IranProtests pic.twitter.com/ROqSKlP6Lw — حافظه تاریخی (@hafezeh_tarikhi) January 10, 2026
दरम्यान इराणच्या खामेनेई सराकने या आंदोलनामागे परकीय शक्तींचा हात असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी कोणत्या त्याच्या देशात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप किंवा तोडफोड, अस्थिरता निर्माण करणे सहन केले जाणार नसल्याचा इशाराही दिला आहे. परंतु मीडिया रिपोर्टनुसार, इराणमधील वाढत्या महागाईमुळे हे आंदोलन पेटले आहे. या आंदोलनात लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे निषेध केला आहे. काहींनी खानेईंच्या फोटोला आग लावून सिगारेट पेटवली आहे. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
🚨
These videos are circulating with the caption: “Families arriving to identify their loved ones’ bodies at Kahrizak morgue/forensic medicine #Tehran“#IranProtests pic.twitter.com/xn7tty9iRS — لُمپن 🔆 (@L0mpan) January 11, 2026
Ans: इराणमध्ये वाढती महागाई, आर्थिक संकेट आणि खामेनेई राडवटीविरोधात असंतोषामुळे तीव्र आंदोलने सुरु आहेत.
Ans: मीडिया रिपोर्टनुसार, खामेनेईंनी सुरक्षा दलांना निदर्शनकर्त्यांना चिरडण्यासाठी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
Ans: इराणमदील आंदोलनात २००० लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे.