Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिसाईल, ड्रोन आणि क्रूझ… UAE वर तुटून पडला इराण! ५०० हून अधिक शस्त्रांस्त्रांचा अबू धाबीवर वर्षाव; विध्वसंक VIDEO

Iran UAE attack : खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणने आक्रमक पवित्रा घेतला आहे. इस्रायल-अमेरिका विरोधात हल्ले सुरु असून शेजारील अरब देशांमध्येही हल्ले करत आहे. यूएईवर आतापर्यंत तब्बल ७०८ ड्रोन अन् मिसाइल्स डागले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 02, 2026 | 09:30 AM
Iran UAE attack

Iran UAE attack

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणचा यूएईवर घातक प्रहार
  • मिसाईल्स, ड्रोन अन् क्रूझ क्षेपणास्त्रांचा मारा
  • यूएईवर जखमी वाघासारखा तुटून पडला इराण
Israel Iran War : मध्यपूर्वेतील युद्ध आता एका भीषण टप्प्यावर येऊन पोहचले आहे. इराण-इस्रायल युद्धा (Iran Israel War) त इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांच्या मृत्यूमुळे इतर अरब देशांमध्येही प्रादेशिक अस्थिरता निर्माण झाला आहे.  इराणने थेट संयुक्त अरब अमिराती (UAE) वर हल्ला केला आहे.  या हल्ल्याचा भीषण व्हिडिओही समोर आला असून इराणने ७०० हून अधिक मिसाइल्सचा वर्षावर अबू धाबीवर केला आहे. यूएई दुबई आणि अबू धाबी सारख्या मोठ्या आणि प्रमुख शहरांवर इराणने हल्ले केले आहेत. तसेच आज सकाळी देखील पुन्हा हल्ला करण्यात आला आहे.

US Iran Conflict : ‘मृत्यूसाठी तयार रहा…’ ; ट्रम्प यांनी इराणच्या सैन्याला पुन्हा धमकावले; दिला आत्मसमर्पण करण्याचा इशारा

जखमी वाघासारखा यूएईवर तुटून पडला इराण

मिळालेल्या माहितीनुसार, इराणने २८ फेब्रुवारी २०२६ पासून आतापर्यंत तब्बल ७०८ शस्त्रांस्त्रे युएईवर डागली आहेत. यामध्ये १६५ बॅलेस्टिक मिसाइल्स, ५४१ ड्रोन आणि दोन क्रूझ मिसाइल्सचा समावेश आहेत. या हल्ल्याने संपूर्ण यूएईमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराण डागलेल्या बॅलेस्टिक मिसाइल्स एअर डिफेन्स सिस्टमुळे हवेतच नष्ट करण्यात आली आहेत. तर काही मिसाइल्स थे समुद्रात पडली आहेत. यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. इराणची क्रूझ मिसाइल्सही नष्ट करण्यात आली आहेत.

५४१ ड्रोन्स विध्वसंक मारा

याशिवाय इराणने ५४१ ड्रोन्सद्वारे यूएईवर भीषण हल्ला केला आहे. यातीन ५०६ ड्रोन्स यूएईच्या सुरक्षा दलांना हाणून पाडली आहेत. तर ३५ ड्रोन्स देशाच्या हद्दीत कोसळी आहे. या ड्रोन हल्ल्यात एका इमारतीचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

आज पुन्हा हल्ला

याशिवाय इराणने आज, सोमवारी (०२ मार्च) पुन्हा एकदा यूएईवर २० बॅलेस्टिक मिसाइल्स, २ क्रूझ मिसाइल्स आणि ३११ ड्रोन्स मारा केला आहे, परंतु यूएइच्या संरक्षण दलाने हे सर्व हल्ले हाणून पाडले आहेत. या हल्ल्यांमध्ये नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे.

दुबईवर हल्ला

दुबई (Dubai) मध्ये इराणने आंतरराष्ट्रीय विमानताळावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात विमानतळावरील ४ कर्मचारी जखमी झाले आहेत. याशिवाय पाम पाम जुमेराह येथेही इराणने केलेल्या हल्ल्यात ४ जखमी झाले होते. तसेच या हल्ल्यामुळे दुबईच्या बुर्ज अल अरब मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.

UAE सरकारची प्रतिक्रीया

यूएईने स्पष्ट केले आहे की, देशाचे हवाई दल आणि संरक्षण दल बाह्य संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. नागरिकांची आणि पर्यटकांची सुरक्षा आमचे प्राधान्य असेल असे यूएईच्या सरकारने म्हटले आहे. सरकाने जनतेला अधिकृत स्त्रोतांकडून येणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवण्यास सांगितले आहे.  याच वेळी इराणने केलेल्या हल्ल्याचाही यूएईने तीव्र निषेध नोंदवला आहे.

Iranian Shahed 136 drones hitting the French naval base in Abu Dhabi. pic.twitter.com/7mghknom9S — WarMonitor🇺🇦🇬🇧 (@WarMonitor3) March 1, 2026


Iran Israel युद्धात दुबईचा बळी! अमेरिकेन सैन्य नसतानाही दुबईला का केलं लक्ष्य? धक्कादायक कारण उघडकीस

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने युएईवर किती हल्ले केले आहेत?

    Ans: इराणने यूएईवर २८ फेब्रुवारी २०२६ पासून १६५ बॅलेस्टिक मिसाइल्स, ५४१ ड्रोन आणि दोन क्रूझ मिसाइल्स डागली आहेत.

  • Que: यूएईने इराणी हल्ल्यावर कासा प्रतिसाद दिला आहे?

    Ans: यूएईने इराणचे बहुतांश हल्ले हाणून पाडले आहे, ड्रोन आणि मिसाइल्स नष्ट केल्या आहेत.

Web Title: Iran strikes uae with missiles drones and cruises missiles devastating video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 09:28 AM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • Iran Israel Conflict
  • Iran News
  • Israel Iran war
  • World news
  • World War

संबंधित बातम्या

Global Peace: मोदी माझे बेस्ट फ्रेंड! ट्रम्पच्या एका कॉलने क्षणात बदलले चित्र; संवादानंतर ‘या’ मोठ्या निर्णयांवर शिक्कामोर्तब
1

Global Peace: मोदी माझे बेस्ट फ्रेंड! ट्रम्पच्या एका कॉलने क्षणात बदलले चित्र; संवादानंतर ‘या’ मोठ्या निर्णयांवर शिक्कामोर्तब

Nuclear Uranium: जागतिक राजकारणात महास्फोट! इराणने अमेरिकेसमोर टेकले गुडघे? ट्रम्प यांच्या ‘युरेनियम’ सोपवण्याच्या वृत्ताने खळबळ
2

Nuclear Uranium: जागतिक राजकारणात महास्फोट! इराणने अमेरिकेसमोर टेकले गुडघे? ट्रम्प यांच्या ‘युरेनियम’ सोपवण्याच्या वृत्ताने खळबळ

डोनाल्ड ट्रंपनंतर आता इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना केला फोन; दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?
3

डोनाल्ड ट्रंपनंतर आता इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना केला फोन; दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

Trump vs Pope Leo XIV: एका बाजूला संविधान, तर दुसरीकडे बायबलचे नियम; अमेरिका आणि व्हॅटिकनमध्ये ऐतिहासिक ‘कोल्ड वॉर’
4

Trump vs Pope Leo XIV: एका बाजूला संविधान, तर दुसरीकडे बायबलचे नियम; अमेरिका आणि व्हॅटिकनमध्ये ऐतिहासिक ‘कोल्ड वॉर’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.