Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War 3: मध्य-पूर्वेत महायुद्धाची नांदी! इस्रायलने इराणचा पेट्रोकेमिकल प्लांट उडवला, 5 ठार; इराणचा कुवैतवर ड्रोन हल्ला

Iran-Israel War: इस्रायलने इराणच्या पेट्रोकेमिकल क्षेत्रावर केलेल्या हल्ल्यानंतर, इराणने कुवैती वीज प्रकल्पावर ड्रोन हल्ला करून प्रत्युत्तर दिले आहे, त्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 05, 2026 | 11:08 AM
israel attacks iran petrochemical plant trump ultimatum iran kuwait drone strike 2026

israel attacks iran petrochemical plant trump ultimatum iran kuwait drone strike 2026

Follow Us
Follow Us:
  • इस्रायलचा भीषण हल्ला
  • इराणचा प्रतिहल्ला
  • ट्रम्प यांचा इशारा

Israel attack on Iran petrochemical plant : मध्य-पूर्वेतील तणाव (US-Israel Iran War) आता अशा स्तरावर पोहोचला आहे जिथून परत फिरणे अशक्य दिसत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील ‘कोल्ड वॉर’ आता थेट संघर्षात रूपांतरित झाले आहे. गेल्या काही तासांत झालेल्या घडामोडींनी जागतिक राजकारणात भूकंप आणला असून, कच्च्या तेलाच्या किमती आणि जागतिक सुरक्षेवर याचे गंभीर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

इस्रायलचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ आणि जीवितहानी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या कडक इशाऱ्यानंतर इस्रायलने मोठी लष्करी कारवाई केली आहे. इस्रायली हवाई दलाने इराणच्या सर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या पेट्रोकेमिकल क्षेत्राला लक्ष्य केले. या भीषण हल्ल्यात किमान ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या पेट्रोकेमिकल प्लांटचे नेमके किती नुकसान झाले आहे, याची आकडेवारी इराणी सरकारने अद्याप लपवून ठेवली असली, तरी उपग्रहाद्वारे मिळालेल्या फोटूंनुसार तिथे मोठी पडझड झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Update: इराणचे नेतृत्व संपवले! डोनाल्ड ट्रम्प यांची स्फोटक पोस्ट; पाहा इराणवर अमेरिकेच्या हल्ल्याचा भयानक VIDEO

इराणचा ‘कुवैत’वर पलटवार: दोन वीज प्रकल्प ठप्प

इस्रायलच्या या कारवाईनंतर इराण गप्प बसला नाही. त्यांनी थेट अमेरिकेचा मित्र असलेल्या कुवैतवर निशाणा साधला. इराणने पाठवलेल्या आत्मघाती ड्रोननी कुवैतमधील दोन महत्त्वाच्या वीज निर्मिती आणि जलशुद्धीकरण प्रकल्पांना धडक दिली. कुवैतच्या ऊर्जा मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला असून, या हल्ल्यामुळे दोन वीज निर्मिती युनिट्स पूर्णपणे बंद पडली आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे संपूर्ण कुवेतमधला वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. इराणने याद्वारे संदेश दिला आहे की, जर त्यांच्यावर हल्ला झाला तर ते अमेरिकेच्या समर्थकांसाठीही धोक्याची घंटा ठरतील.

PM confirms: “Israeli forces have destroyed petrochemical plants in Iran” Prime Minister Benjamin Netanyahu announced that Israel struck Iranian petrochemical plants, escalating the campaign against Tehran’s industrial infrastructure. “I promised you we would continue to pound… pic.twitter.com/1g6yXajQ7y — C14 News Israel | EN (@c14israel) April 4, 2026

credit – social media and Twitter

डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘ट्रुथ सोशल’वर धमाका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या आक्रमक शैलीत इराणला थेट इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत म्हटले की, “वेळ संपत चालली आहे.” त्यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) खुली करण्यासाठी फक्त ४८ तासांचा अवधी दिला आहे. जर या काळात इराणने माघार घेतली नाही, तर इराणमधील प्रत्येक वीज प्रकल्प आणि पायाभूत सुविधा अमेरिकन हल्ल्यात नष्ट केली जाईल, असा अल्टिमेटम त्यांनी दिला आहे. २१ मार्चपासून सुरू असलेल्या या तणावात ट्रम्प यांनी अनेकवेळा मुदत वाढवून दिली होती, मात्र आता ते ‘आरपार’च्या लढाईच्या मूडमध्ये दिसत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Lawrence Bishnoi: ‘घरात घुसून कपाळात….’ लॉरेन्स बिश्नोई टोळीची पोस्ट VIRAL; कॅनडातील हल्ल्याची स्वीकारली जबाबदारी

इराणी कमांडरचा ‘विध्वंसक’ इशारा

ट्रम्प यांच्या या धमकीला इराणचे सर्वोच्च कमांडर अली अब्दुल्लाही यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्याला “हताश आणि मूर्खपणाची” कृती संबोधले. अब्दुल्लाही यांनी इशारा दिला की, “जर आमच्या एकाही पायाभूत सुविधेला धक्का लागला, तर पश्चिम आशियातील (Middle East) एकही अमेरिकन लष्करी तळ सुरक्षित राहणार नाही. आम्ही सातत्यपूर्ण आणि विध्वंसक हल्ले करून आक्रमकांना त्यांची जागा दाखवून देऊ.”

Web Title: Israel attacks iran petrochemical plant trump ultimatum iran kuwait drone strike 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • iran
  • Israel
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी
1

Flydubai FZ1073 : तेल अवीवमध्ये विमान पाडण्याचा होता कट; जाणून घ्या फ्लायदुबई विमानाच्या 30 सेकंदांच्या थराराची संपूर्ण कहाणी

Strait Of Hormuz: होर्मुझमध्ये इराणी लष्कराचा टँकर्सवर हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अशा’ दाव्यानंतर मध्यपूर्वेत पुन्हा भडका
2

Strait Of Hormuz: होर्मुझमध्ये इराणी लष्कराचा टँकर्सवर हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अशा’ दाव्यानंतर मध्यपूर्वेत पुन्हा भडका

World News :सोमालियाचा इशारा; इस्रायलशिवाय कोणत्याही देशाने सोमालीलँडला मान्यता दिलेली नाही, राष्ट्राध्यक्षांचा दावा
3

World News :सोमालियाचा इशारा; इस्रायलशिवाय कोणत्याही देशाने सोमालीलँडला मान्यता दिलेली नाही, राष्ट्राध्यक्षांचा दावा

Flydubai Flight 1073 : फ्लायदुबई विमान पाडण्याचा प्रयत्न दहशतवाद?; तपासाला राजकीय कृत्याची दिशा
4

Flydubai Flight 1073 : फ्लायदुबई विमान पाडण्याचा प्रयत्न दहशतवाद?; तपासाला राजकीय कृत्याची दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.