Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel : 10 दिवसांच्या वेढ्यानंतर हेब्रॉनमधून इस्रायली सैन्य माघारी; कोट्यवधींचे नुकसान; पॅलेस्टिनी सुरक्षा दलाचे पूर्ण नियंत्रण

Israel : दहा दिवसांहून अधिक काळ चाललेल्या लष्करी कारवाईनंतर इस्रायली सैन्याने हेब्रॉन शहरातून माघार घेतली आहे. आता पॅलेस्टिनी सुरक्षा दलांनी या भागावर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 02, 2026 | 02:33 PM
Israeli forces withdraw Hebron West Bank Hebron News Marathi

Israeli forces withdraw Hebron West Bank Hebron News Marathi

Follow Us
Follow Us:
  • हेब्रॉनमधून इस्रायली सैन्य माघारी
  • अब्जावधींचे प्रचंड आर्थिक व भौतिक नुकसान
  • शिक्षणाला फटका व राजकीय सावट

मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर वेस्ट बँकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. सलग १० दिवसांहून अधिक काळ चाललेल्या कठोर लष्करी वेढा आणि धडक कारवाईनंतर इस्रायली सैन्याने (IDF) हेब्रॉन शहरातून आपली माघार घेतली आहे. हेब्रॉनचे गव्हर्नर खालेद दुदिन यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, इस्रायली सैन्याने (Israel) संपूर्ण शहरातून माघार घेतली असून आता या भागावर पॅलेस्टिनी सुरक्षा दलांनी पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. या माघारीनंतर वेढ्यामुळे घरे सोडण्यास भाग पडलेल्या शेकडो पॅलेस्टिनी कुटुंबांना आता आपापल्या घरी परतण्याची परवानगी देण्यात आली आहे.

२३ ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्रायली सैन्याचा हेब्रॉनला वेढा

मिळालेल्या माहितीनुसार, २३ ऑक्टोबर रोजी हेब्रॉन शहराजवळ झालेल्या एका भीषण हल्ल्यानंतर इस्रायली दलाने या संपूर्ण परिसराला वेढा घातला होता. या हल्ल्यामध्ये इस्रायल डिफेन्स फोर्सेसचे (IDF) दोन सैनिक मारले गेले होते. या घटनेचा शोध घेण्यासाठी आणि लष्करी कारवाईच्या नावाखाली इस्रायली सैन्याने १० दिवस शहराची रस्तेबंदी केली होती.

स्थानिक नगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, या १० दिवसांच्या लष्करी कारवाईमुळे ३,३०० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांवर थेट परिणाम झाला. कित्येक कुटुंबांना आपली हसती-खेळती घरे सोडून सुरक्षित स्थळी पळून जावे लागले. या काळात अनेक घरे उद्ध्वस्त झाली आणि स्थानिक उद्योग-व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal News: 15 सुरक्षा रक्षकांचा पहारा अन् 4 मीटरचा बोगदा; नेपाळच्या तुरुंगातून 8 कैदी सिनेमा स्टाईलने फरार

 दररोज ३.८ दशलक्ष डॉलर्सचे आर्थिक नुकसान; पायाभूत सुविधा उद्ध्वस्त

हेब्रॉनचे महापौर युसूफ अल-जबारी यांनी ‘अल जझीरा’शी बोलताना या वेढ्यामुळे झालेल्या भीषण नुकसानीचा सविस्तर पाढा वाचला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या १० दिवसांच्या काळात शहराला दररोज १२ दशलक्ष शेकेल म्हणजेच सुमारे ३.८ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आर्थिक फटका बसला आहे.

 विविध क्षेत्रांना बसलेला फटका:

  • पायाभूत सुविधांचे नुकसान: शहरातील रस्ते, पाणी आणि वीज व्यवस्था यांसारख्या मूलभूत पायाभूत सुविधांचे $१.९ दशलक्ष (१९ लाख डॉलर्स) पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
  • आरोग्य व पर्यावरण: लष्करी कारवाईमुळे आरोग्य यंत्रणा आणि पर्यावरणाला अंदाजे $१६०,००० चा मोठा फटका बसला आहे.
  • इमारती व व्यवसाय: इस्रायली दलाने १५ घरे आणि इतर महत्त्वाची बांधकामे पाडली, तर ३२७ व्यवसाय आणि दुकाने सक्तीने बंद पाडली.

 मुलांच्या शिक्षणावर परिणाम आणि पॅलेस्टिनी अर्थव्यवस्थेचा कणा

या लष्करी वेढ्याचा सर्वात गंभीर परिणाम स्थानिक विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर झाला आहे. महापौर अल-जबारी यांनी स्पष्ट केले की, सततच्या कारवाईमुळे आणि बंदीमुळे सुमारे ८०,००० विद्यार्थी सलग १० दिवस शाळेत जाऊ शकले नाहीत, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणात मोठा खंड पडला आहे.

पॅलेस्टाईनच्या एकूण अर्थव्यवस्थेत एकट्या हेब्रॉन शहराचा वाटा तब्बल ४० टक्के इतका मानला जातो. हेब्रॉन हे औद्योगिक आणि व्यापारी केंद्र असल्याने या शहराला १० दिवस रोखून धरणे म्हणजे एका प्रकारे सामूहिक शिक्षा देण्यासारखेच होते, असा गंभीर आरोप महापौरांनी केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : DGCA : विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी! मनमानी भाडेवाढीविरोधात सरकारचा मोठा निर्णय; विशेष परिस्थितीत हस्तक्षेपाचे नवे अधिकार

इस्रायलमधील राजकीय उलथापालथ आणि आगामी शपथविधी

एकडे वेस्ट बँकेत तणावाची परिस्थिती असताना दुसरीकडे इस्रायलच्या अंतर्गत राजकारणातही मोठ्या घडामोडी घडत आहेत. इस्रायलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. या निकालांमध्ये सत्ताधारी आघाडीला ५३ जागांवर समाधान मानावे लागले आहे, तर विरोधी पक्षाने ६७ जागांवर विजय मिळवला आहे.

तथापि, विरोधी गटातील ६७ जागांमध्ये झिओनिस्ट पक्षांच्या ४८ जागा आणि अरब गैर-झिओनिस्ट पक्षांच्या १९ जागांचा समावेश आहे. त्यामुळे विरोधी आघाडीत परस्परविरोधी विचारसरणीचे पक्ष एकत्र असल्याने सरकार स्थापनेत मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित क्नेसेटचा (इस्रायली संसद) अधिकृत शपथविधी सोहळा १० नोव्हेंबर रोजी पार पडणार असून, त्यानंतर इस्रायलच्या नवीन राजकीय दिशेचे चित्र स्पष्ट होईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इस्रायली सैन्याने हेब्रॉनमधून माघार का घेतली?

    Ans: १० दिवसांहून अधिक काळ चाललेल्या लष्करी कारवाई आणि शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतर इस्रायली सैन्याने माघार घेतली असून आता पॅलेस्टिनी दलांनी नियंत्रण मिळवले आहे.

  • Que: हेब्रॉन वेढ्यामुळे किती आर्थिक नुकसान झाले आहे?

    Ans: शहराचे महापौर युसूफ अल-जबारी यांच्या मते, या १० दिवसांच्या वेढ्यामुळे दररोज ३.८ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले आहे.

  • Que: इस्रायली संसदेचा (क्नेसेट) शपथविधी कधी होणार आहे?

    Ans: नुकत्याच झालेल्या इस्रायली निवडणुकीनंतर नवनिर्वाचित क्नेसेटचा शपथविधी सोहळा १० नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Web Title: Israel forces withdraw from hebron west bank damage hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • Israel
  • Israel Hamas War
  • World news

संबंधित बातम्या

Moon Reactor : चंद्रावर महासत्तांची नवी लढाई; जाणून घ्या अणुभट्ट्या बसवण्यामागे काय आहे मोठे कारण?
1

Moon Reactor : चंद्रावर महासत्तांची नवी लढाई; जाणून घ्या अणुभट्ट्या बसवण्यामागे काय आहे मोठे कारण?

Israel Elections: इस्रायलच्या राजकारणात ट्विस्ट! ‘वोटचोरी’चा आरोप असलेल्यांना सोडले; निवडणूक आयोगाने जारी केले एक निवेदन
2

Israel Elections: इस्रायलच्या राजकारणात ट्विस्ट! ‘वोटचोरी’चा आरोप असलेल्यांना सोडले; निवडणूक आयोगाने जारी केले एक निवेदन

India EU: भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारावर ब्रुसेल्समध्ये महत्त्वाचे मंथन; भारतीय निर्यातीला मिळणार मोठे प्रोत्साहन
3

India EU: भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारावर ब्रुसेल्समध्ये महत्त्वाचे मंथन; भारतीय निर्यातीला मिळणार मोठे प्रोत्साहन

Strait Of Hormuz: सौदी-इराण वादाची किनार; इराण जलक्षेत्रातून जाणाऱ्या दोन तेलवाहू जहाजांमध्ये भूसुरुंगाला धडकून भीषण स्फोट
4

Strait Of Hormuz: सौदी-इराण वादाची किनार; इराण जलक्षेत्रातून जाणाऱ्या दोन तेलवाहू जहाजांमध्ये भूसुरुंगाला धडकून भीषण स्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.