Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel-Hamas War: हमास कमांडर अब्द अल-हादी ड्रोन हल्ल्यात ठार; इस्त्रायल लष्कराचा दावा

इस्त्रायल-हमास युद्ध सुरुच आहे. इस्त्रायल संरक्षण दलाने दावा केला आहे की, अलीकडे हमासवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात हमासच्या नुखबा प्लाटून कमांडर अब्द अल-हादी सबा याला ठार करण्यात आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 01, 2025 | 02:30 PM
Israel-Hamas War: हमासचा कमांडर अब्द अल-हादी ड्रोन हल्ल्यात ठार; इस्त्रायल लष्कराचा दावा

Israel-Hamas War: हमासचा कमांडर अब्द अल-हादी ड्रोन हल्ल्यात ठार; इस्त्रायल लष्कराचा दावा

Follow Us
Close
Follow Us:

जेरुसेलम: सध्या-इस्त्रायल हमास युद्ध सुरुच आहे. दरम्यान एक मोठा दावा इस्त्रायलने केला आहे. इस्त्रायल संरक्षण दलाने पुष्टी केली की, अलीकडे हमासवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात हमासच्या नुखबा प्लाटून कमांडर अब्द अल-हादी सबा याला ठार करण्यात आले आहे. IDF ने दिलेल्या माहितीनुसार, सबा हा 7 ऑक्टोबर 2023 रोजी किबुत्ज नीर ओजवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता. इस्रायली सैन्याने म्हटले आहे की, अब्द अल-हादी सबा दक्षिण गाझातील खान युनिस परिसरात लपलेल्या ठिकाणावर असताना त्याला ठार करण्यात आले.

दहशतवाद्यांचा खात्मा 

IDF ने म्हटले आहे की, गुप्त सूत्रधाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे ऑपरेशन करण्यात आले होते. पश्चिमी खान युनिस बटालियनच्या नुखबा प्लाटून कमांडर सबा याने किबुत्ज नीर ओजवरील हल्ल्यामध्ये घुसखोरांचे नेतृत्व केले होते. या योजनेला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी IDF आणि इस्रायली सुरक्षा एजन्सी (ISA) ने एकत्रितपणे काम केले आणि अल-हादी सबा याचा खात्मा केला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- चक्क 16 वेळा सुर्योदय अन् सुर्यास्त; सुनिता विल्यम्सने शेअर केला नववर्षाचा खास अनुभव

यापूर्वी, IDF ने शिन बेटसह संयुक्त ऑपरेशनमध्ये 14 हमास दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला होता. यापैकी 6 दहशतवाद्यांचा 7 ऑक्टोबर 2023 च्या हल्ल्यात सहभाग होता. 162व्या स्टील डिव्हिजनने गाझा पट्टीत जबालिया आणि बेट लाहिया परिसरात विशेष मोहीम राबवली, यामध्ये हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांना इस्त्रायलने ठार केल्याचे म्हटले आहे.

2023 पासून युद्धाला सुरुवात

7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर मोठा दहशतवादी हल्ला केला होता, ज्यामध्ये 1,200 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आणि 250 हून अधिक लोकांना बंदिवासात ठेवले गेले. सध्या 100 हून अधिक लोक अजूनही हमासच्या कैदेत आहेत, ज्यांपैकी अनेकांच्या मृत्यूची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझा पट्टीत हमासच्या तळांवर जोरदार हल्ले केले आणि इस्त्रायल हमास युद्धाला सुरूवात झाली.

मात्र, या प्रतिसादात्मक कारवाईमुळे गाझामध्ये मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे, यामध्ये 45,000 हून अधिक पॅलेस्टिनी मृत्युमुखी पडले असून अनेकजण जखमी झाले आहेत. या परिस्थितीमुळे जागतिक पातळीवर चिंता वाढली आहे आणि युद्धबंदीची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, यमनमधील हूती बंडखोर आणि लेबनानमधील हिजबुल्लाहने, ज्यांना इराणच्या पाठिंब्याने चालणारे गट मानले जाते, इस्रायलविरुद्धचे हल्ले तीव्र केले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- नवीन वर्ष सुरु होताच जस्टिन ट्रुडोंचे बदलले तेवर; डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा म्हणाले…

Web Title: Israel hamas war idf claims that hamas commander abd al hadi killed in recent drone strike nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 02:03 PM

Topics:  

  • Hamas
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी
2

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
3

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
4

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.