Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Pakistan War: ‘जगाचा पाकिस्तानवर विश्वास उरला नाही, भारत तेव्हाच…’; खुद्द पाकिस्तानी तज्ज्ञानेच उघड केली पोलखोल

India Pakistan War: भारताने पाकिस्तानला शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात संवाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पाकिस्तानी तज्ज्ञांच्या मते, भारताला पाकिस्तानसोबत वाटाघाटी करण्यात कोणताही रस नाही.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 29, 2026 | 03:20 PM
India Pakistan SCO Meeting News Shakil Chaudhary Arzoo Kazmi Interview

India Pakistan SCO Meeting News Shakil Chaudhary Arzoo Kazmi Interview

Follow Us
Follow Us:
  • भारत-पाक चर्चेवर पाकिस्तानी तज्ज्ञाचे भाष्य
  • भारताचे लक्ष विकासावर
  • जागतिक पातळीवर पाकिस्तानची नाचक्की

भारत आणि पाकिस्तान (India Pakistan War) यांच्यातील संबंधांमध्ये सध्या पुन्हा एकदा मोठी चर्चा रंगली आहे. भारताने शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) आगामी ‘सिव्हिलायझेशनल डायलॉग फोरम’ या बैठकीसाठी पाकिस्तानला अधिकृत आमंत्रण दिले आहे. भारताने एससीओच्या सर्वच सदस्य देशांना या बैठकीत सहभागी होण्याचे आवाहन केले असून पाकिस्तानही या संघटनेचा एक भाग असल्यामुळे त्याला हे निमंत्रण मिळाले आहे. या निमंत्रणामुळे दोन्ही देशांमधील तुटलेला संवाद पुन्हा सुरू होणार का, याबद्दल राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, या सगळ्या चर्चांवर एका पाकिस्तानी तज्ज्ञानेच मोठे भाष्य करत पाकिस्तानचे पितळ उघडे पाडले आहे.

प्रसिद्ध पाकिस्तानी पत्रकार अर्झू काझमी यांच्या युट्यूब चॅनलवर बोलताना संरक्षण व सामरिक तज्ज्ञ शकील चौधरी यांनी स्पष्ट केले की, भारताला पाकिस्तानसोबत सध्या वाटाघाटी करण्यामध्ये अजिबात रस नाही. जोपर्यंत पाकिस्तान आपल्या भूमीवरून चालणाऱ्या दहशतवादी कारवाया पूर्णपणे थांबवत नाही आणि या गंभीर समस्येचा सामना करण्यासाठी प्रामाणिक पावले उचलत नाही, तोपर्यंत नवी दिल्ली इस्लामाबादसोबत चर्चेच्या टेबलावर बसणार नाही, असे चौधरी यांनी ठामपणे सांगितले.

 भारताला युद्धाची नाही, तर विकासाची गरज

चर्चेदरम्यान शकील चौधरी यांनी भारताच्या भूमिकेचे कौतुक केले आणि पाकिस्तानच्या जुन्या व खोट्या आरोपांचे खंडन केले. त्यांनी स्पष्ट केले की, भारताला शेजारील देशांसोबत अनावश्यक तणाव किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण करायची नाही. भारताचे सध्याचे एकमेव आणि मुख्य लक्ष देशाचा आर्थिक विकास, तंत्रज्ञान आणि जागतिक प्रगतीवर आहे. जर सीमेवर तणाव राहिला नाही आणि शांतता प्रस्थापित झाली, तर त्याचा थेट फायदा भारताच्या विकासाला होईल, हे भारतीय नेतृत्वाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या कुलगुरूंसारखी युद्धखोरी भारताच्या अजेंड्यावर नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Japan BIG-B Initiative : काय आहे हा ‘BIG-B’ प्लॅन? बांगलादेशात भारताच्या प्रवेशासाठी जपान करतोय जोरदार तयारी

दुसरीकडे, पाकिस्तानमधील वाढत्या अस्थिरतेसाठी आणि अंतर्गत दहशतवादी हल्ल्यांसाठी पाकिस्तानी सरकार नेहमीच भारताला जबाबदार धरत असते. यावर बोलताना चौधरी यांनी थेटपणे पाकिस्तानी सरकारचे आरोप फेटाळून लावले. त्यांनी सांगितले की, भारताची सीमा बलुचिस्तान किंवा खैबर पख्तुनख्वा या भागांना थेट जोडलेली नाही. त्यामुळे भारतासाठी तिथे जाऊन अंतर्गत हस्तक्षेध करणे अशक्य आहे. पाकिस्तानने स्वतःच्या अपयशाचे खापर भारतावर फोडणे बंद केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

२०१६ च्या दाव्यांचे काय झाले? पुरावे असतील तर संयुक्त राष्ट्रात जा!

पाकिस्तानी सैन्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना चौधरी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, २०१६ मध्ये तत्कालीन पाकिस्तानी लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी दावा केला होता की, त्या वर्षभरात देशातून दहशतवाद समूळ नष्ट केला जाईल. मात्र, वास्तवात काहीही बदलले नाही. आजही पाकिस्तानात दहशतवादी कारवाया अविरत सुरू आहेत.

पाकिस्तान सरकार जर अजूनही असे मानत असेल की त्यांच्या देशात होणाऱ्या प्रत्येक हल्ल्यामागे भारताचा हात आहे, तर त्यांनी पोकळ आरोप करण्याऐवजी थेट संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) जाऊन ठोस पुरावे सादर करावेत, असा जोरदार सल्ला शकील चौधरी यांनी दिला. स्वतःच्या देशातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरलेले पाकिस्तानी नेतृत्व नेहमीच भारताचे नाव पुढे करून जनतेची दिशाभूल करते, हेच यातून सिद्ध होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Nuclear Lab : अमेरिकेच्या प्रमुख अणुप्रयोगशाळेत अचानक भीषण आग; आणीबाणी जाहीर, जाणून घ्या नक्की काय घडले?

जगाचा आता पाकिस्तानवर विश्‍वास उरला नाही

आंतरराष्ट्रीय राजकारणावर भाष्य करताना शकील चौधरी यांनी एक अत्यंत महत्त्वाची बाब समोर आणली. अलीकडेच जपानच्या पंतप्रधानांनी भारताला भेट दिली होती. या भेटीदरम्यान भारत आणि जपानने एका संयुक्त निवेदनातून पाकिस्तानवर थेट नाव घेऊन टीका केली होती. आंतरराष्ट्रीय राजनैतिक संबंधांमध्ये कोणत्याही देशाने दुसऱ्या देशाचे नाव घेऊन जाहीर टीका करणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते.

यापूर्वी २०१० मध्ये ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनीही पाकिस्तानवर जागतिक दहशतवादाला आश्रय दिल्याबद्दल उघडपणे टीका केली होती. या सर्व घटनांचा दाखला देत चौधरी यांनी स्पष्ट केले की, आज जागतिक स्तरावर पाकिस्तानची विश्वासार्हता पूर्णपणे संपली आहे. जगातील कोणतीही मोठी महासत्ता किंवा देश आता पाकिस्तानच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही, ही पाकिस्तानसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताने पाकिस्तानला कोणत्या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे?

    Ans: भारताने शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) आगामी 'सिव्हिलायझेशनल डायलॉग फोरम' बैठकीसाठी पाकिस्तानला आमंत्रित केले आहे.

  • Que: जोपर्यंत दहशतवाद संपत नाही तोपर्यंत भारत चर्चा का करणार नाही?

    Ans: पाकिस्तानी तज्ज्ञ शकील चौधरी यांच्या मते, भारत शांतता आणि विकासावर लक्ष केंद्रित करत असून जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाचा बिमोड करत नाही, तोपर्यंत भारत वाटाघाटी करणार नाही.

  • Que: आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानबद्दल काय मत आहे?

    Ans: जपान आणि ब्रिटनसारख्या देशांनी यापूर्वी पाकिस्तानवर उघडपणे टीका केली असून, जागतिक स्तरावर आता पाकिस्तानची विश्वासार्हता राहिलेली नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Web Title: Pakistan expert shakil chaudhary india pakistan talks terrorism scandals hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • india pakistan war
  • India-Pakistan Conflict
  • World news

संबंधित बातम्या

Japan BIG-B Initiative : काय आहे हा ‘BIG-B’ प्लॅन? बांगलादेशात भारताच्या प्रवेशासाठी जपान करतोय जोरदार तयारी
1

Japan BIG-B Initiative : काय आहे हा ‘BIG-B’ प्लॅन? बांगलादेशात भारताच्या प्रवेशासाठी जपान करतोय जोरदार तयारी

Israel Election: ‘अरब पक्षांनी वोटचोरी..’; पोलिसांच्या ‘अशा’ निवेदनामुळे इस्रायली अध्यक्ष नेतान्याहूंच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह
2

Israel Election: ‘अरब पक्षांनी वोटचोरी..’; पोलिसांच्या ‘अशा’ निवेदनामुळे इस्रायली अध्यक्ष नेतान्याहूंच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह

US Iran war : इराणचा अण्वस्त्र इशारा अन् अमेरिकेची मोठी लष्करी तयारी; होर्मुझच्या सामुद्रधुनीत महायुद्धाची ठिणगी?
3

US Iran war : इराणचा अण्वस्त्र इशारा अन् अमेरिकेची मोठी लष्करी तयारी; होर्मुझच्या सामुद्रधुनीत महायुद्धाची ठिणगी?

Brazil Election: ‘मीच ब्राझीलचा खरा नेता, निवडणुकीत हेराफेरी झाली’ अमेरिकेत पोहोचताच फ्लॅव्हिओ बोल्सोनारो यांचा खळबळजनक दावा
4

Brazil Election: ‘मीच ब्राझीलचा खरा नेता, निवडणुकीत हेराफेरी झाली’ अमेरिकेत पोहोचताच फ्लॅव्हिओ बोल्सोनारो यांचा खळबळजनक दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.