Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel-Hamas War: इस्रायल लष्कराचे मोठे यश; गाझा रुग्णालयातून हमासचे 100 दहशतवादी पकडल्याचा दावा

सध्या इस्त्रायल-हमास यांच्यात तीव्र संघर्ष सुरू असून एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात इस्रायलच्या लष्कराने 100 हमास दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 29, 2024 | 12:52 PM
इस्रायल लष्कराचे मोठे यश; गाझा रुग्णालयातून हमासचे 100 दहशतवादी पकडल्याचा दावा

इस्रायल लष्कराचे मोठे यश; गाझा रुग्णालयातून हमासचे 100 दहशतवादी पकडल्याचा दावा

Follow Us
Close
Follow Us:

जेरूसेलम: सध्या इस्त्रायल-हमास यांच्यात तीव्र संघर्ष सुरू असून एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात इस्रायलच्या लष्कराला मोठे यश मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायली सुरक्षा दलांनी उत्तर गाझातील कमल अडवान रुग्णालयात छापा मारून सुमारे 100 संशयित हमास दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. इस्रायली लष्कराने याबाबत माहिती देताना सांगितले की, त्यांनी रुग्णालयातून शस्त्रे, दहशतवादी निधी,आणि गुप्तचर दस्तऐवज जप्त केले आहेत.

हमास दहशतवाद्यांची उपस्थिती नाकारत आहे

मात्र, गाझातील आरोग्य अधिकारी आणि हमास या कारवाईत दहशतवाद्यांची उपस्थिती नाकारत आहेत. इस्रायलच्या लष्कराच्या मते, रुग्णालयातून बाहेर काढताना काही दहशतवादी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांना ताब्यात घेण्यात आले. इस्रायली लष्कराने या कारवाईद्वारे हमासविरोधातील मोहिमेत महत्त्वाचे यश मिळवल्याचा दावा केला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गाझामधील परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.

हे देखील वाचा- इजिप्तचा गाझामध्ये इस्त्रायल-हमास युद्धबंदीचा प्रस्ताव; चार ओलिसांची होणार सुटका?

“Hamas military operatives are present [in the Kamal Adwan Hospital]; they are in the courtyards, at the gates of the building, in the offices.” This ambulance driver—who was apprehended due to suspicion of terrorist involvement—reveals how Hamas uses the Kamal Adwan Hospital… pic.twitter.com/WTXdQ4aFtQ — LTC Nadav Shoshani (@LTC_Shoshani) October 28, 2024


गाझामध्ये परिस्थिती गंभीर

या दीर्घकालीन संघर्षात पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 43,000 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात मोठ्या संख्येने महिला आणि मुलांचा समावेश आहे. पायाभूत सुविधांचीही अतोनात हानी झाली आहे. तसेच गाझातील सुमारे 75 टक्के पायाभूत सुविधा मोडकळीस आल्या आहेत. पाणी, अन्न, आणि औषधांच्या तुटवड्यामुळे गाझातील नागरिकांची परिस्थिती गंभीर बनली आहे.

गेल्या व्रषभरापासून युद्ध सुरू 

इस्रायल-हमास संघर्षाला गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला हमासच्या इस्रायलवरील हल्ल्याने सुरुवात झाली होती. या हल्ल्यात 1200 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आणि 250 हून अधिक नागरिक ओलीस ठेवण्यात आले. त्यानंतर इस्रायलने जोरदार प्रत्युत्तर दिले, यामुळे गाझामध्ये सतत हवाई हल्ले आणि बॉम्बफेक सुरू आहेत.

सध्या या युद्धात शांततेच्या शक्यता दिसत नसून, दोन्ही बाजूंनी गंभीर परिस्थिती आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील या संघर्षामुळे गाझातील सामान्य नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या संघर्षावर तोडगा काढण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे, पण प्रत्यक्षात शांतता निर्माण करण्याचे प्रयत्न अद्याप अपयशी ठरत आहेत.

हे देखील वाचा- उत्तर कोरियाने रशियाला पाठवली 10 हजार सैनिकांची मदत; पेंटागॉनने केली चिंता व्यक्त

Web Title: Israel hamas war major success of israel army claims to capture 100 hamas terrorists from gaza hospital nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 12:52 PM

Topics:  

  • Hamas
  • Israel

संबंधित बातम्या

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी
1

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Israel जगाचा नाश करणार! ‘या’ देशाचा खेळ खल्लास; अमेरिकेतून नेत्यानाहूंनी दिला भयंकर इशारा
2

Israel जगाचा नाश करणार! ‘या’ देशाचा खेळ खल्लास; अमेरिकेतून नेत्यानाहूंनी दिला भयंकर इशारा

Israel Maritime : इस्रायलने पाकिस्तानकडे जाणाऱ्या तेल टँकरवर केला हल्ला; 24 क्रू मेंबर्सना ठेवले ओलीस
3

Israel Maritime : इस्रायलने पाकिस्तानकडे जाणाऱ्या तेल टँकरवर केला हल्ला; 24 क्रू मेंबर्सना ठेवले ओलीस

आशेचा किरण की आणखी एक राजकीय वादळ? 50 जहाजांचा ‘हा’ ताफा इस्रायल आणि अमेरिकेसाठी डोकेदुखी; गाझाच्या दिशेने रवाना
4

आशेचा किरण की आणखी एक राजकीय वादळ? 50 जहाजांचा ‘हा’ ताफा इस्रायल आणि अमेरिकेसाठी डोकेदुखी; गाझाच्या दिशेने रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.