फोटो सौजन्य: सोशल मीडिया
प्योंगयांग : उत्तर कोरियाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने युक्रेनविरुद्ध लढण्यासाठी रशियाला जवळपास 10,000 सैनिक पाठवले जात आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय पेंटागॉनच्या प्रवक्त्या सबरीना सिंग यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी माहिती देताना उत्तर कोरियाच्या या निर्णयावर चिंता व्यक्त केली. सिंग यांच्या म्हणण्यानुसार, काही उत्तर कोरियन सैनिक आधीच युक्रेनजवळील युद्ध क्षेत्रात पोहोचले आहेत आणि तेथे रशियाच्या बाजूने युक्रेनियन सैन्याविरोधात काम करत आहेत.
उत्तर कोरियाला “युद्धखोर” पक्ष म्हणून मानले जाईल- पेंटागॉन
पेंटागॉने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाच्या सैनिकांचा सहभाग रशियाला युक्रेनविरुद्ध एक महत्त्वाची सामरिक मदत ठरणार आहे. याबाबत पेंटागॉनचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनीही गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी उत्तर कोरियाला इशारा दिला आहे की, जर त्यांचे सैनिक युक्रेनच्या युद्धभूमीवर दिसले तर उत्तर कोरियाला “युद्धखोर” पक्ष म्हणून मानले जाईल. यामुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील स्थिरतेवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
हे देखील वाचा- व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा जल्लोष; बायडेन यांनी कमला हॅरिसचे कौतुक करत दिल्या शुभेच्छा
उत्तर कोरियाच्या सैनिकांची एक तुकडी रशियाच्या कुर्स्क सीमा प्रदेशात तैनात
नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) ने देखील उत्तर कोरियाच्या सैनिकांची काही तुकडी रशियाच्या कुर्स्क सीमा प्रदेशात तैनात असल्याचे दावा केला आहे. या प्रदेशात रशिया युक्रेनियन सैन्याला परत ढकलण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच उत्तर कोरियाच्या सैनिकांची मदत रशियासाठी फायदेशीर ठरू शकते, तर युक्रेनसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे.
उत्तर कोरियाने दावे खोटे असल्याचे म्हटले
याआधीही उत्तर कोरियाने रशियात सैनिक 1500 सैनिक पाठवले असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, उत्तर कोरियाने हे दावे खोटे असल्याचे सांगितले होते. रशिया आणि उत्तर कोरिया यांनी सातत्याने यासंबंधी अफवा असल्याचे सांगत लष्करी कारवायांना नकार दिला. मात्र, दक्षिण कोरियाच्या गुप्तचर प्रमुखांच्या मते, युक्रेनविरुद्ध युद्धभूमीवर तैनात करण्यापूर्वी सुमारे 3,000 उत्तर कोरियन सैनिकांना रशियामध्ये ड्रोन आणि इतर उपकरणांचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनांच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाच्या भूमिकेवर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा आक्षेप घेतला जात असून पेंटागॉन आणि NATO अशा परिस्थितीत सतर्क राहिले आहेत. जर उत्तर कोरियन सैनिकांचा प्रत्यक्ष सहभाग आढळला तर हा युक्रेन युद्धाच्या व्याप्तीत महत्त्वपूर्ण बदल घडवू शकतो.
हे देखील वाचा- इजिप्तचा गाझामध्ये इस्त्रायल-हमास युद्धबंदीचा प्रस्ताव; चार ओलिसांची होणार सुटका?