Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel-Iran War : नेतन्याहूंची आणखी एक मोठी खेळी! इराणमध्ये सत्ता परिवर्तन करण्याचा प्रयत्न; नागरिकांना केले आवाहन

Iran-Israel Conflict: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या नागरिकांना सत्ता परिवर्तनासाठी पाऊल उचलण्याचे आवाहन केले आहे. नेतन्याहूंनी सध्या सरकार उलटवून टाकण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 14, 2025 | 04:36 PM
Israel-Iran War Netanyahu make to change power Appeal to Iran citizens

Israel-Iran War Netanyahu make to change power Appeal to Iran citizens

Follow Us
Close
Follow Us:

Israel-Iran War News Marathi: सध्या इराण आणि इस्रायलमध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण झाला आहे. इस्रायलने शुक्रवारी (13 जून) रोजी ऑपरेशन रायझिंग सुरु केले. या मोहीमेंतर्गत इस्रायलने इराणच्या अणुतळांवर आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य केले. इस्रायलच्या हल्ल्यात अनेक वरिष्ठ अधिकारी मारले गेले आहे. याच वेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या नागरिकांना सत्ता परिवर्तनासाठी पाऊल उचलण्याचे आवाहन केले आहे. नेतन्याहूंनी सध्या सरकार उलटवून टाकण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायल हल्ल्यात इराणचे रिव्होल्यूशनरी गार्ड कॉप्सचे कमांडर आणि शस्त्रदलाचे प्रमुख यांच्यासह अनेक उच्चाधिकारी ठार झाले आहे. यामुळे इराणमध्ये अशांतता पसरली आहे. सध्याचे सरकार उलटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु अद्याप यावर कोणतीही स्पष्टता मिळाली नाही. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू इस्रायलमध्ये सत्तापरिवर्तानाचा जुगार खेळण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Israel-Iran War: ‘… तर अनेक मुस्लिमांची हत्या होईल’ ; इराणच्या समर्थनार्थ पाकिस्तानचे आसिफ ख्वाजा यांचे विधान

इराणमधील सत्ता लष्कराच्या हाती

सध्या इराणची सत्ता रिव्होल्यूशनरी गार्ड कॉप्स (IRGC)सशस्त्र दलाच्या आणि अनिवार्चित संघटनांच्या ताब्यात आहे. कोणत्याही देशाची सरकार उलथवून लावण्यासाठी लष्कराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.इस्रायलच्या हल्ल्यात अनेक लष्करी अधिकारी ठार झाले आहेत. तसेच काही लष्करी अधिकारी सत्तेत आहे.

परंतु या लष्करी राजवटीचे पतन करण्याचा इस्रायलचा प्रयत्न सुरु आहे. यामुळे इराणमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इस्रायल इराणमध्ये त्यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्यांची सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्यांच्या हा प्रयत्न फसण्याची शक्यता आहे. कारण इराणमध्ये विरोधी पक्षांची संख्या कमी होत चालली आहे.

इस्रायलचे इराणच्या राजवटीविरोधात आंदोलन

2022 मध्ये इराणमधील सरकारविरोधी गट आणि कार्यकर्त्यांनी युती करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ही युती फार काळ टिकली नाही. या युतीचे नेतृत्त्व कोण करणार यावरुन मोछठा वाद सुरु झाला होता. यामध्ये इस्रायलने देखील हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता. इस्रायलने इराणच्या माजी शाहचा मुलगा, माजी इराणी युवराज रेझा पहलवी याला सत्तेत आणण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी देखील इस्रायल याच प्रयत्नात आहे.

एमईके गट

शिवाय इस्रायल मुजाहिदिन-ए-खल्क(MEK)च्या मदतीने देखील इराणमध्ये सत्तापालट करण्याचा प्रयत्न करु शकतो. हा गट डाव्या विचारसरणीचा विरोधी गट आहे. हा गट इस्लामिक लोकशाही उलथवून टाकण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच राजेशाहीच्या विरोधातही हा. यामुळे या गटाच्या मदतीने इस्रायल इराणमध्ये सत्ता परिवर्तन करण्याची शक्यता आहे.

हा गट 1979 मधील इस्लामिक क्रांतीनंतर इराकमध्ये स्थाईक झाला होता. 1980मध्ये या गटाने सद्दाम हुसेनच्या इराणविरोधी युद्धात सहभाग घेतला होता. यामुळे इराणमध्ये या गटाविरोधात तीव्र संताप आहे. तसेच अनेक धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या बाजूने असणारे देखील गट आहे. ज्यांच्या माध्यमातून इस्रायल इराणमद्ये सरकार पलटवून टाकण्याचा प्रयत्न करत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Israel-Iran War : इस्रायलची दोन लढाऊ विमाने इराणने केली उद्धवस्त; खळबळजनक दाव्याने अमेरिकेला धक्का

Web Title: Israel iran war netanyahu make to change power appeal to iran citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 04:36 PM

Topics:  

  • iran
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
1

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
3

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
4

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.