पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel-Iran War News Marathi: इस्लामाबाद: शुक्रवारी(14 जून) इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर मध्ये पूर्वेत दोन्ही देशांत तीव्र युद्ध सुरु झाले आहे. दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत ७८ जणांचा मृत्यू तर ३०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या हल्ल्यांमुळे अमेरिका आणि इराणमधील अणु चर्चा देखील थांबली आहे. इराणने तीव्र संताप व्यक्त केला असून इस्रायलच्या अनेक भागांवर हल्ला चढवला आहे. याच वेळी आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. इस्रायलशी सुरु असलेल्या युद्धात पाकिस्तान इराणला समर्थन देणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी याबाबत इशारा दिला आहे. त्यांनी सर्व मुस्लिम देशांना इस्रायलविरोधी येण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसरा, जगातील सर्व मुस्लिम देश एक आले तरच इस्रायलशी संघर्ष करता येईल. पाकिस्तानी पत्रकारांशी बोलताना आसिफ यांनी इराण-इस्रायलंमधील युद्धावर भाष्य केले. इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा निषेध करत त्यांनी म्हटले की, इराणवर ज्या पद्धतीने हल्ला करण्यात आला ते चुकीचे आहे. आम्ही इराणच्या समर्थनार्थ आहोत.
आसिफ ख्वाजा यांनी पुढे म्हटले की, इस्रायलच्या गाझातील हत्याकांडाविरोधात आणि इराणवरील हल्ल्याविरोधात सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येण्याची अत्यंत गरज आहे. सर्व मुस्लिम देश एकत्र आले नाहीत, तर भविष्यात आल्यापल सोबत काय घडले सांगता येणार नाही.ख्वाजा यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायलला आताच संपुष्टात आणले नाही तर भविष्यात आणखी मुस्लिमांची हत्या केली जाईल. यामुळे या शत्रूचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
आसिफ ख्वाजा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आसिफ ख्वाजा यांनी म्हटले की, इराण एक मुस्लिम राष्ट्र आहे, तसेच आपला शेजारी देश आहे. अशा परिस्थिती शरीफ यांनी इस्रायलच्या हल्ल्याविरोधी काही बोलले नाही चुकीचे आहे. तसेच त्यांनी इस्रायलला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे.
शुक्रवारी (13 जून) इस्रायलने इराणवर हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात झाली. यानंतर इराणने देखील तेल अवीव बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा करण्यास सरुवात केली. इराणने २०० बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे इस्रायलवर डागली. यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध तीव्र भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच वेळी अमेरिकेने इस्रायल आणि इराणमधील शांततेसाठी सौदी अरेबियाशी संपर्क साधला आहे. सौदी अरेबियाच्या मध्यस्थाने इराण आणि इस्रायलमधील तणाव कमी करण्याचे प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केले आहेत.