Israel Iran War: What is Israel's 'Shaldag' Commander plan? Will it destroy Iran's nuclear sites?
Israel Iran War News Marathi : जेरुसेलम : इराण आणि इस्रायलमधील युद्धाने रौद्र रुप धारण केले आहे. दोन्ही देश प्रितहल्ल्यांनी एकमेकांना घेरण्याच्या तयारीत आहेत. सध्या इस्रायल इराणच्या फोर्डोतील भूमिगत युरेनियमच्या साठ्याला लक्ष्य करत आहे. यासाठी इस्रायलने मोठी योजना आखली आहे. सध्या इस्रायलकडे इराणच्या अणु तळांना नष्ट करण्यासाठी बॉम्बचा साठा अपुरा आहे. यामुळे इस्रायलला इराणचे अणु ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात येत आहेत. याच वेळी इस्रायलने Shaldag योजना आखली आहे. पण ही योजना नेमकी काय आहे? आणि या योजनेंतर्गत इस्रायल इराणच्या आण्विक तळांना नष्ट करु शकेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
इराणच्या फोर्डो अणुउर्जा केंद्रावरजवळ २००० सेंटीफ्यूज एक्टिव आहेत. या ठिरकाणी इराणचा ६० टक्के युरेनियमचा साठा तयार केला जात आहे. यामुळे इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. परंतु यामुळे मध्य पूर्वेतच नव्हे तर संपूर्ण जगावर आण्विक हल्ल्याचा धोका वाढण्याची शक्यता आहे. हे इराणचे आण्विक शस्त्रे बनवण्याचे मोठे केंद्र आहे. यामुळे हे तळ उद्ध्वस्त करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. परंतु यासाठी इस्रायलला अमेरिकेच्या मदतीची गरज पडण्याची शक्यता आहे.
सध्या इस्रायलने यासाठी Shaldag ऑपरेशन सुरु केले आहे. याअंतर्गत १० हजार इस्रायली कमांडो इराणमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. या मोहीमेंतर्गत Shaldag कमांडो टीम इराणमध्ये घुसून आण्विक तळांना नष्ट करणार असल्याचे म्हटले जात आहे. शालदाग कमांडो ही इस्रायलच्या हवाई दलाची एक विशेष तुकडी आहे.
ही तुकडी अत्यंत धोकादायक असल्याचे सांगितले जाते. शालदाग म्हणजे हिब्रूमध्ये किंगफिशर, म्हणजे जलद आणि पाण्याखाली शिकार करणारा पक्षी आहे. या पक्षाशी इस्रायलच्या या शालदाग तुकडीची तुलना केली जाते. १९७४ मध्ये ही तुकडी तयार करण्यात आली होती. ही तुकडी शत्रू राष्ट्रांमद्ये घुसखोरी करुन, हवाई हल्ल्यांसाठी लक्ष्य तयार करत. तसेच गुप्त माहिती गोळा करण्याचेही काम करते.
सध्या इराणच्या अणु तळांवर हल्ला करण्यासाठी इस्रायलकडे पुरेसे शस्त्र उपल्बध नाहीत. यामुळे शालदाग मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहीमेंतर्गत इराणच्या तळांना उद्ध्वस्त करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. आतापर्यंत इस्रायलने इराणच्या अनेक आण्विक तळांवर हल्ला केला आहे, परंतु यामुळे इराणचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचा दावा तेहरानने केला आहे. तसेच रशियाने आणि चीनने देखील इस्रायल इराणच्या आण्विक तळांपर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही असा दावा केला आहे. यामुळे इस्रायलचे हे ऑपरेशन यशस्वी होईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.