Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iron Beam: इस्रायलचं अजेय ‘ब्रह्मास्त्र’ पडलं थंड; सर्वात महागड्या लेझर सिस्टीमचा हिजबुल्लाहच्या ड्रोन आर्मीने उडवला धुव्वा

Iron Beam: २०२४ च्या अखेरीस, इस्रायली संरक्षण मंत्रालय, राफेल (सिस्टमचे डिझायनर) आणि एल्बिट (तिचा डेव्हलपर) यांनी या सिस्टीमचे उत्पादन आणि खरेदी वाढवण्यासाठी २ अब्ज इस्रायली शेकेल करारावर स्वाक्षरी केली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 12, 2026 | 01:30 PM
israel iron beam failure hezbollah drone war laser defense system marathi news

israel iron beam failure hezbollah drone war laser defense system marathi news

Follow Us
Close
Follow Us:
  • अब्जावधींचा खर्च, पण यश हुलकावणी देत आहे
  • हवामानाचा मोठा अडथळा
  • आयर्न डोमच्या तुलनेत कमकुवत

Iron Beam vs Hezbollah Drones : इस्रायलने जगाला असा दावा केला होता की, त्यांच्याकडे आता एक अशी ‘लेझर’ शक्ती आहे जी कोणत्याही रॉकेट किंवा ड्रोनला काही सेकंदात भस्म करेल. मात्र, लेबनान सीमेवर हिजबुल्लाहसोबत सुरू असलेल्या युद्धात या ‘आयर्न बीम’ (Iron Beam) सिस्टीमचे पितळ उघडे पडले आहे. ज्या तंत्रज्ञानावर इस्रायलने १० वर्षे मेहनत घेतली आणि अब्जावधी रुपये खर्च केले, ते तंत्रज्ञान आता युद्धभूमीवर सर्वात कमकुवत दुवा ठरत आहे.

स्वस्त ड्रोनचा महागात पडणारा सामना

इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने राफेल आणि एल्बिट या कंपन्यांसोबत २ अब्ज इस्रायली शेकेलचा करार करून आयर्न बीमचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. या सिस्टीमचा मुख्य फायदा असा सांगण्यात आला होता की, एका रॉकेटला पाडण्याचा खर्च फक्त काही डॉलर्स असेल. मात्र, वास्तवात या सिस्टीमची कामगिरी अत्यंत खराब आहे. हिजबुल्लाहने पाठवलेले साधे ड्रोन पाडण्यासाठीही आयर्न बीमला तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा लेझर सिस्टीम फेल झाल्यावर इस्रायली सैन्याला हेलिकॉप्टर किंवा साध्या रायफल्सचा वापर करून ड्रोन पाडावे लागत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz: समुद्रातील ती ‘अदृश्य’ भिंत! भारतीय टँकर झालं गायब आणि प्रगटलं थेट मुंबईत; वाचा कसा चुकवला सुरक्षा घेरा?

हवामान आणि तांत्रिक मर्यादांचा मोठा अडथळा

आयर्न बीम ही प्रणाली १०० किलोवॅटच्या लेझर बीमवर आधारित आहे. हे लेझर लक्ष्यावर काही सेकंद प्रकाश टाकून उष्णता निर्माण करते आणि इंजिन निकामी करते. पण यामध्ये एक मोठी तांत्रिक अडचण आहे. लेझरला अचूक मारा करण्यासाठी वातावरण स्वच्छ असणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, धुके, धुळीचे वादळ किंवा ढगाळ वातावरण असल्यास लेझरची शक्ती विखुरली जाते आणि ती ड्रोनला स्पर्शही करू शकत नाही. सौदी अरेबियाने चीनकडून घेतलेली अशीच यंत्रणा वाळवंटातील उष्णतेमुळे निकामी ठरली होती, तोच अनुभव आता इस्रायलला येत आहे.

🇮🇱🇱🇧 Israel’s “Iron Beam” laser system has destroyed a suicide drone launched from Lebanon pic.twitter.com/lbgHwSTMyu — Visioner (@visionergeo) March 2, 2026

credit – social media and Twitter

बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसमोर आयर्न बीम शून्य!

सोशल मीडियावर अनेकदा खोटे व्हिडिओ पसरवले जातात की आयर्न बीमने मोठी क्षेपणास्त्रे नष्ट केली. मात्र, तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की, आयर्न बीममध्ये इराणच्या ‘फतेह’ सारखी हाय-स्पीड बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे रोखण्याची क्षमता अजिबात नाही. ही यंत्रणा फक्त कमी उंचीवर उडणाऱ्या आणि संथ गतीने चालणाऱ्या छोट्या ड्रोनसाठी तयार करण्यात आली होती, परंतु तिथेही तिला संघर्ष करावा लागत आहे. इस्रायलचे माजी हवाई दल कमांडर ब्रिगेडियर जनरल रान कोचाव यांनी स्पष्ट केले की, आयर्न बीम अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि तिला आयर्न डोमची जागा घेणे अशक्य आहे.

⚡HISTORIC: For the first time ever, Israel used the Iron Beam to intercept rockets fired by Hezbollah. pic.twitter.com/DU63REU22k — Israel War Room (@IsraelWarRoom) March 2, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Fuel Crisis: 30 दिवस तेल पुरवठा बंद! होर्मुझमध्ये इराणची प्रलयकारी सापळ्यांची उभारणी; अमेरिकन नौदलाचा ‘एस्कॉर्ट’ प्लॅन फेल

 भविष्यातील आव्हान

इस्रायलने आयर्न बीमला आयर्न डोममध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, जेणेकरून मोठ्या संकटांना रॉकेटने आणि छोट्या धोक्यांना लेझरने रोखता येईल. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता इस्रायलला या तंत्रज्ञानावर अधिक काम करण्याची गरज आहे. तोपर्यंत हिजबुल्लाहच्या स्वस्त ड्रोनने इस्रायलच्या अब्जावधींच्या या ‘लेझर’ स्वप्नाला मोठा तडा दिला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आयर्न बीम म्हणजे काय?

    Ans: आयर्न बीम ही इस्रायलची लेझर-आधारित हवाई संरक्षण प्रणाली आहे, जी ड्रोन आणि लहान रॉकेट नष्ट करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

  • Que: आयर्न बीम हिजबुल्लाहच्या ड्रोनसमोर का अपयशी ठरत आहे?

    Ans: खराब हवामान (धुके, धूळ) आणि लेझरची मर्यादित रेंज यामुळे ही यंत्रणा ड्रोनवर अचूक मारा करण्यात अपयशी ठरत आहे.

  • Que: आयर्न बीम बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे रोखू शकते का?

    Ans: नाही, आयर्न बीममध्ये हाय-स्पीड बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे रोखण्याची क्षमता नाही; ती फक्त लहान यूएव्ही (UAV) साठी प्रभावी ठरू शकते.

Web Title: Israel iron beam failure hezbollah drone war laser defense system marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Hezbollah
  • Israel Attack
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Fuel Crisis: 30 दिवस तेल पुरवठा बंद! होर्मुझमध्ये इराणची प्रलयकारी सापळ्यांची उभारणी; अमेरिकन नौदलाचा ‘एस्कॉर्ट’ प्लॅन फेल
1

Fuel Crisis: 30 दिवस तेल पुरवठा बंद! होर्मुझमध्ये इराणची प्रलयकारी सापळ्यांची उभारणी; अमेरिकन नौदलाचा ‘एस्कॉर्ट’ प्लॅन फेल

Global Oil Crisis : भारताला दिलासा, पण अनेक देश अजूनही तेल संकटात; जाणून घ्या इस्रायल-अमेरिकेचे हाल
2

Global Oil Crisis : भारताला दिलासा, पण अनेक देश अजूनही तेल संकटात; जाणून घ्या इस्रायल-अमेरिकेचे हाल

Strait Of Hormuz: समुद्रातील ती ‘अदृश्य’ भिंत! भारतीय टँकर झालं गायब आणि प्रगटलं थेट मुंबईत; वाचा कसा चुकवला सुरक्षा घेरा?
3

Strait Of Hormuz: समुद्रातील ती ‘अदृश्य’ भिंत! भारतीय टँकर झालं गायब आणि प्रगटलं थेट मुंबईत; वाचा कसा चुकवला सुरक्षा घेरा?

Cyber Warfare: रणांगणासोबत सायबर रणभूमीवरही घनघोर लढाई; इराणची इंटरनेट सेवा कोलमडली; तर अमेरिकेचा 50 TB डेटा चोरीला
4

Cyber Warfare: रणांगणासोबत सायबर रणभूमीवरही घनघोर लढाई; इराणची इंटरनेट सेवा कोलमडली; तर अमेरिकेचा 50 TB डेटा चोरीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.