Israel accuses Hamas of violating ceasefire in Gaza
Israel Hamas Ceasefire update : तेल अवीव : एक मोठी माहित समोर आली आहे. इस्रायलने गाझावर हल्ला केला असून हमासने त्यांच्या सैनिकांवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर असल्याचे म्हटले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. नुकतेच ०९ ऑक्टोबर रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी गाझामधील इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी झाल्याची घोषणा केली होती. पण आता हमासने हल्ला केला असल्याच्या इस्रायलच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे.
इस्रायलने म्हटले आहे की, हमासने रफाहमध्ये त्यांच्या सैनिकांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात त्यांनी रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड आणि स्नापयर फायरचा वापर करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे इस्रायलने देखील प्रत्युत्तर दाखल हवाई हल्ले केले आहे. युद्धबंदी लागून केवळ ९ दिवसांनी हे हल्ले घडले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
इस्रायली अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, त्यांचे सैनिक सीमेवरुन माघारी परतताना हा यलो लाइनच्या बाहेर हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांचे सैनिक जखमी झाले आहेत. अद्याप कोणत्याही मृत्यूंची नोंद झालेली नाही.
या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Neytanyahu) यांनी लष्करप्रमुखांची आपत्कालीन बैठक घेतली आहे. अद्याप हमासने इस्रायलच्या या दाव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु हमास अजूनही युद्धबंदी पाळत असून असा कोणताही हल्ला करण्यात आलेला नसल्याचे वरिष्ठ अधिकारी इज्जत अल-रिश्क यांनी म्हटले आहे.
शिवाय काही तासांपूर्वीच अमेरिकेने हमास गाझातील नागरिकांवर हल्ला करणार असल्याचाही दावा केला होता. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने इशारा जारी केला होता की, हमास गाझामध्ये नागिरकांवर हल्ला करण्याचा तयारीत आहे. अमेरिकेने या योजनेला युद्धबंदीचे उल्लंघन म्हटले होते. तसेच हमासला गाझातील लोकांवर हल्ला केल्यास त्यांच्याविरोधात योग्य ती पावले उचलली जातील असा स्पष्ट इशाराही दिला होता. गाझातील लोकांच्या सुरक्षेचा खात्री करण्यासाठी अमेरिका योग्य ती कारवाई करेल असे सांगण्यात आले होते.
अशा परिस्थिती इस्रायलने केलेल्या दाव्याने मोठी खळबळ उडाली असून आता डोनाल्ड ट्रम्प यावर काय निर्णय घेतली याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. तसेच गाझामध्ये पुन्हा संघर्ष सुरु होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रश्न १. इस्रायलने हमासवर काय आरोप केला आहे?
इस्रायलने हमासने गाझातील रफाहशहरात त्यांच्या सैनिकांवर हल्ला करुन युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
प्रश्न २. अमेरिकेने हमासवर कोणता आरोप केला होता?
अमेरिकेने हमास गाझातील लोकांवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचा आरोप केला होता.
प्रश्न ३. अमेरिकेने हमासला कोणता इशारा दिला?
अमेरिकेने हमासला गाझातील लोकांवर हल्ला केल्यास त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला होता.
पाकिस्तान-अफगाण तणाव शिगेला; अफगाण मंत्र्याची थेट धमकी, ‘पाक सैन्याला भारतीय बॉर्डरपर्यंत खदेडणार’