पाकिस्तान-अफगाण तणाव शिगेला; अफगाण मंत्र्याची थेट धमकी (Photo Credit- X)
काबूल/इस्लामाबाद: पाकिस्तानी सैन्याच्या वाढत्या कारवाईमुळे संतापलेल्या अफगाणिस्तानचे उप-गृहमंत्री आणि तालिबान नेते मौलवी मुहम्मद नबी ओमारी (Mawlawi Muhammad Nabi Omari) यांनी पाकिस्तानला (Pakistan) अत्यंत कठोर इशारा दिला आहे. अफगाण सेना पाकिस्तानी सैनिकांना भारतीय सीमेपर्यंत हाकलून लावू शकते, असे ओमारी यांनी म्हटले आहे. नबी ओमारी यांनी पाकिस्तानी सैन्याला थेट उद्देशून म्हटले “जर अफगाण जमातीने (कबीले) आणि राष्ट्राने तुम्हाला धार्मिक आदेशानुसार एकदा आक्रमणकारी घोषित केले, तर मी शपथ घेतो की तुम्हाला भारतीय सीमेपर्यंतही सुरक्षा मिळणार नाही.”
मौलवी मुहम्मद नबी ओमारी यांनी पाकिस्तान सरकार आणि लष्करी नेतृत्वावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, पाकिस्तानी सैन्य शासन प्रत्येक काम दुसऱ्यांच्या इच्छेनुसार करते. त्यांनी अलीकडेच शहबाज शरीफ (पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान) यांना ट्रम्पची चापलूसी (खुशामत) करताना पाहिले असेल, असेही ते म्हणाले.
🚨🔻
Deputy Minister of Interior, Mawlawi Muhammad Nabi Omari’s message to the Pakistani military regime: “If the Afghan tribes and nation once declare you an invader by religious decree, I swear by God, you will not find safety even up to the Indian border.” pic.twitter.com/NouBIaF8N8 — Afghanistan Defense (@AFGDefense) October 18, 2025
ओमारी यांनी पुढे म्हटले की, सध्याची परिस्थिती हे संकेत देते की डूरंड रेषेच्या पलीकडीलजी क्षेत्रे एकेकाळी अफगाणिस्तानच्या हातून निसटली होती, ती आता पुन्हा अफगाणिस्तानच्या ताब्यात येऊ शकतात. तालिबान नेत्याचा हा इशारा अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आला आहे.
या वाढत्या संघर्षादरम्यान, कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी मोठी घोषणा केली आहे. एका आठवड्याहून अधिक काळ सुरू असलेल्या भीषण संघर्षानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान तातडीने युद्धविरामावर सहमत झाले आहेत. यापूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या निवासी भागांमध्ये केलेल्या हल्ल्यांमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला होता.
कतारच्या निवेदनानुसार, दोन्ही शेजारील देश स्थायी शांतता आणि स्थिरता मजबूत करण्याच्या उद्देशाने यंत्रणा (Mechanism) स्थापित करण्यासही सहमत झाले आहेत. या शांतता चर्चेचे नेतृत्व दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी केले.