इस्त्रायलने दिला इराकला इशारा
हमासचा नाश केल्याशिवाय शांत बसणार नाही – इस्त्रायल
जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र
सध्या जगभरात अनेक देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. रशिया युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. इस्त्रायल गाझा पट्टीवर भीषण हल्ले करत आहे. हमासचा संपूर्ण नाश केल्याशिवाय शांत बसणार नाही अशी स्पष्ट भूमिकाच इस्त्रायलने घेतली आहे. इस्त्रायले केवळ हमास नव्हे तर फिलीस्तीनसह अन्य काही देशांवर देखील हल्ले केले आहेत. आता थेट इस्त्रायलने आणखी एक देशाला इशारा दिला आहे.
इस्त्रायलने हमास नंतर लेबनॉन आणि सिरियामध्ये देखील भीषण हल्ले केले आहेत. त्या ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आता इस्त्रायलने थेट इराक देशाला इशारा दिला आहे. इस्त्रायलने मुस्लिम बहुल देश असणाऱ्या इराकवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. याबाबतचे संकेत त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या भाषणात दिले आहेत.
सक्रिय रेसिस्टेंस ग्रुप्सना कठोर कारवाईचा इशारा 26 सप्टेंबर रोजी नेतान्याहू यांनी दिला आहे. हा इशारा त्यांनी थेट अमेरिकेतून इराकला दिला आहे. थोडक्यात इस्त्रायल आता इराकवर देखील हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. पश्चिम आशिया आधीपासूनच अस्थिरतेचा सामना करत आहे.
संयुक्त राष्ट्र संघाच्या भाषणातून नेत्यानाहू यांनी इराकच्या प्रतिकारी गटांना थेट कारवाईचा इशारा दिला आहे. नेतान्याहू यांच्या भाषणाला प्रतिसाद देताना या धमक्या अस्वीकार्य असल्याचे इराकच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले. इराकच्या एकाही नागरिकावर झालेला हल्ला हा संपरून इराकवरील हल्ला समजला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
इराकमध्ये अनेक प्रतिकारी गट सक्रिय आहेत. ज्यांच्यापासून धोका असल्याचे इस्त्रायल समजतो. त्यापैकी बरेच गट हे इराणच्या “अॅक्सिस ऑफ रेझिस्टन्स” शी जोडलेले असल्याचे म्हटले जाते.
इस्त्रायलच्या अति भयानक हल्ल्यात 32 लोकांच्या चिंधड्या
गेले अनेक महीने इस्त्रायल आणि हमासमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. हमासला नष्ट केल्याशिवाय शांत बसणार नाही असा निर्धारच इस्त्रायल केला आहे. आज इस्त्रायलने हमासवर आजवरचा सर्वात भीषण हल्ला केला आहे. हमासवर इस्त्रायलने भयानक हवाई हल्ला केला आहे. यामध्ये तब्बल 32 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.
गेले अनेक दिवस इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता दिल्याने इस्त्रायलचा रंग अनावर झाला आहे. काहीही झाले तरी हमासला नष्ट केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही असे इस्त्रायलने स्पष्ट केले आहे. आज इस्त्रायलने हमासच्या भागात भयानक हवाई हल्ला केला आहे. यामध्ये तब्बल 32 किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.