Israel preparing to attack Iran's nuclear projects, US intelligence agency reveals
जेरुसेलम: सध्या जगात दोन अघाडीवर युद्ध सुरु आहे. एकीकडे रशिया-युक्रेन आणि दुसरीकडे इस्रायल-हमासमध्ये संघर्ष सुरु आहे. तर अलीकडेच भारत आणि पाकिस्तान संघर्ष निवळत चालला आहे. परंतु याच दरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. परंतु इस्रायलने हल्ला केल्यास डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणशी शांततेने चर्चा करुन तोडगा काढण्याच्या प्रयत्नांवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.
अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल इराणच्या अणुप्रकल्पावर हल्ला करण्याची तयारी करत असल्याचे उघड केले आहे. इंग्रीज वृत्तस्ंथा सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेला इस्रायल इराणी अणु प्रकल्पावर हल्ला करण्याची योजना आखत असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु इस्रायलचा हल्ल्याबाबत अद्याप अंतिम निर्णय अद्याप अस्पष्ट आहे. इस्रायलच्या या हल्ल्याबात अमेरिकन सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.
दरम्यान वॉशिंग्टनमधझील इस्रायल दूतावास आणि इस्रायलच्या पंतप्रधान कार्यलायाशी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने संपर्क साधला आहे. परंतु अद्याप इस्रायलकडूम कोणाताही प्रतिसाद मिळालेला नाही.सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार गुप्तचर यंत्रणेला माहिती मिळाली आहे की, इस्रायसल काही महिन्यांत इराणच्या अणु तळांवर हल्ला करण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिका आणि इराणमधील अणुचर्चा चर्चा थांबली आहे. यामुळे हल्ल्याची शक्यता अधिक असल्याचे म्हटले जात आहे.
एकीकडे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणच्या अणुकार्यक्रमावर राजनैतिक मार्गाने चर्चा करुन तोडगा काढण्याच्या प्रयत्ननात आहे. परंतु अशा परिस्थिती जर इस्रायलने इराणच्या अणु तळांवर हल्ला केल्यास डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न अयशस्वी होतील. सध्या ट्रम्प इस्रायलसोबत संयुक्त लष्करी कारवाईपेक्षा शांतात कराराला प्राधान्य देण्यावर चर्चा करत आहेत.
अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलचे हवाई दल हल्ल्याची तयारी करत आहे. सध्या हवाई दलाचा सराव सुरु आहे. तसेच मोठ्या संख्येने शस्त्रास्त्रे देखील तैनात करण्यात आली आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये यशस्वी चर्चा न झाल्यास इस्रायलने इराणवर हल्ल्याची तयारी ठेवली आहे.
इस्रायलच्या म्हणण्यानुसार, इराण येमेनमधील हुथी विद्रोह्यांना समर्थन देत आहे. यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराण आणि इराणीसमर्थकांविरोधात मोठा बदला घेण्याचा निश्चय केला आहे आहे. त्यांनी अनेक वेळा इराणला हुथी बंडखोरांना आणि हमासला पाठिंबा न देण्याचा इशार दिला आहे.