डोनाल्ड ट्रम्प ही करु लागले युद्धाची तयारी? ताकदवान 'गोल्डन डोम' मिसाईल डिफेंस तयार करण्याची घोषणा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत कोणत्या ना कोणत्या विषयावरुन चर्चेत असतात. अलीकडे राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेसाठी मजबूत क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली बांधण्याची घोषणा केली आहे. या प्रणालीला ट्रम्प यांनी गोल्डन डोम असे नाव दिले आहे. ट्रम्प यांनी ही संरक्षण प्रणाली इस्रायलच्या आयर्न डोमसारखी असणार असल्याचे म्हटले आहे.
ही प्रणाली उपग्रह आधारित असेल. यामुळे देशाचे परदेशी धोक्यांपासून संरक्षण होईल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. या नवीन प्रकल्पासाठी ट्रम्प प्रशासनाने २५अब्ज डॉलर्सचे हजेट सादर केले आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या २०२४-२०२९ पर्यंतच्या कार्यकाळापर्यंत ही प्रणाली सुरु होईल असे सांगितले आहे.
ट्रम्प यांनी अध्यक्ष पदाच्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासूनच देशाची संरक्षण प्रणाली मजबूत करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मार्चमध्ये त्यांनी, भविष्यात अमेरिका सर्वात शक्तिशाली सैन्याचा पाया रचणार असल्याचे म्हटले होते. याची घोषणा करताना ट्रम्प यांनी अमेरिकेच्या ४० व्या राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, रोनाल्ड रेगन यांनी अशीच मजबूत संरक्षण प्रणाली तयार करायची होती. परंतु त्यावेळी त्यांच्याकडे आवश्यक विकसित तंत्रज्ञान नव्हते.
#WATCH | US President Donald Trump says, “As we make a historic announcement about the Golden Dome Missile Defence shield. That’s something we want. Ronald Reagan (40th US President) wanted it many years ago, but they didn’t have the technology. But it’s something we’re going to… pic.twitter.com/YeZGgfc2rH
— ANI (@ANI) May 20, 2025
ट्रम्प यांनी या नव्या गोल्डन डोम संरक्षण प्रणालीची घोषणा करताना सांगितले की, शक्य तितक्या लवकर हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. त्यांच्या कार्यकाळाच्या अखेरीस ही संरक्षण प्रणाली तयार होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या प्रकल्पासाठी १७५ अब्ज डॉलर्सचा खर्च केला जाणार आहे. ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान अमेरिकेन जनतेला वचन दिले होते, की ट्रम्प प्रशासन अमेरिकेसाठी अत्याधुनिक क्षेपणास्त्रे संरक्षण प्रणाली बांधतील.
ट्रम्प यांनी म्हटले की, आज मला जाहीर करताना आनंद होत आहे की, अमेरिकन लोकांना दिलेले वचन मी पूर्ण केले आहे. गोल्डन डोम या अत्याधुनिक प्रणालीसाठी माजी निवड झाली याचा मला आनंद आहे. ही योजना पूर्ण झाल्यास अमेरिका अंतराळात शस्त्रे तैनात करेल. ही शस्त्रे शत्रूच्या क्षेपणास्त्राला नष्ट करेल.