Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel-Hamas War: गाझामधील रेफ्यूजी कॅंपवर इस्रायलचा पुन्हा एकदा मोठा हल्ला; 33 पॅलेस्टिनी नागरिक ठार

इस्रायलने पुन्हा एकदा गाझामध्ये हवाई हल्ले केले आहेत. इस्त्रायलने गाझामदील रेफ्यूजी कॅंपवर हवाई हल्ले केले असून यामध्ये पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 22, 2024 | 12:09 PM
Israel-Hamas War: गाझामधील रेफ्यूजी कॅंपवर इस्रायलचा पुन्हा एकदा मोठा हल्ला; 33 पॅलेस्टिनी नागरिक ठार

Israel-Hamas War: गाझामधील रेफ्यूजी कॅंपवर इस्रायलचा पुन्हा एकदा मोठा हल्ला; 33 पॅलेस्टिनी नागरिक ठार

Follow Us
Follow Us:

गाझा: सध्या इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष गाझामध्ये अधिक तीव्र होत चालला आहे. इस्रायलने पुन्हा एकदा गाझामध्ये हवाई हल्ले केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या हवाई हल्ल्यात 33 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत. इस्त्रायली लष्कराने हे हल्ले गाझामधी रेफ्यूजी कॅंपवर केले आहेत. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. याआधी रविवारी झालेल्या हल्ल्यात 6 पॅलेस्टिनी ठार झाले होते. जेव्हा इस्रायली लष्कराने एका कारवर लक्ष्य करून हवाई हल्ला केला.

सर्वत्र शोककळा पसरली आहे

मीडिया रिपोर्टनुसार, इस्रायली सैन्य हमासच्या दहशतवाद्यांना संपुष्टात आणण्याच्या नावाखाली सतत पॅलेस्टिनींवर हल्ले करत आहे. रविवारी झालेल्या हल्ल्यात 6 जण ठार, तर अनेक जखमी झाले. जखमी आणि मृतांना अल-अक्सा शहीद रुग्णालयात नेण्यात असता, तेथे शोककळा पसरली होती. मृतांच्या कुटुंबीयांना त्यांच्या प्रियजनांच्या मृत्यूचे दु:ख होत असताना, नंतर नमाज अदा करून अंत्यसंस्कार करण्यात आले. ऑक्सफॅम या मानवतावादी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या हल्ल्यांत जबलिया येथे काम करणारे त्यांच्या 6 कामगारांचाही मृत्यू झाला आहे.

हे देखील वाचा- याह्या सिनवारच्या मृत्यूनंतर इस्रायलचा गाझामध्ये कहर; हमास लष्कराच्या निशाण्यावर

युद्ध थांबवण्याची मागणी

गाझा आणि लेबनॉनवर सतत होणाऱ्या हल्ल्यांविरोधात जगभरात निदर्शने सुरू आहेत. निदर्शकांनी इस्रायलला युद्ध थांबवण्याची आणि तातडीने युद्धबंदीची मागणी केली आहे.ऑक्टोबर 2023 पासून आतापर्यंत 42,500 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत आणि 70,000 पेक्षा जास्त गंभीर जखमी झाले आहेत. लाखो लोक बेघर झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच इस्रायलने गाझामधील बीट लाहिया शहरात मोठे हल्ले केले होते. या हल्ल्यामध्ये 73 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती हमासने दिली.

जागतिक पातळीवर चिंतेत वाढ

गाझा आणि लेबनीज सीमेवरील या ताज्या घटनांमुळे इस्रायल आणि हमास तसेच हिजबुल्ला यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक पातळीवर चिंता वाढत चालली आहे. तसेच एकीकडे रशिया-युक्रेनमध्ये देखील संघर्ष तीव्र होत चालला आहे.

हे देखील वाचा- रशियाचे कीववर सातत्याने ड्रोनने हल्ले सुरूच; झेलेन्स्की संतापले म्हणाले- याचे चोख प्रत्युत्तर मिळेल

Web Title: Israel strikes refugee camps in gaza again killing 33 palestinians nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 12:09 PM

Topics:  

  • Gaza
  • Hamas
  • Israel

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Gaza War: ‘भारत इस्रायलचा सर्वात मजबूत मित्र आणि UN अविश्वासार्ह’; जेरुसलेमच्या माजी उपमहापौरांचे मोठे विधान
2

Gaza War: ‘भारत इस्रायलचा सर्वात मजबूत मित्र आणि UN अविश्वासार्ह’; जेरुसलेमच्या माजी उपमहापौरांचे मोठे विधान

Benjamin Netanyahu UN : ‘गाझामधील नरसंहाराचा आरोप म्हणजे शतकातील सर्वात मोठे खोटे’; संयुक्त राष्ट्रांत नेतान्याहूंचा रोखठोक हल्ला
3

Benjamin Netanyahu UN : ‘गाझामधील नरसंहाराचा आरोप म्हणजे शतकातील सर्वात मोठे खोटे’; संयुक्त राष्ट्रांत नेतान्याहूंचा रोखठोक हल्ला

UN News : अजून कोण भित्रा असेल तर त्याने आत्ताच निघून जावे ; नेतान्याहू संतापले
4

UN News : अजून कोण भित्रा असेल तर त्याने आत्ताच निघून जावे ; नेतान्याहू संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.