
फोटो सौजन्य AI
मात्र त्यांच्या भाषणाला सुरवात होताच UN सभागृहातील डझनभर देशांच्या प्रतिनिधींनी सभागृहातून बाहेर पडत निषेध नोंदवला आहे . या घटनेमुळे नेतान्याहू यांच्या भाषणाची सुरवातच मोठ्या राजनैतिक गदारोळाने झाली . त्यामुळे जागतिक राजकारणात इस्रायलची नाचक्की झाली असल्याचे बोलले जात आहे . पण नेतन्याहू यांना याचा कितपत फरक पडतो हा देखील महत्वाचा मुद्दा आहे .
UN मध्ये नेतन्याहू भाषणासाठी व्यसपीठावर पोहोचताच अनेक देशांच्या प्रतिनिधींनी आपापल्या जागा सोडल्या आणि ते सगळे सभागृहातून बाहेर जाऊ लागले . पॅलेस्टानी मिशनने यापूर्वीही विविध UN सदस्य देशांच्या प्रतिनिधींना सामूहिक WALK OUT करण्याचे आवाहन केले होते .
त्यामुळे नेतन्याहू यांना आपला विरोध आणि निष्पाप लोकांना मारल्याचा राग व्यक्त करत भाषणाच्या सुरवातीलाच सभागृहातील अनेक जागा रिकाम्या झाल्या . यावर काही नेतन्याहू समर्थक टाळ्या वाजवत हलक्या घोषणाही देऊ लागले . आणि उपस्थितांपैकी काही जण हा क्षण कॅमेरात टिपत असल्याचे सुद्धा पाहायला मिळाले .
भाषणाच्या सुरवातीलाच प्रतिनिधी बाहेर जात असताना नेतान्याहू यांना प्रचंड राग आला . जवळपास तीन मिनिटे ते शांत बघत उभे राहिले . आणि नंतर जाणाऱ्या प्रतिनिधींकडे बघत त्यांनी टीका केली . त्यांनी उरलेल्या प्रतिनिधींनाही बाहेर जायचे असल्यास ते जाऊ शकतात असे सांगितले .
तसेच बाहेर पडणाऱ्यांना Moral Cowards असे संबोधले . त्यानंतर त्यांनी इस्रालयच्या लष्करी कारवायांचा बचाव करत इराण आणि गाझातील संघर्षावर आपली भूमिका मांडली . या Walk Out मुळे त्यांचा पारा तर चढला होता पण चेहऱ्यावर जास्त राग दाखवू शकले नाहीत . शेवटी जाणाऱ्या लोकांना अजून कोण भित्रा असेल तर लगेच जावा या वाक्यात त्यांचा राग हा जगाला दिसून आला आहे .
आपल्या भाषणात नेतन्याहू यांनी गाझामध्ये इस्रायलने नरसंहार केल्याचे आरोप अपेक्षेप्रमाणे फेटाळून लावले . इस्रायलवरील आंतरराष्ट्रीय टीकेचा उल्लेख करत त्यांनी आपल्या देशाच्या लष्करी कारवायांचे समर्थन केले . दरम्यान सभागृहात काही प्रतिनिधींनी नेतन्याहूंच्या भाषणाला समर्थनही दर्शवले . उलट पक्षी त्यांनी ग्रेटर इस्रायलची व्याख्या किंवा त्यांची अपेक्षा बोलून दाखवली .
आता सगळ्या जगाला माहिती आहे इस्रायलला ग्रेटर इस्रायल हवाय म्हणजे त्यांना अधिकची जमीन हवी आहे कारण कैक वर्षांपूर्वी यहुदी लोकं त्या जागेवर राहत होती म्हणून . मग याच न्यायाने अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचे काय करायचे कारण पूर्ण विस्थापित लोकांचे हे देश आहेत . रेड इंडियन लोकांना संपवून युरोपातील स्थलांतरित अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया मध्ये वसले आणि नंतर हेच लोक नंतर इथले मालक झाले . असे इतिहासातून आपल्याला दिसून येते .