इस्त्रायल-हिजबुल्लाह युद्ध संपणार? युद्धविरामासाठी इस्रायली कॅबिनेट घेणार बैठक
जेरुसेलम: सध्या इस्त्रायल-हिजबुल्लाह युद्धविरामाच्या चर्चा सुरू आहेत. या संदर्भात जागतिक स्तरावर महत्त्वाच्या हाचालीदेखील सुरू करण्यात आल्या असल्याचे सांगितले जात आहे. इस्रायली कॅबिनेट आज युद्धविराम कराराला मंजुरी देण्यासाठी बैठक घेणार अल्याची माहिती समोर आली आहे. हा करार येत्या काही दिवसांत अधिकृतपणे होण्याची शक्यता आहे, अशी माहिती इस्त्रायलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. लेबनीज अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वॉशिंग्टनने बेरूतला कराराची घोषणा काही तासांत व्हावी, अशी सूचना दिली आहे.
इंग्रजी वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल आणि लेबनॉनने इस्रायल-हिजबुल्लाह संघर्षविरामसाठीच्या कराराच्या अटींवर सहमती दर्शवली आहे. इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळाकडून या कराराला मंगळवारी मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने या अहवालाबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रीया दिलेली नाही. सध्या फक्त बैठकीच्या चर्चा सुरू आहेत.
इस्त्रायल-हिडबुल्लाह हल्ल्यांची मालिका सुरूच
दरम्यान, युद्धविरामाच्या हालचाली सुरू असतानाही इस्त्रायचे लेबनॉनवर हल्ले सुरू आहेत. काल झालेल्या इस्रायलच्या हवाई हल्ल्यात बेरूतमधील हिजबुल्लाहच्या नियंत्रणाखालील दक्षिण उपनगरातील मोठा भाग उद्ध्वस्त झाला. याआधीच्या हल्ल्यांमध्ये इस्रायलने बेरूतमध्ये 29 जणांचा बळी घेतला होता. हिजबुल्लाहनेदेखील या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इस्त्रायलवर सर्वात मोठा रॉकेट हल्ला केला. या हल्ल्यात हिजबुल्लाहने इस्त्रायलवर 250 क्षेपणास्त्रे डागण्यात आली.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
इस्त्रायलच्या प्रसिद्ध स्पाइक अँटी-टँक मिसाईलची कॉपी
25 ऑक्टोबरला लेबनॉनमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यामुळे तीन पत्रकारांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. तसेच अनेक जखमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार गटाने या घटनेचा निषेध करत, हा नागरिकांवर जाणीवपूर्वक केलेला हल्ला असल्याचे आणि स्पष्ट युद्ध गुन्हा असल्याचे म्हटले आहे.
हिजबुल्लाच्या लेबनॉनमधील लढाऊ गटाने इस्त्रायल विरोधात अलमास नावाच्या अत्याधुनिक मिसाइलचा वापर सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही मिसाइल प्रत्यक्षात इस्त्रायलच्या प्रसिद्ध स्पाइक अँटी-टँक मिसाईलची कॉपी आहे. या मिसाइलची रिव्हर्स इंजिनीअरिंग करून ही मिसाइल तयार करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे
परिस्थिती अजूनही चिंताजनक
दोन्ही देशांमध्ये करार झाल्यास हा संघर्ष संपण्याची आशा आहे. मात्र, वाढती हल्ल्यांची मालिका आणि यामुळे होणारी जीवितहानी पाहता, परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, या संघर्षात 3000 हून अधिक लोक मारले गेले आहेत, तर 10 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. यामुळे मानवीय संकट अधिक तीव्र झाले आहे. हवाई हल्ल्यांमुळे लेबनॉनचे अनेक भाग उद्ध्वस्त झाले आहेत, या संघर्षामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.