फोटो सौजन्य: सोशल मीडिया
जेरुसेलम: हिजबुल्लाच्या लेबनॉनमधील लढाऊ गटाने इस्त्रायल विरोधात अलमास नावाच्या अत्याधुनिक मिसाइलचा वापर सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही मिसाइल प्रत्यक्षात इस्त्रायलच्या प्रसिद्ध स्पाइक अँटी-टँक मिसाईलची कॉपी आहे. या मिसाइलची रिव्हर्स इंजिनीअरिंग करून ही मिसाइल तयार करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाहने 2006 मध्ये इस्त्रायलच्या स्पाइक मिसाइल ताब्यात घेतले आणि ती रिव्हर्स इंजिनीअरिंगसाठी इराणला पाठवली होती.
त्यानंतर इराणने या मिसाइलची रचना उलटून पाहिली आणि त्यावर आधीरितअलमास मिसाइल तयार केली. इराणने ही मिसाइल हिजबुल्लाहला पाठवली असून आता इस्त्रायलवर या मिसाइलने हल्ला करण्यात आला आहे. सुमारे 18 वर्षांनंतर हिजबुल्लाहने या नव्या प्रकारच्या मिसाइलचा वापर करत इस्त्रायली सैन्याच्या तळांवर, कम्युनिकेशन सिस्टीम आणि एअर डिफेन्स लाँचर्सवर हल्ले केले आहेत.
अलमास मिसाइलचे उत्पादन सुरु
इस्त्रायली अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलमास मिसाइल जवळपास 16 किलोमीटर अंतरावर अत्यंत अचूकपणे हल्ला करु शकते. आता हिजबुल्लाहने या अलमास मिसाइलचे उत्पादन करण्यास सुरूवात केली आहे. या अलमास मिसाइलला अरबी आणि फारसी भाषेत “हिरा” असे म्हणतात. या क्षेपणास्त्राद्वारे गाइडेड तंत्रज्ञानाचा वापर करुन या वाहने, ड्रोन, हेलिकॉप्टर तसेच खांद्यावरून डागता येते. ही मिसाइल लक्ष्यावर साइडऐवजी वरून हल्ला करते, त्यामुळे इस्त्रायल सैन्य तळांसाठी ती मोठा धोका बनली आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
रशियन क्षेपणास्त्रांचाही समावेश
मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायलने दक्षिण लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या मोठ्या शस्त्रसाठ्याचा शोध घेतला आहे. यात अलमास व्यतिरिक्त रशियन बनावटीच्या कोरनेट अँटी-टँक मिसाईल्सचाही समावेश आहे. हे आधुनिक शस्त्रास्त्र इस्त्रायलसाठी गंभीर आव्हान ठरत आहे.
इस्त्रायलचा बेरूतवर हवाई हल्ला
हिजबुल्लाह आणि इस्त्रायल यांच्यात हल्ले आणि प्रत्युत्तर हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. शनिवारी रात्री इस्त्रायलने लेबनानची राजधानी बेरूतवर हवाई हल्ला केला. यात एका निवासी इमारतीला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांत 20 लोक मृत्युमुखी पडले. इस्त्रायली सैन्याने या हल्ल्यांचे स्पष्टीकरण देताना म्हटले की, हा हल्ला हिजबुल्लाहच्या टॉप कमांडर मोहम्मद हैदरला मारण्यासाठी केला होता. मात्र, हिजबुल्लाहने दावा केला की या हल्ल्यात त्यांच्या कोणत्याही सदस्यमारला गेलेला नाही. हिजबुल्लाहच्या निवेदनानुसार, हल्ल्याच्या ठिकाणी त्यांचा एकही कमांडर उपस्थित नव्हता.
वाढता संघर्ष
इस्त्रायल-हिजबुल्लाह संघर्ष अधिकच तीव्र होत चालला आहे. आत्तापर्यंत या संघर्षात अनेक हिजबुल्ला कमांडर्स मारले गेले. तसेच लेबनॉनच्या पायाभूत सुविधांचेही या हल्ल्यांमुळे गंभीर नुकसान झाले. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, या संघर्षात 3000 हून अधिक लोक मारले गेले आहेत, तर 10 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. यामुळे मानवीय संकट अधिक तीव्र झाले आहे. हवाई हल्ल्यांमुळे लेबनॉनचे अनेक भाग उद्ध्वस्त झाले आहेत, ज्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे.