इस्त्रायल-सीरिया सीमेवर अतिशय तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. सीरियातील स्वेइडा शहरात झालेल्या हिंसाचारात ड्रुझ समुदायातील सुमारे ३०० जणांचा मृत्यू झाल्यानंतर परिस्थिती अधिकच बिघडली आहे. येत्या काळात सीरिया-इस्त्राईलमध्ये युद्ध पेटण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून सीरिया-इस्त्राईलमध्ये तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली होती. मात्र ती लवकरच मोडली जाण्याची शक्यता आहे. काहीही झाले तरी सीरियाला आम्ही आखलेल्या दोन सीमा पार करू देणार नाही असा इशारा इस्त्रायलने दिला आहे.
सीरियाने सुवेदा शहरात लष्कर तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला इस्त्रायलचा विरोध आहे. त्यामुळे हा वाद पुन्हा एकदा सुरु होण्याची शक्यता आहे. सुवेदामध्ये ड्रूझ लोकांची संख्या जास्त आहे. सीरियाच्या या निर्णयाला इस्त्रायलने जोरदार विरोध केला आहे. तसेच निर्णय मागे न घेलत्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा इस्त्रायलने दिला आहे.
४८ तासांमध्ये सीरियावर हल्ला होणार?
सीरिया-इस्त्रायलमध्ये युद्ध पेटण्याची शक्यता आहे. सीरिया सुवेदामध्ये सैन्य तैनात करण्याचा निर्णय मागे घेणार कि यावर ४८ तास लक्ष ठेवणार आहे. जर सीरियाने आपला निणर्य मागे घेतला नाही तर, इस्त्रायल सीरियावर थेट हल्ला करण्याची शक्यता आहे.
सीरियन टीव्ही चॅनेलवरच बॉम्बहल्ला
सीरियातील राजधानी दमास्कसमध्ये एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका स्थानिक टीव्ही चॅनेलवर महिला अँकर थेट प्रक्षेपणात बातम्या वाचत असताना, इस्रायली हवाई दलाने अचानक बॉम्बहल्ला केला. स्फोट इतका प्रचंड होता की अँकर घाबरून स्टुडिओतून धावत बाहेर पडली. या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
१६ जुलै २०२५ रोजी इस्रायलने सीरियाविरुद्ध कारवाईचा मोठा टप्पा सुरू केला. इस्रायली लष्कराने सीरियाची राजधानी दमास्कसमधील संरक्षण मंत्रालयाजवळ आणि राष्ट्रपती राजवाड्याजवळ ड्रोनच्या माध्यमातून हल्ले केले. या हल्ल्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सीरियन लष्करी तळ आणि प्रशासनावर दबाव आणणे. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गालांत आणि इस्रायल काट्झ यांनी सोशल मीडियावरून या कारवाईची पुष्टी केली आहे. मंत्री काट्झ यांनी सांगितले की, “दमास्कसच्या संरक्षण मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर अचूक हल्ला केला गेला असून, हे हल्ले आता सुरूच राहणार आहेत.” सध्या सीरियाच्या दक्षिणेकडील सुवैदा भागात स्थानिक सुरक्षा दल आणि ड्रुझ समुदाय यांच्यात संघर्षाचे वातावरण तापले आहे. ड्रुझ हा एक धार्मिक वांशिक समुदाय असून, त्यांची उपस्थिती सीरिया, लेबनॉन, जॉर्डन आणि इस्रायलमध्ये आढळते. इस्रायलने उघडपणे जाहीर केले आहे की ते सीरियामधील ड्रुझ लोकांच्या संरक्षणासाठी आयडीएफ (इस्रायली डिफेन्स फोर्सेस) मार्फत कारवाई करत आहेत.