सीरियामध्ये अँकर सांगत होती news अन् इस्रायलचा थेट टीव्ही चॅनेलवरच बॉम्बहल्ला; पाहा VIRAL VIDEO ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Israel Syria War Viral Video : सीरियातील राजधानी दमास्कसमध्ये एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका स्थानिक टीव्ही चॅनेलवर महिला अँकर थेट प्रक्षेपणात बातम्या वाचत असताना, इस्रायली हवाई दलाने अचानक बॉम्बहल्ला केला. स्फोट इतका प्रचंड होता की अँकर घाबरून स्टुडिओतून धावत बाहेर पडली. या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
१६ जुलै २०२५ रोजी इस्रायलने सीरियाविरुद्ध कारवाईचा मोठा टप्पा सुरू केला. इस्रायली लष्कराने सीरियाची राजधानी दमास्कसमधील संरक्षण मंत्रालयाजवळ आणि राष्ट्रपती राजवाड्याजवळ ड्रोनच्या माध्यमातून हल्ले केले. या हल्ल्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सीरियन लष्करी तळ आणि प्रशासनावर दबाव आणणे. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गालांत आणि इस्रायल काट्झ यांनी सोशल मीडियावरून या कारवाईची पुष्टी केली आहे. मंत्री काट्झ यांनी सांगितले की, “दमास्कसच्या संरक्षण मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर अचूक हल्ला केला गेला असून, हे हल्ले आता सुरूच राहणार आहेत.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 8 वर्षांची तपश्चर्या! रशियाची ‘ती’ रहस्यमय साध्वी, गोकर्ण जंगलात गुहा, गुहेत रुद्र मूर्ती; वाचा ‘ही’ गूढ रंजक कहाणी
सध्या सीरियाच्या दक्षिणेकडील सुवैदा भागात स्थानिक सुरक्षा दल आणि ड्रुझ समुदाय यांच्यात संघर्षाचे वातावरण तापले आहे. ड्रुझ हा एक धार्मिक वांशिक समुदाय असून, त्यांची उपस्थिती सीरिया, लेबनॉन, जॉर्डन आणि इस्रायलमध्ये आढळते. इस्रायलने उघडपणे जाहीर केले आहे की ते सीरियामधील ड्रुझ लोकांच्या संरक्षणासाठी आयडीएफ (इस्रायली डिफेन्स फोर्सेस) मार्फत कारवाई करत आहेत. सुवैदामधून सीरियन सैन्य माघारी जाईपर्यंत इस्रायलचा हल्ला सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा इस्रायलने दिला आहे. “आमचे इशारे संपले आहेत. आता कठोर कारवाई होणार,” असे इस्रायली संरक्षणमंत्र्यांनी ठणकावले.
החלו המכות הכואבות pic.twitter.com/1kJFFXoiua
— ישראל כ”ץ Israel Katz (@Israel_katz) July 16, 2025
credit : social media
हा इस्रायलकडून सलग तिसऱ्या दिवशी सीरियावर हल्ला करण्यात आला आहे. मंगळवारी (१५ जुलै) इस्रायली हवाई दलाने सुवैदा आणि आसपासच्या सीरियन सैन्याच्या गाड्यांच्या काफिल्यावर हल्ला केला. यामध्ये अनेक सैनिक जखमी आणि ठार झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यामुळे स्थानिक ड्रुझ समुदाय, बेदौइन जमाती आणि सीरियन सरकारमध्ये निर्माण झालेल्या संघर्षात आणखी तीव्रता आली आहे.
या सर्व घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे एका महिला अँकरवर थेट प्रक्षेपणादरम्यान झालेला हल्ला. स्फोटाचा आवाज आणि धुराचे लोट स्टुडिओपर्यंत पोहोचले आणि अँकर घाबरून धावत बाहेर गेली. हे दृश्य पाहून संपूर्ण जग हादरले असून, युद्धाची भीषणता किती टोकाची जाऊ शकते, याचे जिवंत उदाहरण ठरले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ब्रह्मांड अफाट आहे! पृथ्वीभोवती फिरत आहेत ‘लपलेले चंद्र’? संशोधनातून उघड झाले मिनीमूनचे अद्भुत रहस्य
सीरियामधील लष्करी हालचाली, ड्रोन हल्ले आणि ड्रुझ समुदायाशी संबंधित राजकीय समीकरणांमुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. दोन्ही देशांतील तणाव दिवसेंदिवस वाढत असून, या संघर्षाचे पडसाद संपूर्ण पश्चिम आशियावर उमटू शकतात.