
italy covo gurudwara shooting two indians killed vaisakhi 2026 updates
Mata Sahib Kaur Ji Gurudwara Italy attack : परदेशातून पुन्हा एकदा भारतीयांच्या सुरक्षेबाबत अत्यंत वेदनादायी बातमी समोर आली आहे. उत्तर इटलीतील (Italy) कोवो (Covo) शहरात शुक्रवारी मध्यरात्री दोन भारतीय वंशाच्या पुरुषांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना अशा वेळी घडली जेव्हा संपूर्ण शीख समुदाय वैशाखीच्या पवित्र सणाची तयारी करत होता. माता साहिब कौर जी गुरुद्वाराच्या परिसरात घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे स्थानिक प्रशासनासह जगभरातील भारतीय समुदायात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजिंदर सिंग (४८) आणि गुरमीत सिंग (४८) हे दोघे शुक्रवारी रात्री सुमारे १२ वाजता गुरुद्वारामध्ये सेवेसाठी आले होते. दर्शन आणि सेवा आटोपून ते जसे गुरुद्वाराच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडले, तसे आधीच दबा धरून बसलेल्या हल्लेखोराने त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव सुरू केला. राजिंदर सिंग हे कोवो येथील रहिवासी होते, तर गुरमीत सिंग हे जवळच्या अग्नाडेलो भागातून आले होते. हल्लेखोराने इतक्या जवळून गोळ्या झाडल्या की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे १० रिकामी काडतुसे जप्त केली आहेत, ज्यावरून हल्ल्याची भीषणता लक्षात येते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : RELOSA : 3000 सैनिक, 10 जेट विमाने, 5 युद्धनौका! होर्मुझमधील जहाजावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
इटलीचे स्थानिक वृत्तपत्र ‘ला सिसिलिया’ आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कोणतीही आकस्मिक घटना नसून एक पूर्णपणे आखलेले ‘टार्गेट किलिंग’ (Targeted Killing) आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर देखील भारतीय वंशाचाच आहे. तो गुरुद्वारात वारंवार येत असे आणि स्थानिक शीख समाजात तो परिचित होता. या गोळीबारात तिसरी एक व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे. हल्ल्यानंतर आरोपी गाडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Two #Indian men shot dead in #Italy while leaving gurdwarahttps://t.co/WAPzVZxeWm — CNBC-TV18 (@CNBCTV18Live) April 19, 2026
credit – social media and Twitter
१६९९ मध्ये गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेल्या खालसा पंथाच्या स्मरणार्थ वैशाखीचा सण साजरा केला जातो. कोवो येथील गुरुद्वारात या निमित्ताने मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये स्थानिक महापौरांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार होते. मात्र, या हत्येमुळे उत्साहाचे वातावरण आता शोकात बदलले आहे. कोवोच्या महापौरांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या १५ वर्षांपासून या शहरात शीख समुदाय अत्यंत शांततेने आणि सलोख्याने राहत आहे. अशा प्रकारची हिंसक घटना यापूर्वी कधीही घडली नव्हती.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Qalibaf : ‘आमच्या नादी लागू नका, अन्यथा पूर्ण ताकदीने ठेचू!’ इराणचे अध्यक्ष गालिबाफ यांची डोनाल्ड ट्रम्प यांना उघड धमकी
मृत गुरमीत सिंग यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर डोंगर कोसळला आहे. इटालियन पोलिसांनी सध्या सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून साक्षीदारांची चौकशी सुरू आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाव्हिया येथे पाठवण्यात आले आहेत. भारतीय दूतावास देखील या प्रकरणावर लक्ष ठेवून असून मृतांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
Ans: ही घटना उत्तर इटलीतील कोवो (Covo) शहरातील बर्गामो औद्योगिक परिसरात असलेल्या माता साहिब कौर जी गुरुद्वाराबाहेर घडली.
Ans: राजिंदर सिंग (४८) आणि गुरमीत सिंग (४८) अशी या घटनेतील मृत भारतीय वंशाच्या व्यक्तींची नावे आहेत.
Ans: पोलिसांनी याला 'टार्गेट किलिंग' म्हटले असून हल्लेखोर परिचित भारतीय वंशाचा व्यक्ती असण्याची शक्यता वर्तवली आहे.