
Jaish-e-Mohammed to set up camp to train women and children in PoK
LoC वर घुसखोरीचा प्रयत्न! पुंछमध्ये पाकिस्तानी महिलेला अटक; दहशतवादी कनेक्शन उघड
मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ साठी जैशने मोठ्या प्रमाणावर दहशतवादी ट्रेनिंग आणि त्याच्या मोहिमा आखल्या आहेत. १ जानेवारी २०२६ पासून मीरपूर, PoK येथे ७ दिवसांचे दहशतवादाचे प्रशिक्षण ठेवले आहे. दौरा-एतरबिया ट्रेनिंग कॅम्पचे आयोजने करण्याची योजना आखली आहे. यामधून तो महिला आणि मुलांना ट्रेनिंग देणार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कॅम्पमध्ये महिला, तरुण, लहाने मुलांचा सहभाग गेल्या काही दिवसांपासून करुन घेतला जात आहे.
रिपोर्टनुसार, जैश महिलांची एक स्वतंत्र दहशतवादी संघटना उभारण्याची तयारी करत आहे. यासाठी त्याने मसूद अझहरची बहिीण सैदा अजहरला संघटनेचे नेतृत्त्व दिले असल्याचे सांगितले जाक आहे. सैदा अझहर महिलांचे ब्रेनवॉश करुन त्यांनी दहशतवादी ट्रेनिंग देत आहे. त्यांना दहशतवादी कायवायांमध्ये सहभागी करत असल्याचे सुरक्षा तज्ज्ञांनी सांगितले आहे.
याच वेळी जैशने गढी हबीबुल्लाह, बालाकोटासारख्या भागांमध्ये देखील बैठका आणि रॅली काढण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी गटात भरतीसाठी उघडपणे सुरुवात केली आहे. यामध्ये लहान मुलांचे देखील ब्रेनवॉश केले जात असून त्यांना कट्टर विचारसणीकडे वळवले जात आहे जैशरने काश्मीर टायगर्स हा त्याचा गट असल्याची कबुली दिली आहे.
याच वेळी दुसरीकडे लष्कर-ए-तैयबा (LeT) ही दहशतवादी संघटना देखील सक्रिय झाली आहे. या दहशतवादी संघटनेने देखील कॅम्पची तयारी केली आहे. LeT ने लाओर दीर परिसरात जिहाद-ए-अक्सा नावाचे प्रशिक्षण कॅम्प सुरु केले आहे. LeT देखील लोकांची गटामध्ये भरीत करत आहे. पाकिस्तानमध्ये या दोन्ही संघटनांवर अधिकृतपणे बंदी असल्याचे सांगितले जाते, मात्र या संघटना पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले होते. आता मात्र तो वेगाने सक्रिय होत असून दहशतवादी कारवायांच्या योजना आखत असल्याचे तपास यंत्रणांनी म्हटले आहे.
या सर्व घडमोडींदरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण कायम आहे. असीम मुनीर देखील भारताबाब वादग्रस्त विधाने करत आहे. अशा परिस्थितीत भारतासोमर अनेक आव्हाने उभी राहिली असून त्यांना सामोरे जाणे कठीण जाणार आहे.