भारताविरुद्ध पाकिस्तानचा नवा कट? बहावलपूरमध्ये 'या' दोन दहशतावादी गटांची गुप्त बैठक, महिलांचाही समावेश (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारताविरोधात शेजारील देशांच्या कुरघोड्या वाढल्या? पाकिस्तान पुरवणार बांगलादेशला शस्त्रं
सध्या भारतीय सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बहावलपूर येथे दहशतवादी मसूद अजहरच्या मुख्य टिकाणी लष्कर-ए-तैयबाच्या डिफ्टी चीफ सैफुल्लाह कसुरीने बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला धार्मिक स्वरुप देण्यात आले होते. सीत-एतनबी आणि सहीह बुखारी असे याचे नाव होते. परंतु सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली येथे दहशतवादी संघटना एकत्र आल्या आहेत. सैफुल्लाह कसुरीने मोहम्मद अजहरची भेट घेतली आहे. हा भारताविरोधी मोठा कट रचला जात असल्याचा संशय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
चिंताजनक बाब म्हणजे या कार्यक्रमाला महिलांना देखील उपस्थित दर्शवली होती. यामुळे तज्ज्ञांनी महिलांद्वारे भविष्यातील दहशतवादी कारवाया सुरु असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणेंची भीती अधिक वाढली आहे. या बैठकीपूर्वी दिल्लीमध्ये लाला किल्ली परिसरात झालेल्या स्फोटात महिलांचा समावेश होता. तपास यंत्रणेच्या प्राथमिक तपासानुसार महिला डॉ. शाहीनने हा दहशतावदी हल्ला घडवून आणण्यात मदत केली होती. शाहीनचा दहशतवादी मसूद अझहरच्या पुतण्या आफिराहची पत्नी अफिरा बीबीशी संपर्क असल्याचेही आढळून आले होते.
सध्या महिला जिहादींचा धोका वाढत असून मिळालेल्या माहितीनुसार, आफिरा बीबीने भारतात दहशतवादाचे जाळे उभारण्याचा त्यांचा प्रयत्न करत आहे. यामध्ये विशेष करुन महिलांचा समावेश आहे. यामुळे जागतिक स्तरावर देखील गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय दिल्ली हल्ल्यानंतर दहशतावादी गटांच्या बैठकांमुळे भारतविरोधी कट रचाला जात असल्याचा अधिक संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा सध्या हाय अलर्ट मोडवर आहेत.






