LoC वर घुसखोरीचा प्रयत्न! पुंछमध्ये पाकिस्तानी महिलेला अटक; दहशतवादी कनेक्शन उघड (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार भारतीय लष्कराने जम्मू आणि काश्मीर येथील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LoC)वर घुसखोरी करताना एका महिलेला अटक केली आहे. ही महिला पाकव्याप्त काश्मीरमधून भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी तिचा हा प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुप्तचर यंत्रणांनी या महिलाचा पाकिस्तानी दहशवादी गटन जैश-ए-मोहम्मदच्या महिला दहशवादी विभागाशी संबंध असल्याची शक्यता व्यक्क केली आहे. सध्या या महिलेची चौकशी सुरु आहे.
शेहनाज अख्तर अशी या महिलेची ओळख पटवण्यात आली आहे. शेहनाज पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) कोटली जिल्ह्यातील गिम्माची रहिवाशी आहे. गुप्तचर यंत्रणांच्या तपासानुसार, ही महिला एका पाकिस्तानी लष्करी चौकीजवळ थांबली होती. पुंछ येथे मेंढर उपविभागजवळ नियंत्रण रेषेजवळ तिने घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी सैन्याला संशयास्पद हालचाली दिसताच तातडीने कारवाई करण्यात आली. तिला यासाठी १००० रुपये देण्यात आले असल्याचेही समोर आले आहे.
गुप्तचर यंत्रणानी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी जैश-ए-मोहम्मद मसूद अझहरचा एक ऑडिओ व्हायरल झाला होता. या ऑडिओमध्ये हजारो महिला दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या ऑडिओच्या व्हायरल झाल्यानंच्या एक आठवड्यानंतरच शहनाजला LoC जवळ अटक करण्यात आली आहे.
सध्या शहनाजला लष्करी छावणीत ठेवण्यात आले असून महिला पोलिस संयुक्त पथक सध्या तिच्या भारतात घुसण्यामागच्या हेतूची आणि संभ्याव दहशवादी हल्ल्यांच्या माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
काही दिवसांपूर्वी दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबा (LeT) आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनांनी बहावलपूर येथे गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली होती. या बैठकीत महिलांचाही समावेश असल्याचे उघड झाले होते. सध्या महिला जिहादींचा धोका वाढत असून घुसखोरीच्या या प्रयत्नानंतर भारतीय सैन्य हाय अर्टवर आहे.
पाकिस्तानचा माज काही उतरेना! खिसा रिकामा झाला तरी भारतीय विमानांच्या उड्डाणावर घातली बंदी
Ans: भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीर येथील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LoC)वर घुसखोरी करताना एका पाकिस्तानी महिलेला अटक केली आहे.
Ans: शेहनाज अख्तर अशी या महिलेची ओळख पटवण्यात आली आहे. शेहनाज पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) कोटली जिल्ह्यातील गिम्माची रहिवाशी आहे.
Ans: गुप्तचर यंत्रणांनी या महिलाचा पाकिस्तानी दहशवादी गटन जैश-ए-मोहम्मदच्या महिला दहशवादी विभागाशी संबंध असल्याचा म्हटले आहे.
Ans: पाकिस्तानी महिला शहनाजला भारतात घुसखोरीसाठी 1000 रुपये देण्यात आले होते.






