
S. Jaishankar
Canada G-7 Summit News in Marathi : ओटावा : नुकेतच कॅनडामध्ये परराष्ट्र मंत्र्यांची G-7 परिषदत पार पडली. या परिषदेसाठी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी देखील उपस्थित दर्शवली होती. यावेळी जयशंकर यांनी जर्मनी, फ्रान्ससह अनेक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली.
India Canada Relations : एस. जयशंकर पुढील आठवड्यात कॅनडा दौऱ्यावर ; भारताशी संबंधाना मिळणार नवी दिशा
जयशंकर यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, G-7 बैठकीदरम्यान ब्रिटनचे परराष्ट्र सचिव यवेट कूपर यांची भेट घेतली. जयशंकर यांनी सागंतिले की, या चर्चेत भारत आणि ब्रिटन संबंधाचा आढावा घेण्यात आला. तसेच २०३५ च्या व्हिजनसाठी पुन्हा एकदा मान्यत देण्यात आली. यामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, संरक्षण, हवामान बदल आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यात येणार आहे. यामुळे दोन्ही देशांच्या विकासाला चालना मिळेल.
Glad to meet UK Foreign Secretary @YvetteCooperMP on the sidelines of #G7 FMM in Canada today. Acknowledged the positive momentum in our relations and reaffirmed the 🇮🇳🇬🇧 Vision 2035 for further deepening cooperation across key areas. pic.twitter.com/OPHWuDJ5D3 — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) November 11, 2025
याशिवाय जयशंकर यांनी जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वाडेफुल यांच्याशीही चर्चा केली. यामध्ये भारत आणि जर्मनीमधील धोरणात्मक भागीदारी वाढवण्यावर, तसेच भारत युरोपियन युनियन संबंधांना दृढ करण्यावर भर देण्यात आला. तसेच काही आंतरराष्ट्रीय मुद्यांवरही चर्चा करण्यात आली, ज्यामध्ये पश्चिम आशियामध्ये अफगाणस्तानमध्ये सुरु असलेल्या घडामोडी, इंडो-पॅसिफिक यावर विचारांची देवाणघेवाण झाली. यामुळे प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक शांततेसाठी सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.
Great to meet FM @JoWadephul of Germany in Niagara today. Discussed advancing our Strategic Partnership and India-EU ties. Exchanged views on Middle East/West Asia, Indo-Pacific and Afghanistan. 🇮🇳 🇩🇪 pic.twitter.com/uDS6hTb4nT — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) November 11, 2025
जयशंकर यांनी ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री मौरो विएरा यांच्याशी व्यापार, गुंतवणूक, आरोग्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. भारत आणि ब्राझीलचे संबंध ग्लोबल साऊ थ देशांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.
Good to see FM Mauro Vieira of Brazil this afternoon. Recognized the recent progress in our bilateral cooperation. We are actively exploring opportunities for greater trade, investment, health and technology cooperation. 🇮🇳 🇧🇷 pic.twitter.com/bJQK5dAfIs — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) November 11, 2025
फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन-नोएल बॅरोट यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधावर आणि धोरणात्मक भागीदारीवर जयशंकर यांनी आढावा घेतला. तसेच फ्रान्स आणि भारतामध्ये संरक्षण, अवकाश, उर्जा क्षेत्रांमध्ये संबंध अधिक बळकट करण्यावरही चर्चा झाली.
Glad to meet FM @jnbarrot of France. Took stock of our Strategic Partnership. Discussed deepening our cooperation in multilateral and plurilateral formats. 🇮🇳 🇫🇷 pic.twitter.com/ch6qC9mBTg — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) November 11, 2025
याशिवाय जयशंकर यांनी साउथ आफ्रिकेचे परराष्ट्र मंत्री रोनाल्ड लामोला, मेक्सिकोचे डॉ. जुआन रॅमोन दे ला फुएंटे, आणि कॅनडाच्या समकक्ष अनिता दाते यांचीही भेट घेतली. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा हा दौरा भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. यामुळे ग्लोबल साऊथची ताकद म्हणून भारत भूमिका बजावत आहे.