India Canada Relations : एस. जयशंकर पुढील आठवड्यात कॅनडा दौऱ्यावर ; भारताशी संबंधाना मिळणार नवी दिशा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
S.Jaishankar Canada Visit : नवी दिल्ली/ओटावा : भारत आणि कॅनडा संबंधामध्ये सुधारणा होताना दिसून येत आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी (Mark Carney) यांच्या सत्ते आल्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधाना एक नवी दिशा मिळताना दिसून आली आहे. येत्या आठवड्यात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) देखील कॅनडाच्या दौऱ्यावर जाणार आहे. याचा उद्देश अलीकडे सुधारलेले भारत आणि कॅनडा संबंध अधिक दृढ करणे आहे.
भारतीय वंशाचे ममदानी यांनी न्यूयॉर्कमध्ये उडवला विजयी गुलाल; बनले पहिले मुस्लिम महापौर
ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, येत्या आठवड्यात ११-१२ नोव्हेंबर रोजी जयशंकर कॅनडाला जाणार आहेत. येथे ते ओंटारियोच्या नायगारा प्रदेशात होणाऱ्या G7 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होतील. एस. जयशंकर यांचा दौरा सध्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दोन्ही देशांतील संबंध सुधारत आहेत.
तसेच गेल्या महिन्यात कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनी देखील भारताला भेट दिली होती. त्यांनी यावेळी एस. जयशंकर आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली होती. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचीही भेट घेतली होती. तसेच कॅनडाने G7 परिषदेसाठी मोदींना आमंत्रणही दिले होते.
कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर यांची १८ जून २०२३ रोजी हत्या करण्यात आली होती. गुरुद्वाराबाहेर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. तसेच भारताने निज्जरला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून घोषित केले होते. निज्जरवर भारतात अनेक खून आणि दहशतवादी कारवायां केल्याचा आरोप होता.
पण कॅनडाने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांच्या निज्जरच्या हत्येत भारताचा सहभागाच्या आरोपामुळे हे संबंध अधिक बिघडले. परंतु कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याच्या सकारात्मक दृष्टीकोनाने भारताला परिषेदसाठी आमंत्रण मिळाले आहे.
External Affairs Minister Jaishankar to visit Canada next week (file pic) pic.twitter.com/yG66JR8Jv5 — ANI (@ANI) November 5, 2025
कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी भारतासोबत मैत्री सुधारण्याची भूमिका स्वीकारली आहे. मात्र यामुळे कॅनडातील खलिस्तानी नाराज झाल्याचे दिसून येत आहे. कट्टर खलिस्तानी समर्थक संस्था शीख फॉर जस्टिस (SFJ) ने भारताविरोधात युद्ध पुकारले आहे. त्यांनी व्हॅंकुव्हरमधील भारतीय दूतावास ताब्यात घेण्याची धमकीही दिली होती.
भारत आणि कॅनडातील संबंध का बिघडले होते?
खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर यांची २०२३ मध्ये हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येचा आरोप कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिनी ट्रुडो यांनी भारतावर केला होता. यामुळे भारत कॅनडा संबंध ताणले गेले.
खलिस्तानी समर्थकांनी भारताला काय धमकी दिली?
खलिस्तानी समर्थकांनी भारताला कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेण्याची धमकी दिली आहे.






