Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Toshisuke Kanazawa : ‘या’ व्यक्तीने वयाच्या 90 व्या वर्षी बॉडीबिल्डिंगमधून जिंकली पदके; ‘हा’ जपानी आहार ठरला अत्यंत प्रभावी

Toshisuke Kanazawa : वर्षीय कानाझावा यांनी ३१ ऑगस्ट रोजी जपानमध्ये झालेल्या एका स्पर्धेत विजेतेपद पटकावले. ते एक बॉडीबिल्डर असून कमालीचे तंदुरुस्त आहेत. त्यांनी एका मुलाखतीत आपल्या तंदुरुस्तीचे रहस्य उघड केले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 25, 2026 | 03:21 PM
90 year old Japanese bodybuilder Toshisuke Kanazawa

90 year old Japanese bodybuilder Toshisuke Kanazawa

Follow Us
Follow Us:
  • वयाच्या ९० व्या वर्षी १९ वे विजेतेपद
  • पत्नीची प्रेरणा अन् पुनरागमन
  • १००% नैसर्गिक दिनचर्या व आहार

आजच्या काळात जिथे वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर अनेक लोक विविध आजारांनी ग्रासले जातात किंवा शारीरिक थकव्याची तक्रार करतात, तिथे जपानमधील एका ९० वर्षीय वृद्धाने जगभरातील तरुणांना अवाक केले आहे. ९० वर्षे वय असलेल्या तोशिसुके कानाझावा (Toshisuke Kanazawa) यांनी ३१ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या मास्टर्स बॉडीबिल्डिंग स्पर्धेत ८५ वर्षांवरील वयोगटात आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदक पटकावले. ही केवळ एक स्पर्धा नव्हती, तर त्यांच्या जिद्दीची आणि शिस्तबद्ध जीवनशैलीची एक जिवंत साक्ष होती. या विजयासोबतच कानाझावा यांनी आपल्या कारकिर्दीतील १९ वे राष्ट्रीय विजेतेपद स्वतःच्या नावावर केले आहे.

ज्या वयात बहुतांश ज्येष्ठ नागरिक घरात आराम करतात किंवा अंथरुणाला खिळलेले असतात, त्या वयात कानाझावा हे स्टेजवर जाऊन आपल्या स्नायूंची (Muscles) फ्लॉंटिंग करत आहेत आणि जगातील सर्वात वयस्कर सक्रिय बॉडीबिल्डर म्हणून नाव कमवत आहेत. द गार्डियन आणि सीएनएन (CNN) सारख्या जागतिक वृत्तसंस्थांशी बोलताना त्यांनी आपल्या या अद्भूत तंदुरुस्तीचे रहस्य आणि जीवनप्रवास उलगडला आहे.

कोण आहेत तोशिसुके कानाझावा? जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास

तोशिसुके कानाझावा यांचा जन्म १९३६ मध्ये जपानमधील शिमाने प्रांतात झाला. लहानपणापासूनच त्यांना क्रीडा क्षेत्राची विशेष आवड होती. हायस्कूलमध्ये असताना त्यांनी पोहणे आणि कुस्ती या खेळात पहिले पदक जिंकले. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी बॉडीबिल्डिंगमध्ये गांभीर्याने रस घेण्यास सुरुवात केली आणि २४ व्या व ३७ व्या वर्षी ‘मिस्टर जपान’चा किताबही पटकावला. मात्र, सततचा सराव आणि शारीरिक ताण यामुळे त्यांनी वयाच्या ३४ व्या वर्षी बॉडीबिल्डिंगमधून संन्यास घेतला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट

परंतु, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. जेव्हा कानाझावा ५० वर्षांचे झाले, तेव्हा त्यांच्या पत्नीची प्रकृती बिघडू लागली. आजारी पत्नीला मानसिक बळ देण्यासाठी, तिच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आणि तिला आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा देण्यासाठी कानाझावा यांनी पुन्हा एकदा जिममध्ये जाण्याचा आणि शरीरसौष्ठवात पुनरागमन करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या पत्नीचे निधन झाले असले, तरी आजही ते प्रत्येक स्पर्धेत उतरताना आपल्या पत्नीची आठवण ठेवतात आणि तिच्याच प्रेरणेने स्टेजवर विजय मिळवतात.

१००% नॅचरल बॉडी: काय आहे कानाझावा यांच्या आहाराचे रहस्य?

आजच्या बॉडीबिल्डिंग जगतात अनेक तरुण शॉर्टकट म्हणून स्टिरॉइड्स किंवा सप्लीमेंट्सचा वापर करतात. मात्र, कानाझावा ठामपणे सांगतात की त्यांचे शरीर १००% नैसर्गिक आहे. त्यांनी कोणत्याही कृत्रिम औषधांचा वापर न करता केवळ योग्य आहार आणि शिस्तबद्ध व्यायामाच्या जोरावर आपले स्नायू टिकवून ठेवले आहेत.

कानाझावा यांच्या आहारातील मुख्य नियम म्हणजे त्यांनी मासे आणि मांस खाणे पूर्णपणे सोडून दिले आहे, म्हणजेच ते शाकाहारी जीवनशैलीचे पालन करतात. याशिवाय, त्यांनी आयुष्यात कधीही मद्यपान (Alcohol) केलेले नाही. त्यांच्या दैनंदिन आहारात खालील गोष्टींचा प्रामुख्याने समावेश असतो:

  • सकाळचा नाश्ता: ब्राऊन राईस (तांदूळ), नाटो (किण्वित केलेले सोयाबीन – Fermented Soybeans) आणि पारंपारिक मिसो सूप.
  • दुपारचे व रात्रीचे जेवण: ब्राऊन राईस ज्यावर जपानी मसाले (फुरिकाके) मिसळलेले असतात.
  • प्रोटीन आणि इतर: ते दररोज २ अंडी खातात आणि दिवसातून ३ वेळा प्रोटीन शेक पितात (पूर्वी ते ६ वेळा प्यायचे).

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

नियमित सराव आणि भविष्याची स्वप्ने

केवळ आहारच नाही, तर कानाझावा आजही दररोज न चुकता जिममध्ये जातात आणि वजन उचलण्याचा (Weight Training) सराव करतात. यासोबतच, शरीराला पूर्ण विश्रांती देण्यासाठी ते दररोज सात तासांची गाढ झोप घेतात.

“वय वाढणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ती आपण थांबवू शकत नाही; पण योग्य आहार आणि सरावाने आपण वृद्धत्वाचा वेग नक्कीच मंदावू शकतो,” असे कानाझावा विश्वासाने सांगतात. वयाच्या ९० व्या वर्षीही ते थांबायला तयार नाहीत. ६० वर्षांवरील वयोगटाच्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणे हे त्यांचे पुढील ध्येय आहे. याशिवाय, हॉलीवूड स्टार आणि बॉडीबिल्डिंगचे दिग्गज आर्नॉल्ड श्वार्झनेगर यांना प्रत्यक्ष भेटण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे.

तोशिसुके कानाझावा यांचा हा जीवनप्रवास सिद्ध करतो की, जर तुमच्याकडे दृढ इच्छाशक्ती, संयम आणि योग्य जीवनशैली असेल, तर वय हे तुमच्या स्वप्नांच्या आड कधीही येऊ शकत नाही.

Web Title: Japan 90 year old bodybuilder toshisuke kanazawa wins 19th national title fitness diet secrets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • fitness secret
  • Japan
  • japan news

संबंधित बातम्या

Asian Games 2026 मध्ये पुरुष क्रिकेटला सुरुवात; भारताला कडवी झुंज, पण अफगाणिस्तानसमोर फुस्स, जपानचा घरच्या मैदानावर दारुण पराभव
1

Asian Games 2026 मध्ये पुरुष क्रिकेटला सुरुवात; भारताला कडवी झुंज, पण अफगाणिस्तानसमोर फुस्स, जपानचा घरच्या मैदानावर दारुण पराभव

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात
2

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

भलं मोठं संकट! Asian Games ला ‘या’ चक्रीवादळाचा रेड अलर्ट; ‘इतक्या’ वेगाने जपानवर धडकणार
3

भलं मोठं संकट! Asian Games ला ‘या’ चक्रीवादळाचा रेड अलर्ट; ‘इतक्या’ वेगाने जपानवर धडकणार

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!
4

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.