Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Japan Tsumani News: ३ फूट उंचीच्या लाटा, जपानमध्ये १६ ठिकाणी त्सुनामी; हवाई आणि आलास्काला धोक्याची घंटा

कॅनडाच्या पॅसिफिक कोस्ट प्रांतातील ब्रिटिश कोलंबियाच्या बहुतेक किनाऱ्यावर त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. त्सुनामीच्या इशाऱ्यामुळे प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर असलेल्या जपानी अणुऊर्जा प्रकल्पांचे काम थांबवले

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 30, 2025 | 12:04 PM
Japan Tsumani News: ३ फूट उंचीच्या लाटा, जपानमध्ये १६ ठिकाणी त्सुनामी; हवाई आणि आलास्काला धोक्याची घंटा
Follow Us
Close
Follow Us:

Russia Tusmnami News: रशियाच्या किनाऱ्यावर ८.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपानंतर रशियाच्या कुरिल बेटांच्या किनारी भागात आणि जपानच्या मोठ्या उत्तरेकडील बेट होक्काइडोच्या किनारी भागात त्सुनामी आली आहे. याशिवाय अमेरिकेच्या दक्षिणेकडील कॅलिफोर्निया, अलास्का, हवाई आणि न्यूझीलंडसारख्या इतर किनाऱ्यांसाठी देखील इशारा जारी करण्यात आला आहे.

जपानच्य हवामान खात्याने जारी केलेल्या सुचनेनुसार, जपानच्या १६ ठिकाणी ४० सेंटीमीटर (१.३ फूट) उंचीची त्सुनामी आढळून आली. या लाटा पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावर होक्काइडोपासून टोकियोच्या ईशान्येकडे दक्षिणेकडे सरकत आहेत. यानंतर लाटा आणखी मोठ्या होऊ शकतात. समुद्रात ३ फूट उंचीच्या लाटा उसळू शकतात, त्यामुळे हवामान खात्याने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, जपानमधील चिबा प्रांतातील तातेयामा शहरात अनेक व्हेल समुद्रकिनाऱ्यावर येऊन पोहोचल्याचेही सांगितले जात आहे.

आता ‘या’ आफ्रिकन देशातही दहशतवादाचे सावट; लष्करी हल्लात ५० सैनिकांचा मृत्यू

१० फूट उंच लाटांचा इशारा
पॅसिफिक महासागरात तीन मीटर (१० फूट) पेक्षा जास्त उंचीच्या लाटांसाठी इशारा देण्यात आला होता. रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सेवेरो-कुरिलस्क या बंदर शहराला त्सुनामी आली आहे. जिथे सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. शहराच्या काही भागातील इमारती समुद्राच्या पाण्यात बुडाल्या आहेत. रशियातील सरकारी माध्यमांनुसार, भूकंपात अनेक लोक जखमी झाले असले तरी कोणालाही गंभीर जखमी झाल्याचे वृत्त नाही.

हवाईमध्ये आणीबाणी

यासोबतच येत्या काही तासांत हवाई बेटावर त्सुनामीच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवाईचे गव्हर्नर जोश ग्रीन यांनी आणीबाणीची घोषणा केली आहे. रशियामध्ये झालेल्या भूकंपामुळे हवाईमध्ये त्सुनामीची धोक्याची घंटा देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. हजारो लोक उंच ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय उत्तर जपानमध्ये त्सुनामीचे सायरन वाजत आहेत आणि किनारी भाग रिकामे केले जात आहेत.

शक्तिशाली भूकंपाने हादरला रशिया; 8.7 तीव्रतेचा मोठा भूकंप, जपानपासून अमेरिकेपर्यंत त्सुनामीचा इशारा

याशिवाय, आलास्का येथील राष्ट्रीय त्सुनामी चेतावणी केंद्राने कॅलिफोर्निया, ओरेगॉन आणि वॉशिंग्टनच्या काही भागांसाठी त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. कॅनडाच्या पॅसिफिक कोस्ट प्रांतातील ब्रिटिश कोलंबियाच्या बहुतेक किनाऱ्यावर त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. त्सुनामीच्या इशाऱ्यामुळे प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर असलेल्या जपानी अणुऊर्जा प्रकल्पांचे काम थांबवण्यात आले आहे.

चीनला त्सुनामीचा इशारा

चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाच्या त्सुनामी चेतावणी केंद्राने शांघाय आणि झेजियांग प्रांतासह देशाच्या पूर्व किनारपट्टीच्या काही भागांसाठी इशारा जारी केला.  याशिवाय लाटा ०.३ ते १ मीटर (१ ते ३ फूट) उंचीपर्यंत पोहोचू शकतात,  असा इशारा देण्यात आला होता. बुधवारी झेजियांग प्रांतात कोमेई वादळ धडकण्याची शक्यता असल्याने शांघाय आणि झेजियांग शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दशकातील सर्वात शक्तिशाली भूकंप

जपानी आणि अमेरिकन भूकंपशास्त्रज्ञांनी सांगितले की, जपानी वेळेनुसार सकाळी ८:२५ वाजता झालेल्या भूकंपाची सुरुवातीची तीव्रता ८.० होती. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणाने नंतर त्याची तीव्रता ८.८ इतकी नोंदवली. मार्च २०११ मध्ये ईशान्य जपानमध्ये ९.० तीव्रतेच्या भूकंपानंतर जगातील हा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे, ज्यामुळे अणुऊर्जा प्रकल्पालादेखील मोठा धोका निर्माण झाला आहे.

 

Web Title: Japan tsumani news 3 feet high waves tsunami in 16 places in japan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 12:04 PM

Topics:  

  • Earthquake in Russia
  • japan news
  • Russia

संबंधित बातम्या

अमेरिकेनंतर आता रशियाही करणार अणु चाचणी? पुतिन यांनी सैनिकांना दिले तयारी करण्याचे आदेश
1

अमेरिकेनंतर आता रशियाही करणार अणु चाचणी? पुतिन यांनी सैनिकांना दिले तयारी करण्याचे आदेश

Donald Trump News : ‘या’ देशांकडून गुपचूप….; डोनाल्ड ट्रम्प यांच्या खळबळजनक दाव्याने वाढणार भारताची धडधड
2

Donald Trump News : ‘या’ देशांकडून गुपचूप….; डोनाल्ड ट्रम्प यांच्या खळबळजनक दाव्याने वाढणार भारताची धडधड

Donald Trump News: ‘आमच्याकडे इतके अणुबॉम्ब की १५० वेळा जग नष्ट होईल’; डोनाल्ड ट्रम्पचा धक्कादायक दावा
3

Donald Trump News: ‘आमच्याकडे इतके अणुबॉम्ब की १५० वेळा जग नष्ट होईल’; डोनाल्ड ट्रम्पचा धक्कादायक दावा

धडकी भरवणारा रशियाचा नवा डाव! युक्रेनच्या आरोपांमुळे वाढले  डोनाल्ड ट्रम्प यांचे टेन्शन?
4

धडकी भरवणारा रशियाचा नवा डाव! युक्रेनच्या आरोपांमुळे वाढले डोनाल्ड ट्रम्प यांचे टेन्शन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.