आता 'या' आफ्रिकन देशातही दहशतवादाचे सावट; लष्करी हल्लात ५० सैनिकांचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Burkina Faso Militant Attack : पश्चिम आफ्रिकन देश बुर्किना फासो येथे लष्करी तळावर मोठा दहशतवादी हल्ला (Terror Attack) करण्यात आला आहे. या हल्ल्यात ५० हून अधिक सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेसला स्थानिक समुदायाच्या प्रमुख हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, काही बंदुकधारी दहशतवाद्यांनी उत्तर बुर्किना फासोतील एका लष्करी छावणीवर धडाधड हल्ला केला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा हल्ला जिहादी गट जमात नुसरत अल-इस्लाम वाल मुस्लिमन (JNIM) या मुस्लीम दहशतवादी गटाने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संघटनेने हल्ला घडवून आणला असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. या दहशतवादी संघटनेवर रशियाने बंदी घातली आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, जवळपास १०० दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असून लष्करी छावणीवर लूटमार केली. तसेच छावणीला पेटवून दिले. मात्र यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
बार्किनो फुसोमधील नागरिक आणि सैनिकांच्या मृत्यूसाठी शसस्त्र दल JNIM या दहशतवादी संघटनेला जबाबदार धरले जात आहे. या देशातील मोठा भाग JNIM शसस्त्र गटांकडून नियंत्रित केला जातो. या संघटनेनेमुळे देशाच्या राजधानी बाहेर तीव्र हल्ले घडले आहे. सध्याची परिस्थितीत अत्यंत विकट होत चालली आहे.
तसेच वाढत्या दशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये सत्तापालटाच्या चर्चा सुरु आहे. राजकीय आणि लष्करी संघटनांची पुनर्स्थापना करण्यात आली आहे, असे असूनही लष्करी नेते इब्राहिम त्राओर दहशतवादी संघटानांना रोखण्यात अयशस्वी ठरत आहे. यामुळे देशात सत्तापालटाची मागणी जोर धरत आहे.
देशातील नागरिकांनी वृतसंस्था असोसिएटेड प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, JINM संघटनेने लष्करी छावणीतील शस्त्रांची लुटमार केली आहे. अद्याप यावर लष्कराने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु या हल्ल्यात ५० हून अधिक सैनिक मारले गेले आहेत. शिवाय यापूर्वी देखील बुर्किना फासोमध्ये अनेक दहशतवादी हल्ले घडले आहेत.
JINM कडून सर्वाधिक हल्ले बुर्किना फासोच्या दुर्गम भागात केले जात आहे. सध्या देशातील वाढत्या हल्ल्यांमुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. आतापर्यंतच्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये जवळपास ६०० लोक मारले गेले आहे. या सर्वांची जबाबदारी देखील JINM ने स्वीकारली आहे.