Japan Wildfire Massive forest fire in Japan One dead, thousands displaced
बिजिंग: उत्तर जपानच्या जंगलामध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या 30 वर्षांतील ही सर्वात मोठी जंगलातील आग मानली जात आहे. या भीषण आगीमुळे 1 हजार 800 हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले आहेय या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
हजारो लोकांनी घेतली सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित
मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर जपानमधील ओफुनाटो शहर आणि त्याच्या आसपासच्या भागातील जवळपास दोन हजार लोकांनी आपल्या नातेवाईक आणि मित्रांकडे आश्रय घेतला आहे. 1200 हून अधिक लोकांना आपात्कालीन निवासी हलविण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 1992 मध्ये कुशिरो, होक्काइडो येथे लागलेल्या आगीनंतर ही सर्वात मोठी आग आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु
सैन्याच्या हेलिकॉप्टर्सद्वारे चार दिवसांपासून लागलेल्या या आगीला विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. देशभरातून 1700 हून अधिर अग्निशामक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. आगीमुळे 80 हून अधिक इमारतींचे नुकसान झाला आहे. इंग्रजी वृत्तप६ने प्रसिद्ध केलेल्या हवाई दृश्यांमध्ये धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर उठताना दिसत आहेत.
2023 नंतर जंगलातील आगीच्या घटना वाढल्या
जपानमध्ये 1970 च्या दशकानंतर जंगलात आग लागण्याच्या घटनांमध्ये घट झाला होती. मात्र, 2023मध्ये जंगलातील आगीच्या जवळपास 1300 घटना नोंदवल्या गेल्या. यामध्ये फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत घटनांमध्ये वाढ झाली, कारण या काळात जोरदार वारे आणि कोरडे हवामान असल्याने आगी लवकर पसरतात.
जंगलातील आगींची कारणे
आगींची दोन मुख्य कारणे आहेत ती म्हणजे नैसर्गिक आणि अनैसर्गिक. दोन प्रमुख नैसर्गिक घटक म्हणजे ऑक्सिजन आणि तापमान. जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आणि कोरड्या झाडांच्या फांद्या असतात. या आगीसाठी इंधनाचे काम करतात. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने किंवा विजेच्या गडगडाटामुळे आग लागू शकते. तसेच, जोरदार वारे असल्यास आग लवकर पसरते आणि नियंत्रित करणे कठीण होते.
मानवीय हस्तक्षेप
तसेच मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे जंगलातील आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. जंगल पर्यटन, कॅम्पिंग, पिकनिक, स्मोकिंग आणि अन्य मानवी हस्तक्षेपांमुळे आगीची शक्यता वाढते. अनेकदा लोक निष्काळजीपणे पेटवलेली आग पूर्णपणे विझवत नाहीत, यामुळे ती मोठ्या जंगलातील आगीचे रूप धारण करते.जंगलातील आग पर्यावरणासाठी मोठ्या हानीचे कारण ठरु शकते. मोठ्या प्रमाणावर वृक्ष नष्ट होतात, वन्यजीवांचे जीवन धोक्यात येते आणि प्रदूषण वाढते.