Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran War: पेंटागॉनचा दावा फोल? इराण युद्धावरून JD Vance आणि संरक्षण मंत्र्यांमध्ये जुंपली; पीट हेगसेथ करत आहेत दिशाभूल

US-Iran War : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत! उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी पेंटागॉनच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वाचा याबाबत सविस्तर अपडेट.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 29, 2026 | 03:30 PM
jd vance questions pentagon claims iran war us leadership split 2026

jd vance questions pentagon claims iran war us leadership split 2026

Follow Us
Follow Us:
  • व्हाईट हाऊसमध्ये फूट
  • पेंटागॉनच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह
  • चीन-रशियाचा धोका

JD Vance vs Pentagon Iran war 2026 : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध (US-Israel Iran War) केवळ सीमेवरच नाही, तर आता अमेरिकेच्या ‘पॉवर कॉरिडॉर’मध्येही सुरू झाले आहे. वॉशिंग्टनमधून आलेल्या एका खळबळजनक वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीममध्येच आता दोन तट पडले आहेत. उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी इराण युद्धाबाबत पेंटागॉनने मांडलेल्या ‘सर्व काही आलबेल आहे’ या चित्रावरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे ट्रम्प प्रशासनातील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे.

संरक्षण सचिव विरुद्ध उपराष्ट्रपती: नेमका वाद काय?

वृत्तानुसार, अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ आणि जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन हे सातत्याने दावा करत आहेत की, अमेरिकेच्या हवाई आणि नौदल हल्ल्यांमुळे इराणच्या संरक्षण पायाभूत सुविधांचे कंबरडे मोडले आहे. इराण आता प्रतिकार करण्यास असमर्थ असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना हे मान्य नाही. बंद दाराआड झालेल्या बैठकीत व्हान्स यांनी थेट पेंटागॉनला विचारले की, “तुम्ही जी माहिती राष्ट्राध्यक्षांना देत आहात, ती जमिनीवरील वास्तवाशी जुळते का?”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Rooppur NPP: भारताच्या शेजारील देशात अणुक्रांती; रशियाच्या मदतीने ‘हा’ देश आता बनवणार स्वतःची वीज, काय आहे भारत कनेक्शन?

रिकामी होणारी शस्त्रागारे आणि भविष्यातील संकट

जे.डी. व्हान्स यांची सर्वात मोठी चिंता अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांच्या साठ्याबाबत आहे. इराणसोबतच्या प्रदीर्घ युद्धामुळे अमेरिकेची प्रगत क्षेपणास्त्रे आणि दारुगोळा वेगाने संपत चालला आहे. व्हान्स यांच्या मते, पेंटागॉन हे वास्तव लपवून राष्ट्राध्यक्षांची दिशाभूल करत आहे. जर इराणमध्येच सर्व शक्ती खर्च झाली, तर उद्या चीनने तैवानवर किंवा रशियाने युरोपमध्ये मोठी हालचाल केली, तर अमेरिका त्यांचा सामना कसा करणार? असा जळजळीत प्रश्न व्हान्स यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या मते, इराणकडे अजूनही मोठ्या प्रमाणात ‘मिसाईल पॉवर’ शिल्लक आहे, ज्याला पेंटागॉन कमी लेखत आहे.

🇮🇷🇺🇸 JD Vance privately doubts the Pentagon’s own assessment of the Iran war. Hegseth and the generals say stockpiles are “robust” and the campaign is “highly successful.” Vance isn’t buying it. That’s not a small thing. The VP is the second most briefed person in the country.… https://t.co/Y2mzZx7bdc pic.twitter.com/CXGxxXhFbc — Mario Nawfal (@MarioNawfal) April 27, 2026

credit – social media and Twitter

पेंटागॉनची ‘गुलाबी’ चित्रे आणि गुप्तचर अहवाल

पेंटागॉनचे नेतृत्व जाहीरपणे लष्करी यश साजरे करत असले तरी, काही गुप्तचर संस्थांच्या अहवालांनुसार इराणची ‘हवाई शक्ती’ आणि ‘नौदल क्षमता’ अजूनही टिकून आहे. इराणने आपले मुख्य तळ जमिनीखाली खोलवर लपवले असून, त्यावर अमेरिकेच्या हल्ल्यांचा फारसा परिणाम झालेला नाही. व्हान्स यांना भीती आहे की, चुकीच्या माहितीच्या आधारे ट्रम्प यांना युद्धाच्या अशा दलदलीत ओढले जात आहे, जिथून बाहेर पडणे कठीण होईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Durand Line: पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून अल-कायदा तालिबानच्या बाजूने; आसिम मुनीर यांच्याविरोधात लष्करालाच ‘असे’ भडकवले

जागतिक परिणाम आणि ट्रम्प यांची भूमिका

या अंतर्गत वादाचा परिणाम थेट युद्धाच्या धोरणावर होत आहे. एकीकडे लष्करी विजय हवा असलेली पीट हेगसेथ यांची टीम आक्रमकतेचा सल्ला देत आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्ष साधनसामग्रीची चिंता असलेले व्हान्स सावधगिरी बाळगण्यास सांगत आहेत. आता चेंडू राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोर्टात आहे. ते आपल्या विश्वासू संरक्षण सचिवांवर विश्वास ठेवतात की आपल्या उपराष्ट्रपतींच्या इशाऱ्याकडे लक्ष देतात, यावर संपूर्ण जगाचे भवितव्य अवलंबून आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जे.डी. व्हान्स आणि पेंटागॉनमध्ये वाद का सुरू आहे?

    Ans: इराण युद्धातील अमेरिकेचे यश आणि शस्त्रास्त्रांच्या उपलब्ध साठ्याबाबत पेंटागॉन करत असलेल्या दाव्यांवर व्हान्स यांनी अविश्वास दाखवल्यामुळे हा वाद सुरू झाला आहे.

  • Que: व्हान्स यांची मुख्य चिंता कोणती आहे?

    Ans: अमेरिकेची शस्त्रागारे रिकामी होत असून भविष्यात चीन किंवा रशियाशी संघर्ष झाल्यास अमेरिका कमकुवत पडू शकते, ही व्हान्स यांची मुख्य चिंता आहे.

  • Que: पेंटागॉनचा दावा काय आहे?

    Ans: पेंटागॉनच्या मते अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणच्या लष्करी शक्तीचे मोठे नुकसान झाले असून अमेरिका या युद्धात वरचढ आहे.

Web Title: Jd vance questions pentagon claims iran war us leadership split 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • America news
  • Donald Trump
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

US-Iran Hormuz Toll: इराण-अमेरिकेचा करार झाला, पण फक्त 60 दिवसांसाठी? जहाजांच्या टोल शुल्कावर मोठा निर्णय; जगभरात चर्चा सुरू
1

US-Iran Hormuz Toll: इराण-अमेरिकेचा करार झाला, पण फक्त 60 दिवसांसाठी? जहाजांच्या टोल शुल्कावर मोठा निर्णय; जगभरात चर्चा सुरू

Switzerland Talks: बैठकीपूर्वीच फिरली सूत्रे! वॉशिंग्टन विमानतळावरून जेडी व्हान्स यांचे विमान का रोखले? जाणून घ्या इनसाईड स्टोरी
2

Switzerland Talks: बैठकीपूर्वीच फिरली सूत्रे! वॉशिंग्टन विमानतळावरून जेडी व्हान्स यांचे विमान का रोखले? जाणून घ्या इनसाईड स्टोरी

‘Happy Birthday, Mr. Genocide…’ युरोपियन संसदेत Trump विरोधात संताप; स्पॅनिश महिला खासदाराची तीव्र टीका, Video
3

‘Happy Birthday, Mr. Genocide…’ युरोपियन संसदेत Trump विरोधात संताप; स्पॅनिश महिला खासदाराची तीव्र टीका, Video

US-Iran Deal: इराणने टाकला सुटकेचा निःश्वास, तर इस्रायलचा ‘विश्वासघाताचा’ आरोप; अमेरिका-इराण शांतता कराराबद्दल काय म्हणत आहे जग?
4

US-Iran Deal: इराणने टाकला सुटकेचा निःश्वास, तर इस्रायलचा ‘विश्वासघाताचा’ आरोप; अमेरिका-इराण शांतता कराराबद्दल काय म्हणत आहे जग?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.