भारताच्या शेजारील देशात अणुक्रांती! रशियन तंत्रज्ञानाचा वापर करून बांगलादेशचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Bangladesh Rooppur Nuclear Power Plant : भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशने मंगळवारी इतिहासातील सर्वात मोठी झेप घेतली आहे. गेली अनेक वर्षे ज्या प्रकल्पाची प्रतीक्षा होती, त्या ‘रूपपूर अणुऊर्जा प्रकल्पा’मध्ये (Rooppur Nuclear Power Plant) आता प्रत्यक्षात इंधन भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासोबतच बांगलादेशने अधिकृतपणे अणुऊर्जा निर्मितीच्या जागतिक युगात प्रवेश केला आहे. राजधानी ढाकापासून १६० किमी अंतरावर असलेल्या पाबना जिल्ह्यात उभारलेला हा प्रकल्प केवळ बांगलादेशसाठीच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण आशियासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
रूपपूर प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वापरण्यात आलेली रशियन बनावटीची VVER-1200 अणुभट्टी. हे रशियाचे ‘जेन III+’ (Generation III+) श्रेणीतील प्रगत दाबयुक्त जल अणुभट्टी (Pressurized Water Reactor) तंत्रज्ञान आहे. विशेष म्हणजे, भारतदेखील तामिळनाडूतील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या नवीन युनिट्ससाठी याच तंत्रज्ञानाचा विचार करत आहे. या तंत्रज्ञानामुळे विजेची निर्मिती अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम पद्धतीने होते. २.४ गिगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प बांगलादेशच्या एकूण विजेच्या गरजेपैकी १० ते १२ टक्के पुरवठा एकट्याने करणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ganga Expressway: गुगल मॅप्सवर का दिसेना गंगा एक्सप्रेसवे? पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; 36,000 कोटींचा प्रकल्प तयार पण…
बांगलादेशचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फकीर महबूब अनाम यांनी या ऐतिहासिक क्षणी आनंद व्यक्त केला. त्यांच्या मते, रूपपूर प्रकल्प केवळ वीज देणार नाही, तर तो बांगलादेशच्या औद्योगिक विकासाला गती देईल. १३ अब्ज डॉलर्स (सुमारे १ लाख कोटी रुपयांहून अधिक) खर्चाचा हा प्रकल्प रशियाच्या ‘रोसाटॉम’ या सरकारी कंपनीने उभारला आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण खर्चापैकी ९० टक्के रक्कम रशियाने सरकारी कर्ज म्हणून दिली आहे. २०२६ च्या अखेरीस यातील पहिले युनिट पूर्णपणे बांगलादेशच्या ताब्यात दिले जाईल आणि २०२७ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने धावू लागेल.
⚡️@Rosatom: 🇷🇺🇧🇩 On April 28, Rosatom launched Bangladesh’s first nuclear power plant – the #Rooppur NPP. We are pleased to be working together with our Bangladeshi friends to create a modern & reliable NPP – a key element of the country’s energy systemhttps://t.co/klw0sNr9pu pic.twitter.com/rISS0E4fD1 — MFA Russia 🇷🇺 (@mfa_russia) April 28, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : DIVEX 2026: समुद्रात भारताचे ‘ऑपरेशन समुद्रमंथन’! चीनच्या नाकेबंदीसाठी श्रीलंका आणि भारतीय नौदल सज्ज; खोल समुद्रात दाखवला पराक्रम
सध्या बांगलादेश आपल्या विजेच्या गरजेसाठी मोठ्या प्रमाणावर भारतावर अवलंबून आहे. भारताकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात वीज बांगलादेशला निर्यात केली जाते. मात्र, रूपपूर प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर बांगलादेशची ही गरज कमी होऊ शकते. साहजिकच, यामुळे भारताकडून होणारी वीज खरेदी किंचित कमी होईल, पण पूर्णपणे थांबणार नाही. दुसरीकडे, कुडनकुलममध्ये भारत आणि रशिया ज्याप्रमाणे एकत्र काम करत आहेत, त्याच धर्तीवर बांगलादेशमध्ये रशियाने हे यश मिळवणे, हे दक्षिण आशियात रशियाचा वाढता प्रभाव दर्शवते.
Ans: बांगलादेशच्या पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाचे नाव 'रूपपूर अणुऊर्जा प्रकल्प' (Rooppur NPP) असून तो पाबना जिल्ह्यात स्थित आहे.
Ans: हा प्रकल्प रशियाच्या 'रोसाटॉम' (Rosatom) या सरकारी अणुऊर्जा महामंडळाच्या मदतीने आणि रशियन कर्जावर उभारला जात आहे.
Ans: या प्रकल्पाची एकूण क्षमता २.४ गिगावॅट (२४०० मेगावॅट) आहे, जी बांगलादेशच्या विजेच्या गरजेपैकी १०-१२% भाग भागवेल.






