
jeffrey epstein bill clinton
Epstein Files मधून फुटला बॉम्ब! Bill Gates यांच्या फोटोंसह अनेक दिग्गजांची गुपिते आली जगासमोर
अमेरिकेच्या न्याय विभागाने अलीकडे मंजूर केलेल्या आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी स्वाक्षरी केलेल्या एपस्टाईन प्रकरणाशी संबंधित दस्ताऐवज खुले करण्यात आले आहे. एपस्टाईन फाइल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट अंतर्गत ही कागपत्रे खुली झाली आहे. याचा हेतू एपस्टाइन नेटवर्कशी संबंधित सामाजिक आणि व्यावसायिक संबंधामध्ये ट्रान्सपरन्सी आणण्याचा होता, मात्र यामुळे गोपनियतेच्या नावाखाली लपवण्यात आलेल्या प्रकरणांचा मोठा खुलासा झाला आहे.
या दस्ताऐवजांनुसार, प्रसिद्ध अमेरिकन गायक, गीतकार, नर्तक आणि पॉप दुनियेचे बादशाह मायकल जॅक्सनने फ्लोरिडात पाम बीच येथील एपस्टाईच्या निवासस्थानाला एकदा तरी भेट दिली होती. सध्या या प्रकरणाशी संबंध असल्याचे कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत, परंतु जॅक्सनचे नाव एपस्टाईन संबंधी सामाजिक कार्यक्मात आल्याने या प्रकरणाशी जोडले जात आहे.
तसेच प्रसिद्ध ब्रिटिश संगीतकार, गायक आणि गीतकार, ज्यांना रॉक बँडचे मुख्य गायक म्हणून ओळखले जाते मिक जॅगरचे नावही यामध्ये आले आहे. परंतु कोणत्याही प्रकारचा पुरावा यामध्ये आढळला नाही.
अमेरिकेचे ४२ वे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचेही या प्रकरणात नाव समोर आले आहे. त्यांचे फोटो आणि सामाजिक कार्यक्रमांचे रेकॉर्डमध्ये त्यांचे नाव उघड झाले आहे. यामुळे अमेरिकेच्या राजकारणात मोठा गोंधळ उडाला आहे. या फोटोमध्ये क्लिंटन त्यांच्या सहकारी घिसलेन मॅक्सवेल यांच्यासोबत दिसत आहे. परंतु क्लिंटन यांनी आधीच स्पष्ट केले होते की त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आणि एपस्टाईनच्या गुन्ह्यांबद्दल त्यांना कोणत्याही प्रकारणी माहिती नव्हती. दरम्यान यापूर्वी या प्रकरणाशी संबंधित बिल गेट्स (Bill Gates) , वुडी ॲलन (Woody Allen), नोम चॉम्स्की (, सर्गेई ब्रिन आणि ट्रम्पचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन या प्रभावशाली व्यक्तींची नावे समोर आली आहे. सध्या याबद्दल मोठा वादविवाद सुरु आहे.