इराण त्यांच्या नष्ट झालेल्या अणुस्थळांवर काय करत आहे? नवीन उपग्रह प्रतिमा अमेरिका आणि इस्रायलसाठी चिंता वाढवू शकतात ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Iran nuclear site satellite images 2026 : मध्य पूर्वेतील तणाव आता एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. इस्रायलने जून २०२५ मध्ये केलेल्या भीषण हल्ल्यानंतर इराणचा (Iran) अणू कार्यक्रम पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला जात होता. मात्र, ताज्या उपग्रह प्रतिमांनी (Satellite Images) संपूर्ण जगाला चकित केले आहे. इराणने आपल्या इस्फहान आणि नतान्झ या दोन प्रमुख अणू केंद्रांवरील उद्ध्वस्त भागांवर घाईघाईने नवीन छप्परं आणि आच्छादनं उभारली आहेत. या मूक हालचालींमुळे अमेरिका (America) आणि इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
प्लॅनेट लॅब्स पीबीसी (Planet Labs PBC) ने प्रसिद्ध केलेल्या फोटोंनुसार, इराणच्या नतान्झ केंद्रावर—जे एकेकाळी युरेनियम समृद्धीकरणाचे मुख्य केंद्र होते—डिसेंबरच्या अखेरीस मोठ्या प्रमाणावर बांधकाम करण्यात आले आहे. इस्रायलच्या हल्ल्यात येथील मुख्य युनिट जमीनदोस्त झाले होते, तर अमेरिकेच्या बंकर-बस्टर बॉम्बनी भूमिगत तळांना लक्ष्य केले होते. आता तिथे नवीन छप्पर बांधून इराणने उपग्रहांच्या देखरेखीवर मर्यादा आणल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, इराण या छपरांच्या आडोशाने ढिगाऱ्याखाली शिल्लक राहिलेले सेन्ट्रिफ्यूज आणि युरेनियम पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत असावा.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Politics: जगाला दोन तुकड्यांत विभागू नका! UN Chief यांनी ‘या’ दोन महासत्तांना धारेवर धरले; भारताचे मात्र तोंडभरून कौतुक
केवळ अणू केंद्रेच नाही, तर इराणने आपल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी संबंधित ठिकाणांवरही काम सुरू केले आहे. तेहरानजवळील पारचिन लष्करी संकुलातील ‘तालेघन-२’ (Taleghan-2) या जागेचा पुनर्विकास सुरू असल्याचे समजते. ही तीच जागा आहे जिचा संबंध पूर्वी अण्वस्त्रांच्या स्फोटक चाचण्यांशी जोडला गेला होता. इराणने आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जा संस्थेच्या (IAEA) निरीक्षकांना प्रवेश नाकारल्याने, या छपरांच्या आड नेमके काय चालले आहे, हे ओळखणे आता जगासाठी कठीण झाले आहे.
🚨BREAKING: Roofs have been built over damaged buildings at Iran’s Isfahan and Natanz nuclear facilities, per satellite images. pic.twitter.com/WjtVnA7lnu — Jackson Hinkle 🇺🇸 (@jacksonhinklle) January 30, 2026
credit – social media and Twitter
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे नतान्झजवळील पिकॅक्स (Pickaxe) पर्वतावर सुरू असलेले उत्खनन. विश्लेषकांचे असे मत आहे की, इराण आता पर्वताच्या आत इतक्या खोलवर नवीन अणू सुविधा बांधत आहे, जिथे अमेरिकेचे सर्वात शक्तिशाली बॉम्बही पोहोचू शकणार नाहीत. इस्फहानमध्येही सेंट्रीफ्यूज उत्पादन केंद्रांच्या बोगद्यांना मजबूत करण्याचे काम सुरू आहे. या हालचाली केवळ डागडुजी नसून इराण आपल्या अणू शक्तीला पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Coup : चीनमध्ये सत्तापालटाचा थरार! दोन बड्या जनरल्सना बेड्या; लष्कराने थेट शी जिनपिंग यांनाच दिले आव्हान
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला वारंवार इशारा दिला आहे की, जर त्यांनी अणू करारावर स्वाक्षरी केली नाही, तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. इराणला धमकावण्यासाठी अमेरिकेने आधीच विमानवाहू युद्धनौका ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ आणि मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशके (Guided Missile Destroyers) इराणच्या सीमेजवळ तैनात केली आहेत. इराणच्या या नवीन बांधकामामुळे इस्रायल पुन्हा एकदा ‘प्री-एम्प्टिव्ह स्ट्राईक’ (Pre-emptive Strike) म्हणजेच प्रतिबंधात्मक हल्ला करण्याची शक्यता बळावली आहे.
Ans: उपग्रहांद्वारे केली जाणारी देखरेख टाळण्यासाठी आणि इस्रायली हल्ल्यात वाचलेली संवेदनशील उपकरणे व युरेनियम साठा लपवण्यासाठी हे बांधकाम केले आहे.
Ans: नतान्झ हे इराणचे मुख्य युरेनियम समृद्धीकरण केंद्र आहे, तर इस्फहानमध्ये अणू विमानांसाठी लागणारे सेंट्रीफ्यूज तयार केले जातात.
Ans: अमेरिकेने इराणला इशारा देत मध्य पूर्वेत विमानवाहू युद्धनौका 'यूएसएस अब्राहम लिंकन' आणि विनाशक युद्धनौका तैनात केल्या आहेत.






