Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Epstein Note: जेफ्री एपस्टाईनच्या मृत्यूचे गुपित ‘त्या’ पिवळ्या चिठ्ठीत? 7 वर्षांपासून सीलबंद असलेलं रहस्य अखेर आलं जगासमोर

Jeffrey Epsteinच्या मृत्यूशी संबंधित एक कथित आत्महत्या पत्र सात वर्षांपासून सीलबंद ठेवण्यात आले आहे. त्याच्या तुरुंगातील सोबत्याला ते 'टाइम टू से गुडबाय' नावाच्या एका ग्राफिक नॉव्हेलमध्ये सापडले होते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 01, 2026 | 02:24 PM
jeffrey epstein suicide note found in graphic novel sealed 7 years 2026

jeffrey epstein suicide note found in graphic novel sealed 7 years 2026

Follow Us
Follow Us:
  • रहस्यमयी चिठ्ठीचा खुलासा
  • तुरुंगातील सोबत्याचा दावा
  • तपास यंत्रणांचे दुर्लक्ष

Jeffrey Epstein suicide note leaked 2026 : जगातील सर्वात वादग्रस्त लैंगिक गुन्हेगार आणि अमेरिकन अर्थतज्ज्ञ जेफ्री एपस्टाईनच्या (Jeffrey Epstein) मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये न्यूयॉर्कच्या तुरुंगात झालेल्या त्याच्या कथित आत्महत्येबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. एका ताज्या अहवालानुसार, एपस्टाईनने मरण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती, जी गेली सात वर्षे जगापासून लपवून ठेवण्यात आली आहे.

ग्राफिक नॉव्हेलमधले ते ‘लपलेले’ गुपित

न्यूयॉर्क टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, ही कथित आत्महत्या चिठ्ठी एपस्टाईनचा तुरुंगातील सहकारी निकोलस टार्टाग्लिओन याला सापडली होती. टार्टाग्लिओन हा स्वतः एक माजी पोलीस अधिकारी असून तो हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याने दावा केला आहे की, जुलै २०१९ मध्ये जेव्हा एपस्टाईनने पहिल्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यानंतर त्याला त्याच्या कपाटातील एका ग्राफिक नॉव्हेलमध्ये (Graphic Novel) पिवळ्या रंगाचा एक कागद सापडला. या ‘लीगल पॅड’वरून फाडलेल्या कागदावर “निरोप घेण्याची वेळ झाली आहे” (It’s time to say goodbye) असे मोजकेच पण सूचक शब्द लिहिले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Heritage: देशाचे वैभव परतले! कोहिनूर वादाच्या पार्श्वभूमीवर महासत्तेकडून भारताला मोठी भेट; 657 प्राचीन कलाकृतींची घरवापसी

चिठ्ठी लपवून ठेवण्यामागचे कारण काय?

टार्टाग्लिओनने ही चिठ्ठी तुरुंग प्रशासनाला न देता आपल्या वकिलांकडे सोपवली. यामागे त्याचे एक खास कारण होते. त्याला भीती होती की, जर त्याने ही चिठ्ठी अधिकृतपणे दिली असती, तर एपस्टाईन त्याच्यावरच हल्ल्याचा आरोप करून ती आत्महत्या असल्याचे भासवू शकला असता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, फेडरल न्यायाधीशांनी ही चिठ्ठी सीलबंद करण्याचे आदेश दिले होते, ज्यामुळे ती कधीच सार्वजनिक झाली नाही. अमेरिकन तपास संस्थांनी किंवा न्याय विभागाने या महत्त्वाच्या पुराव्याकडे डोळेझाक का केली, हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Jeffrey Epstein’s former cellmate reveals what’s inside his secret suicide note STILL being kept from public https://t.co/HLicCVhRN9 — Daily Mail US (@Daily_MailUS) May 1, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : W.H.Shooting: वॉशिंग्टन हिल्टनमध्ये त्या रात्री काय घडले? Trump वरील हल्ल्याचा थरार; ‘या’ CCTV फुटेजमुळे नेमके सत्य आले समोर

एपस्टाईनचा मृत्यू आणि संशयाची सुई

जेफ्री एपस्टाईनवर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक तस्करीचे अत्यंत गंभीर आरोप होते. त्याच्या संपर्कात जगातील अनेक बडे राजकारणी, व्यापारी आणि सेलिब्रिटी होते. त्यामुळेच ऑगस्ट २०१९ मध्ये जेव्हा त्याने तुरुंगात गळफास लावून आत्महत्या केली, तेव्हा ती ‘हत्या’ असल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला होता. ज्या मॅनहॅटन तुरुंगात त्याला ठेवले होते, तिथे सुरक्षेच्या अनेक त्रुटी होत्या आणि सीसीटीव्ही कॅमेरेही त्या वेळी बंद होते. आता या सात वर्षे जुन्या चिठ्ठीचा खुलासा झाल्यामुळे, या प्रकरणातील दडपलेले सत्य बाहेर येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जेफ्री एपस्टाईनची आत्महत्या चिठ्ठी कोणाला सापडली?

    Ans: एपस्टाईनचा तुरुंगातील सोबती निकोलस टार्टाग्लिओन याला ही चिठ्ठी त्याच्या कपाटातील एका ग्राफिक नॉव्हेलमध्ये सापडली होती.

  • Que: त्या कथित आत्महत्या चिठ्ठीवर काय लिहिले होते?

    Ans: त्या पिवळ्या कागदावर "निरोप घेण्याची वेळ झाली आहे" (Time to say goodbye) असे लिहिले होते.

  • Que: ही चिठ्ठी आजवर सार्वजनिक का झाली नाही?

    Ans: फेडरल न्यायाधीशांनी ही चिठ्ठी सीलबंद (Sealed) करण्याचे आदेश दिले होते आणि तपास यंत्रणांनी तिची दखल घेतली नव्हती.

Web Title: Jeffrey epstein suicide note found in graphic novel sealed 7 years 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Jeffrey Epstein
  • World news

संबंधित बातम्या

SSGN : चीनला घेरण्यासाठी अमेरिकेची समुद्राखाली मोठी नाकेबंदी; 19 Virginia सबमरीन ‘गेमचेंजर’, पण चीनचे क्षेपणास्त्र जाळे अडथळा
1

SSGN : चीनला घेरण्यासाठी अमेरिकेची समुद्राखाली मोठी नाकेबंदी; 19 Virginia सबमरीन ‘गेमचेंजर’, पण चीनचे क्षेपणास्त्र जाळे अडथळा

Strait Of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; इंजिन रूम आगीच्या भक्ष्यस्थानी, रेडिओ संदेशाने जगभरात खळबळ
2

Strait Of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; इंजिन रूम आगीच्या भक्ष्यस्थानी, रेडिओ संदेशाने जगभरात खळबळ

Bangladesh: शेख हसीना पूर्ण तयारीने उतरणार मैदानात; दोन मोठ्या पक्षांचे विलीनीकरण अन् बदलणार बांगलादेशचे सत्तासमीकरण
3

Bangladesh: शेख हसीना पूर्ण तयारीने उतरणार मैदानात; दोन मोठ्या पक्षांचे विलीनीकरण अन् बदलणार बांगलादेशचे सत्तासमीकरण

Iran-US War : पश्चिम आशियातील महायुद्ध तीव्र; इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी टीव्ही मुलाखतीत उघड केला मोठा कट
4

Iran-US War : पश्चिम आशियातील महायुद्ध तीव्र; इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी टीव्ही मुलाखतीत उघड केला मोठा कट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.