Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हाइट हाऊसच्या सेक्रेटरी पुन्हा चर्चेत; ट्रम्प-पुतिन भेटीवरील पत्रकाराच्या प्रश्नावर दिलं तिरकस उत्तर, म्हणाल्या, तुमच्या आईने…

ट्रम्प प्रशासन पुन्हा एकदा राजकीय वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. व्हाइट हाइउसच्या सेक्रेटरील कॅरोलिना लेविट यांच्या वादग्रस्त विधानामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. एका पत्रकारावर त्यांनी तीव्र टीका केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 21, 2025 | 02:34 PM
Karoline Leavitt calls out reporter over question on Trump-Putin meet

Karoline Leavitt calls out reporter over question on Trump-Putin meet

Follow Us
Close
Follow Us:
  • व्हाइट हाऊसच्या सेक्रेटरी पुन्हा चर्चेत
  • हफिंग्टन पोस्टच्या रिपोर्टवर केला संताप व्यक्त
  • ट्रम्प-पुतिन भेटीच्या प्रश्नावरुन तापले प्रकरण
  • काय आहे संपूर्ण प्रकरण?

America News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या सेक्रेटरी कॅरोलिना लेविट पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याप्रमाणेच त्यांनी देखील वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे ट्रम्प प्रशासनात राजकीय वादळ निर्माण झाले आहे. कॅरोलिना यांनी एका पत्रकारवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

US H1-B Visa : ट्रम्पच्या एच-१बी व्हिसा शुल्काबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी; या अर्जदारांना मिळणार सूट, जाणून घ्या नवे अपडेट

काय आहे नेमकं प्रकरण?

व्हाइट हाइउसच्या सेक्रेटरी कॅरोलिना लेविट यांनी हफिंग्टन पोस्टच्या एका पत्रकाराच्या प्रश्नावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. कॅरोलिना यांना ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी आगामी बैठकीवर प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र कॅरोलिना यांनी तीव्र प्रतिक्रिया देत पत्रकाराला डाव्या विचारसरणीचा हॅकर असे म्हटले आहे. त्यांच्या या टीकेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

पत्रकारने प्रश्न केला होता की, ट्रम्प-पुतिन यांच्या बैठकीच्या ठिकाणाची बुडापेस्टची निवड कोणी केली? पण या साध्या प्रश्नावर कॅरोलिना यांनी  तिरकसं उत्तर देत तुमच्या आईने निवडले होते, असे म्हटले. त्यांच्या या उत्तरामुळे सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली होती. कॅरोलिना एवढ्यावरच थांबल्या नाहीत. त्यांनी सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट शेअर करत डाव्या विचारसरणीचे लोक ट्रम्पविरोधा प्रचार करत आहेत. पत्रकारितेचा मुखवटा घातलेले लोक त्यांच्या क्षेत्राचा अपमान करत असल्याची टीका त्यांनी केली.

For context, S.V. Dáte of the Huffington Post is not a journalist interested in the facts. He is a left-wing hack who has consistently attacked President Trump for years and constantly bombards my phone with Democrat talking points. Just take a look at @svdate’s feed, it reads… https://t.co/NxWn2mdUsa pic.twitter.com/v7owI5N4us — Karoline Leavitt (@PressSec) October 20, 2025

कॅरोलिना यांच्या या विधानानंतर अमेरिकेच्या माध्यमांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होता. अनेकांनी लेविट यांच्यावर आक्षेप घेतला. तसेच त्यांचे विधान अयोग्य असल्याचे म्हटले. तर काही ट्रम्प समर्थकांनी लेविट यांना पाठिंबा देत, पत्रकारितेतील बायसनेसवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. सध्या कॅरोलिना यांच्या विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

ट्रम्प-पुतिन अगामी बैठक?

ट्रम्प आणि पुतिन यांच्या आगामी बैठकीबाबत अद्याप कोणतीही तारिख जाहीर करण्यात आलेली नाही. पुढील दोन आठवड्यात ही बैठक बुडापेस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. यापूर्वी दोन्ही नेत्यांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी अलास्कामध्ये चर्चा केली होती. या बैठकीत रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यावर चर्चा झाली, मात्र कोणाताही तोडगा निघाला नाही. तसेच अद्यापही रशिया युक्रेन युद्ध सुरुच आहे. यामुळे ट्रम्प आणि पुतिन यांची बैठक नेमकी कधी होणार आणि युद्ध थांबणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

तर, दुसरीकडे व्हाइट हाउसमध्ये नुकतेच युक्रेनचे झेलेन्स्की आणि ट्रम्प यांची भेट झाली होती. परंतु यावेळी दोघांमध्ये रशियाच्या अटींवरुन मोठा वाद झाला. रशियाने युद्ध थांबवण्याच्या बदल्यात डोनबास प्रदेश त्यांना सोपवण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करावी असा दबाव ट्रम्प यांनी झेलेन्स्कींवर आणण्याचा प्रयत्न केला, पण झेलेन्स्कींनी याला स्पष्ट नकार दिला आहे.

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. व्हाइट हाइसच्या सेक्रेटरी कोणावर टीका केली?

व्हाइट हाउसच्या सेक्रेटरी कॅरोलिना लेविट यांनी हेफिंग्टन पोस्टच्या पत्रकारावर टीका केली आहे.

प्रश्न २. व्हाइट हाउसच्या सेक्रेटरी यांनी पत्रकारावर का आणि काय टीका केली?

हेफिंग्टनच्या पत्रकाराने सेक्रेटरी लेविट यांना ट्रम्प पुतिन यांच्या अगामी बैठकीवर प्रश्न केला होता, यावरुन त्यांनी पकत्रकारावर टीका करत डाव्याविचारसणीचे हॅकर म्हणून त्याला संबोधले.

प्रश्न ३. हेफिंग्टनच्या पत्रकाराने लेविट यांना कोणता प्रश्न विचारला?

हेफिंग्टनच्या पत्रकाराने लेविट यांना ट्रम्प-पुतिन बैठकीसाठी बुडापेस्टची निवड कोणी केली? असा प्रश्न केला होता.

प्रश्न ४. हेफिंग्टनच्या पत्रकाराच्या प्रश्नावर लेविट यांनी काय उत्तर दिले?

हेफिंग्टनच्या पत्रकाराच्या प्रश्नावर लेविट यांनी तुमच्या आईने केली, असे तिरकस उत्तर दिले.

फ्रान्सचे माजी अध्यक्ष सार्कोझी यांना 5 वर्षांचा तुरुंगावास, VIP कारावासत एकांतात भोगणार शिक्षा

Web Title: Karoline leavitt calls out reporter over question on trump putin meet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

US H1-B Visa : ट्रम्पच्या एच-१बी व्हिसा शुल्काबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी; या अर्जदारांना मिळणार सूट, जाणून घ्या नवे अपडेट
1

US H1-B Visa : ट्रम्पच्या एच-१बी व्हिसा शुल्काबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी; या अर्जदारांना मिळणार सूट, जाणून घ्या नवे अपडेट

फ्रान्सचे माजी अध्यक्ष सार्कोझी यांना 5 वर्षांचा तुरुंगावास, VIP कारावासत एकांतात भोगणार शिक्षा
2

फ्रान्सचे माजी अध्यक्ष सार्कोझी यांना 5 वर्षांचा तुरुंगावास, VIP कारावासत एकांतात भोगणार शिक्षा

‘ते फक्त स्वप्नच बघू शकतात’ ; इराण अणु प्रकल्पाला नष्ट करण्याच्या ट्रम्पच्या दाव्याची खामेनेईंनी उडवली खिल्ली
3

‘ते फक्त स्वप्नच बघू शकतात’ ; इराण अणु प्रकल्पाला नष्ट करण्याच्या ट्रम्पच्या दाव्याची खामेनेईंनी उडवली खिल्ली

ट्रम्प यांनी पुन्हा सुरू केला ट्रेड वॉरचा भडका! चीनला दिली १५५% कर लादण्याची धमकी ; जागतिक बाजापेठेत खळबळ
4

ट्रम्प यांनी पुन्हा सुरू केला ट्रेड वॉरचा भडका! चीनला दिली १५५% कर लादण्याची धमकी ; जागतिक बाजापेठेत खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.