Kathmandu Mayor Balendra Shah urges Gen Z protesters to restraint
Balen Shah : नेपाळमध्ये दिवसांपासून तीव्र आंदोलन सुरु होते. यामुळे देशात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. सरकाच्या सोशल मीडियावरील बंदीच्या निर्णयानंतर हे आंदोलन सुरु झाले होते. शिवाय भष्ट्राचार, नेपोटिझम घोटाळा यांसरख्या कारणांमुळे हे आंदोलन अधिक पेटले. यामुळे पंतप्रधान ओली शर्मा यांनी मंगळवारी (०९ सप्टेंबर) राजीनामाही दिला आहे. परंतु अद्यापही देशात अस्थिरतेचे वातावरण आहे. याचवेळी तरुणांचा लोकप्रिय नेता आणि काठमांडूचा महापौर बालेन शाह यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
बालेन शाहचे आंदोलनकर्त्यांना आवाहन
बालेन शाह यांनी आंदोलन कर्त्यांना शांत राहण्याचे आणि आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले आहे. बालेन शाह यांनी म्हटले आहे की, हे आंदोलन तरुणांचे असून यशस्वी झाले आहे. प्रिय Gen Z तुमच्या मारेकराचा राजीनामा आला आहे, यामुळे आता तुम्ही धीर धरा. देशातील लोकांचे संपत्तीचे नुकसान करुन नका. आता आपण हे आंदोलन थांबवले पाहिजे. आता तुम्हाला आणि मला आता संयम बाळगण्याची गरज आहे.
याच वेळी बालेन शाह यांनी लष्करप्रमुखांशी चर्चा करण्यासाठी तयार राहण्याचे देखील तरुणांना म्हटले आहे. परंतु यापूर्वी संसद बरखास्त करण्याचेही बालेन शाहने म्हटले आहे. आता देशाच्या तरुण पिढीने नेतृत्व करण्याची गरज असल्याचे बालेन शाहने म्हटले आहे. बालेन शाहला Gen Z च्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जात आहेत. पंतप्रधान ओली शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर अंतरिम सरकारचे पंतप्रधान बालेन शाहला बनवण्याची मागणी देखील जोर धरत आहे. बालेंद्र शाह यांना देशाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले जात आहे.
Nepal Protest : कोण आहे सुदान गुरुंग? ज्याच्या एका आवाजाने ओली सरकारविरोधी तरुणांनी छेडले आंदोलन
कोण आहे बालेंद्र शाह (बालेन शाह)?
बालेन शाह हा काठमांडूचा महापौर आहे. तरुणांमध्ये त्याची प्रचंड लोकप्रियता आहे. बालेनने आपल्या करियरची सुरुवात इंजनियरींगमधून केली होती. नंतर त्याने रॅपर म्हणून आणि आपली ओळख निर्माण केली आणि नंतर राजकारणात प्रवेश केला. त्याने काठमांडूच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली. सध्याच्या आंदोलनामागे त्याचा मुख्य चेहरा असल्याचेही मानले जात आहे.
नेमकं काय घडलं?
नेपाळ सरकारने ४ सप्टेंबर रोजी २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी लागू केली होती होती. यामुळे तरुणांनी सरकारविरोधी आंदोलन सुरु केले होते. पण यासाठी एवढेच कारण नसून अनेक घोटाळे, भष्ट्राचार नेपोटिझमही आहे. यामुळे सोशल मीडियावर बंदी केवळ वादाची ठिणगी बनली आहे, तीव्र आंदोलन पेटले. देशाच्या संसद भवनाच्या बाहेर जाळफोळ करण्यात आला.