Nepal Protest : कोण आहे सुदान गुरुंग? ज्याच्या एका आवाजाने ओली सरकारविरोधी तरुणांनी छेडले आंदोलन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Nepal Protest News in Marathi : काठमांडू : नेपाळमध्ये सध्या मोठा गोंधळ सुरु आहे. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये सोमवारी (०८ सप्टेंबर) सरकारविरोधात तीव्र आंदोलन सुरु झाले होते. सरकारच्या सोशल मीडियावरील बंदीमुळे हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये २१ जणांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक तरुण जखमी आहेत. तसेच नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा आणि इतर अनेक मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जात आहे. सरकारने सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली आहे, पण अजूनही आंदोलन सुरुच आहे.
सध्या कृषीमंत्री, गृहमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. हा नेपाळच्या लोकशाहीला मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान याच वेळी सुदान गुरुंग हे नाव चर्चेत आले आहे.सुदान गुरुंगला नेपाळमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाचा चेहरा म्हटले जात आहेत. Gen Z चे आदोंलन सुरुवात सुदानच्या नेतृत्वाखाली सुरु झाले असल्याचे म्हटले जात आहे.
Nepal Protests : बांगलादेशनंतर आता नेपाळमध्ये होणार सत्तापालट! आंदोलकांच्या काय आहेत मागण्या?
काय आहे नेमकं प्रकरण?
नेपाळमध्ये गेल्या काही काळापासून भ्रष्टाचार, आर्थिक असमानाता आणि कुशासनाविरोधात वातावरण तापलेले होते. दरम्यान यामध्ये सरकारने सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आणि मोठी ठिणगी पडली. नेपाळच्या तरुणांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन केले. पंतप्रधान केपी ओली शर्मा यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाऊ लागली. तसेच सरकारच्या अनेक नेत्यांच्या राजीनाम्याचीही.
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारविरोधात सर्वांना एकत्र आणण्याचे काम सुदान गुरुंग याने केले आहे. सुदानची संघटना हमी नेपाळ एक ना-नफा संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेचे नेतृत्व सुदान गुरुंग याच्याकडे आहे. या संघटनेमार्फत सुदानने सर्व तरुणांना सरकारविरोध एका व्यासपीठावर आनले. यामुळे जनरेशन झेडच्या चळवळीमागे या संघटनेची मोठी भूमिका असल्याचे म्हटले जात आहे.
कोण आहे सुदान गुरुंग?
सुदान गुरुंग हा पूर्वी इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करायचा.परंतु २०१५ मधील नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले. सुदान गुरुंग याने मानवतावादी कार्याला सुरुवात केली. त्याने हमी नेपाळ या संस्थेची स्थापना केली. सध्या सुदान गुरुंग एक कार्यकर्ता आहे. २०१५ पासून त्याच्या नेपाळ हमी संघटनेची सुरुवात झाली होती, नंतर २०२० मध्ये ही संघटान अधिकृतपणे नोंदवण्यात आली.
हमी नेपाळने संघटनेने देशातील तरुणांचा साथ देण्याचा निर्णय घेतला. सुदानने तरुणांशी संवाद साधायला सुरुवात केली आणि हळूहळू सुदान तरुणांचा आवाज बनत गेला. त्याने नेपो बेबीज आणि देशातील उच्चभ्रू अधिकाऱ्यांना लक्ष्य केले. दरम्यान ८ सप्टेंबरमध्ये सुरु झालेल्या या चवळीचे आवाहनही सुदानने केले होते. त्याने सोशल मीडिया द्वारे तरुणांशी संपर्क साधला होचा. त्याने सांदिचले की, नेपाळमधील तरुणांनी आवाज उठवण्याची आता गरज आहे, आपली लढाई आपण लढली पाहिजे असे त्याने म्हटले.सुदान गुरुंगने तरुणांना पाठिंबा दर्शवला आणि आंदोलनाला सुरुवात झाली.
FAQs (संबंधित प्रश्न)
नेपाळमध्ये का सुरु आहे आंदोलन?
सध्या नेपाळमध्ये सरकारच्या सोशल मीडियावरील बंदीच्या निर्णयामुळे आंदोलन सुरु झाले होते. दरम्यान सरकारने निर्णय मागे घेतला आहे, पण अजूनही आंदोलन सुरु असून सरकारपुढे पाच मागण्या ठेवण्यात आल्या आहेत.
काय आहे नेपाळच्या नागरिकांच्या मागण्या?
नेपाळमध्ये नागरिकांनी संसद बरखास्त करण्याची, तसेच सर्व खासदारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याशिवाय आंदोलकांवर गोळ्या घालण्याचे आदेश देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची आणि तरुणांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करुन अंतर्गत लवकरच निवडणुका घेण्याची मागणी केली जात आहे.
Gen Z समोर नतमस्तक झाले नेपाळचे सरकार! २१ तरुणांच्या मृत्यूनंतर हटवली सोशल मीडियावरील बंदी






