
US Iran Nuclear Talks
ट्रम्प बॅकफुटवर! खामेनेईंच्या एका इशाऱ्याने तडजोडीच्या अटी केल्या कमी, इराणसमोर झुकला अमेरिका?
मिळालेल्या माहितीनुसार, ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी तुर्कीमध्ये अमेरिका इराण अणु चर्चा सुरु होणार आहे. या चर्चेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे खास दूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची उपस्थित राहणार आहे. याशिवाय या बैठकीत कतार, इजिप्त, तुर्की, सौदी, यूएई या देशांचे प्रादेशिक प्रतिनिधी देखाली उपस्थित राहतील. या चर्चेचा उद्देश मध्यपूर्वेतील प्रादेशिक धोका कमी करणे आणि इराणच्या अणुप्रक्रियेवरील वाद सोडवणे आहे. ही चर्चा जागतिक शांततेसाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे.
ट्रम्प यांच्या कठोर अटी
परंतु ट्रम्प यांनी इराणसमोर अत्यंत कठोर अटी ठेवल्या आहे. या अटींमध्ये इराणला आपला युरेनियमचा साठा समृद्ध करणे थांबवायचे आहे, तसेच बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे मर्यादित करायची आहेत.हमास, हिजबुल्लाह यांसारख्या प्रादेशिक गटांचा पाठिंबा देखील बंद करण्यास ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
याच वेळी इराणनेही स्पष्ट केले आहे की, इराणवरील निर्बंध हटवल्यास चर्चेसाठी त्यांची तयारी आहे. परंतु या अटी केवळ त्यांच्या सार्वभौमत्वासाठी मान्य केल्या जातील असे इराणने म्हटले आहे. तसेच इराणवर यासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव निर्माण केला जाऊ नये हेही स्पष्ट करण्यात आले आह. याच वेळी इराणच्या अधिकाऱ्यांनी अमेरिकेला अरबी समुद्रातून नौदल ताफा मागे घेण्याचीही मागणी केली आहे.
२०१५ मध्ये इराण, अमेरिका आणि आणि सहा युरोपीय देशांमध्ये त्यांच्या अणु प्रकल्पांवर करार झाला होता. या करारांतर्गत इराणला त्यांची अणुशस्त्रे विकसित करण्यापासून रोखण्यात आले होते. परंतु अमरिकेने २०१८ मध्ये या करारातून माघार घेतली आणि इराणने करारातील अटींचे पालन करणे थांबवले. यानंतर इराणच्या अणु कार्यक्रमाला वेग आला. यामुळे सध्या पुन्हा इराणवर निर्बंध लादण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण परिस्थिती बिघडत चालली आहे. इराण आपला अणु प्रकल्पात वाढ करत आहे.
Ans: ६ फेब्रुवारी २०२६ रोजी तुर्कीच्या इस्तंबूल येथे अमेरिका-इराण अणु चर्चा सुरु होणार आहे.
Ans: अमेरिका आणि इराणमधील अणु चर्चेत अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह वीटकॉफ, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची सहभागी होणार आहे. तसेच तुर्की, इजिप्त, सौदी अरेबिया, कतरा, यूएई यादेशांचे प्रतिनिधीही उपस्थित राहतील,
Ans: अमेरिका-इराण अणु चर्चेमुळे मध्यपूर्वेत संभाव्य युद्धाचा धोका टळले. तसेच या चर्चेत इराणच्या अणुकार्यक्रमावर तोडगा निघाल्यास जागतिक शांतता व सुरक्षिततेसाठी सकारात्मक दिशा मिळेल. यामुळे ही चर्चा अत्यंत महत्वाची मानली जात आहे.