Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Helicopter Crash: केनियामध्ये भीषण हेलिकॉप्टर अपघात; इक्वेडोरच्या गुप्तचर प्रमुखांसह 5 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू

केनियामध्ये आणखी एक मोठा हेलिकॉप्टर अपघात झाला असून, त्यात देशाच्या गुप्तचर प्रमुखांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात पाच अमेरिकन नागरिकही ठार झाले. गेल्या सहा महिन्यांत केनियामधील हा दुसरा हेलिकॉप्टर अपघात आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 20, 2026 | 03:43 PM
Ecuador intelligence chief Michele Sensi-Contugi

Ecuador intelligence chief Michele Sensi-Contugi

Follow Us
Follow Us:
  • केनियात भीषण हेलिकॉप्टर दुर्घटना
  • इक्वेडोरचे गुप्तचर प्रमुख अन् ५ अमेरिकन ठार
  • कारण अस्पष्ट, उच्चस्तरीय तपास सुरू

पूर्व आफ्रिकेतील (african country) केनिया देशात एका भीषण हेलिकॉप्टर अपघातामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. राजधानी नैरोबीच्या उत्तरेस असलेल्या सांबुरू काउंटीमधील प्रसिद्ध ‘ओलोलोकवे’ पर्वताच्या (Mount Ololokwe) पायथ्याशी एक पर्यटक हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्दैवी दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील पायलटसह सर्व सात जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये लॅटिन अमेरिकन देश इक्वेडोरचे गुप्तचर प्रमुख मिशेल सेन्सी-कॉन्टुगी (Michele Sensi-Contugi), त्यांची पत्नी आणि पाच अमेरिकन नागरिकांचा समावेश असल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे युरोकॉप्टर EC130 B4 बनावटीचे हेलिकॉप्टर ‘लोइसाबा वन्यजीव अभयारण्यातून’ (Loisaba Conservancy) उड्डाण करून प्रवाशांना हवाई सफर घडवत होते. सकाळी सुमारे ९:१३ वाजता ओलोलोकवे पर्वताजवळ अचानक हेलिकॉप्टरचा नियंत्रण सुटले आणि ते जमिनीवर कोसळले. कोसळल्यानंतर हेलिकॉप्टरला भीषण आग लागली आणि संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे २,००० मीटर उंचीवर असून अत्यंत दुर्गम आणि खडकाळ भाग असल्याने बचाव पथकांना पोहोचण्यात सुरुवातीला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा ‘गुप्त मार्ग’; इराणी सैन्याला चकवून दररोज लाखो बॅरल तेलाची जागतिक बाजारात निर्यात

इक्वेडोरच्या राष्ट्राध्यक्षांचे अत्यंत जवळचे सहकारी

या अपघातात मृत्यू झालेले ४२ वर्षीय मिशेल सेन्सी-कॉन्टुगी हे इक्वेडोरच्या राष्ट्रीय गुप्तचर केंद्राचे (CINI) महासंचालक होते. इक्वेडोरचे उजव्या विचारसरणीचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांचे ते अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जात असत. नोबोआ यांनी ड्रग्ज कार्टेल्स आणि संघटित गुन्हेगारीविरोधात उभारलेल्या आक्रमक लढ्यात मिशेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. इक्वेडोरचे परिवहन मंत्री रॉबर्टो लुके यांनी सोशल मीडियावर या वृत्ताला दुजोरा देत मिशेल आणि त्यांच्या पत्नी स्टेफनी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. मिशेल आपल्या पत्नीसोबत केनियात पर्यटनासाठी गेले होते.

दुसरीकडे, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने (US State Department) देखील आपल्या ५ नागरिकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. यामध्ये अमेरिकेतील प्रमुख स्पॅनिश-भाषी टीव्ही नेटवर्क ‘टेलिमुंडो’चे (Telemundo) फ्लोरिडा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक जोस अल्बर्टो सुआरेझ (José Alberto Suárez) यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. एनबीसीयुनिव्हर्सल (NBCUniversal) आणि टेलिमुंडोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे जोस यांच्या निधनाबद्दल तीव्र दुखः व्यक्त केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sergio Gor: काश्मीरबाबत अमेरिकेची मोठी घोषणा; ‘जम्मू-काश्मीर भारताचाच भाग’ सर्जिओ गोर यांच्या विधानाने पाकिस्तानात खळबळ

विमान अपघात तपास विभागाकडून चौकशी सुरू

केनिया नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाचे (KCAA) संचालक आणि ‘विमान अपघात तपास विभागा’चे (AAID) प्रमुख फ्रेडरिक काबुंगे यांनी सांगितले की, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड, हवामानातील बदल की अन्य काही कारणामुळे हा अपघात झाला, याचा शोध घेतला जात आहे. अपघातस्थळाचे कठीण भौगोलिक स्थान, दाट अंधार आणि लागलेली आग यामुळे केनिया रेड क्रॉस आणि स्थानिक पोलीस प्रशासनाला बचाव व मदतकार्यात मोठा संघर्ष करावा लागला.

केनियामध्ये पर्यटनासाठी हेलिकॉप्टर हवाई सफारी अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत केनियात झालेल्या या सलग हेलिकॉप्टर दुर्घटनांमुळे हवाई प्रवासाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०२६ मध्ये देखील पश्चिम केनियामध्ये झालेल्या अशाच एका हेलिकॉप्टर अपघातात एका खासदारासह ६ जणांचा जीव गेला होता. सध्या केनिया सरकार, एफबीआय आणि आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणा या दुर्दैवी दुर्घटनेचा सखोल तपास करत आहेत.

Web Title: Kenya helicopter crash ecuador intelligence chief michele sensi contugi dead marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • african country
  • Plane Crash
  • World news

संबंधित बातम्या

Strait Of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा ‘गुप्त मार्ग’; इराणी सैन्याला चकवून दररोज लाखो बॅरल तेलाची जागतिक बाजारात निर्यात
1

Strait Of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा ‘गुप्त मार्ग’; इराणी सैन्याला चकवून दररोज लाखो बॅरल तेलाची जागतिक बाजारात निर्यात

Evergrande: चीनमधील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट घोटाळ्यात ऐतिहासिक निकाल; एव्हरग्रांडे कंपनीवर 24,000 कोटींचा दंड; फाउंडरना जन्मठेप
2

Evergrande: चीनमधील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट घोटाळ्यात ऐतिहासिक निकाल; एव्हरग्रांडे कंपनीवर 24,000 कोटींचा दंड; फाउंडरना जन्मठेप

Mohan Bhagwat: ‘RSS नेत्यांचा सन्मान करू नका!’ अमेरिकेच्या सल्लागार आयोगाचे वादग्रस्त वक्तव्य; भारतीय परराष्ट्र मंत्रालय आक्रमक
3

Mohan Bhagwat: ‘RSS नेत्यांचा सन्मान करू नका!’ अमेरिकेच्या सल्लागार आयोगाचे वादग्रस्त वक्तव्य; भारतीय परराष्ट्र मंत्रालय आक्रमक

Prince Harry: ब्रिटिश राजघराण्यात मोठा ट्विस्ट; 6 वर्षांनंतर प्रिन्स हॅरी-मेगनचे ब्रिटनमध्ये पुनरागमन; मुलांसाठीही मोठा निर्णय
4

Prince Harry: ब्रिटिश राजघराण्यात मोठा ट्विस्ट; 6 वर्षांनंतर प्रिन्स हॅरी-मेगनचे ब्रिटनमध्ये पुनरागमन; मुलांसाठीही मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.