
Khaleda Zia Funeral
पाकिस्तानने देखील खालिदा झिया (Khaleda Zia) यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी म्हटले आहे की, आम्ही खालिदा झिया यांच्या यांच्या निधनाबद्दल शोख व्यक्त करतो. परंतु पाकिस्तानमधून कोणता वरिष्ठ अधिकारी किंवा नेता खालिदा झिया यांच्या अत्यंस्काराला उपस्थित राहणार नसल्याचे म्हटले जात आहे.
बांगलदेशमध्ये शेख हसीनाचे सरकार पडल्यानंतर पाकिस्तानशी संबंध मजबूत झाले आहेत. परंतु पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर किंवा परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्यापैकी कोणीती खालिदा झिया यांच्या दफन विधीला जाणार नाही. फक्त पाकिस्तानचे राष्ट्रीय असेंब्लीचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक बुधवारी (31 डिसेंबर 2025) ढाक्याला खालिदा झिया यांच्या अत्यसंस्कारात पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
Heartfelt condolences on the sad demise of Begum Khaleda Zia, former Prime Minister of Bangladesh and Chairperson, Bangladesh Nationalist Party (BNP). May Allah SWT grant her high place in Jannah and patience to the bereaved family. Ameen.🤲 pic.twitter.com/aiJITyhzlW — Ishaq Dar (@MIshaqDar50) December 30, 2025
खालिदा झिया यांच्या निधनाने बांगलादेशात शोककळा परसली आहे. बांगलादेश नॅशनल पार्टीने सात दिवसांची शोकसभा जाहीर केली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबावरही शोककळा पसरली आहे. खालिदा झिया यांच्या निधनाने त्यांचा मुलगा तारिक रहमान अत्यंत भावूक झाले आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की,
माझी आई आणि BNP अध्यक्षा बेगम खालिदा झिया, अल्लाहची हाक ऐकत आज आपल्याला सोडून गेल्या आहेत. त्यांनी म्हटले की, त्या केवळ एक राजकीयनेत्या नव्हत्या तर लोकशाहीच्या जननी होत्या. त्या बांगलादेशची आई म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांनी आपले जीवन पूर्णपणे देशाच्या लोकशाही व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी दिले. त्यांनी हुकूमशाही आणि दजपशाहीविरोधात तीव्र संघर्ष केला. रहमान यांनी त्यांच्या आईचे प्रेम सौम्य आणि त्या धाडसी होत्या असे म्हटले.
My mother, BNP Chairperson Begum Khaleda Zia, has responded to the call of Almighty Allah and left us today. Inna lillahi wa inna ilayhi raji’un (Indeed, we belong to Allah, and to Him we shall return). To many, she was the leader of the nation, an uncompromising leader, the… pic.twitter.com/bLsEtzYWgi — Tarique Rahman (@trahmanbnp) December 30, 2025
Khaleda Zia Death : खालिदा झिया यांना पतीच्या कबरीजवळ करण्यात येणार दफन; ७ दिवसांचा शोक जाहीर