Khaleda Zia Death : खालिदा जिया यांना पतीच्या कबरीजवळ करण्यात येणार दफन; ७ दिवसांचा शोक जाहीर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारत बांगलादेश संबंधात पुन्हा तणाव! ढाक्याने उच्चायुक्तांना तातडीने बोलावले, कारण काय?
सध्या ढाकासह अनेक शहरांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या दु:खद काळात बीएनपीने देशभरात खालिदा झिया यांच्या स्मरणार्थ सात दिवसांचा अधिकृत शोकसभा जाहीर केली आहे. तसेच अंतरिम सरकारचे मोहम्मद युनूस यांनी देखील यावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. दरम्यान बीएनपी पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (३१ डिसेंबर) खालेदा झिया यांना ढाकाच्या संसद संकुलाजवळ दफन केले जाणार आहे. त्यांचे पती आणि माजी राष्ट्रपती झियाउर रहमान यांच्या समाधीजवळ त्यांना दफन केले जाईल असे बीएनपीने म्हटले आहे.
खालिदा झिया गेल्या काही आठवड्यांपासून रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होत्या. त्या छातीत संसर्ग, यकृत, मूत्रपिंड, मधूमेह, संधिवात आणि डोळ्यांच्या आजारांनी ग्रस्त होत्या. त्यांच्या उपचारासाठी एक विशेष पथक बोलावण्यात आले होते. परंतु मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
खालेदा झिया यांनी १९९१ ते १९९६ आणि २००१ ते २००२६ या काळात दोन वेळा बांगलादेशचे पंतप्रधान पद भूषणवले होते. त्या शेख हसीनांच्या कट्टर विरोधकही मानल्या जायच्या. दोन्ही महिल्या नेत्यांमधील लढाईला बेगमांची लढाई म्हटले जायचे. सत्तेत असताना खालिदा झिया या त्यांच्या कठोर राजनैतिक भूमिकेसाठी ओळखल्या जायच्या. दरम्यान त्यांच्या निधनाने बांगलादेश राजकारणातील बेगमांचे युद्ध आता अधिकृतपणे संपले आहे.
निवडणूकांवर होणार परिणाम ?
फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांवर खालिदा झिया यांच्या निधनाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाने बांगलादेशच्या निवडणूक प्रक्रियेत बदल होऊ शकतात. सध्या त्यांच्या पक्षाचे नेतृत्व त्यांचा मुलगा तारिक रहमान यांच्या हाती आहे. तारिक रहमान बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत. सध्या हसीना यांच्या निधनाने बीएनपी पक्षात दु:खाचे वातावरण पसरले आहे.
Ans: खालिदा झिया यांनी मंगळवारी ३० डिसेंबर २०२५ रोजी ढाक्याच्या एव्हरकेअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या ८० वर्षाच्या होत्या.
Ans: खालिदा झिया गेल्या काही आठवड्यांपासून रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होत्या. त्या छातीत संसर्ग, यकृत, मूत्रपिंड, मधूमेह, संधिवात आणि डोळ्यांच्या आजारांनी ग्रस्त होत्या.






