Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराणवर राज्य करू शकतात राजघराण्यातील ‘या’ 3 कन्या; रझा पहलवी यांच्या सुंदर मुली राजकीय केंद्रस्थानी

Reza Pahlavi daughters leads : इस्रायलविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणमधील सत्तास्थिती ढासळताना दिसत आहे. देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची सत्ता धोक्यात आली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 19, 2025 | 12:51 PM
Khamenei's rule is at risk if toppled Reza Pahlavi's daughters may lead Iran

Khamenei's rule is at risk if toppled Reza Pahlavi's daughters may lead Iran

Follow Us
Close
Follow Us:

Reza Pahlavi daughters leads : इस्रायलविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणमधील सत्तास्थिती ढासळताना दिसत आहे. देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची सत्ता धोक्यात आली असून, आता जगभरात एकच प्रश्न चर्चेत आहे.  यांच्यानंतर इराणवर कोण राज्य करणार? या प्रश्नाचे संभाव्य उत्तर म्हणजे इराणच्या माजी शाह रेझा पहलवी यांच्या तीन कन्या, ज्या सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकीय चर्चेचा विषय ठरत आहेत.

रझा पहलवी – शाह वंशाचा वारस

मोहम्मद रेझा पहलवी हे १९७९ पर्यंत इराणचे शाह होते. त्यांच्या पदच्युतीनंतर रझा पहलवी यांनी देशाबाहेरून इस्लामिक रिपब्लिकविरोधात लढा सुरू ठेवला. सध्या ते अमेरिकेत राहत असून, इराणमध्ये लोकशाही, मानवी हक्क आणि स्त्री-पुरुष समानतेच्या मूल्यांसाठी काम करत आहेत. त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे की त्यांच्या तीन मुलीच त्यांच्या उत्तराधिकारी असतील.

नूर पहलवी – सोशल मीडिया स्टार आणि गुंतवणूकतज्ज्ञ

रझा पहलवी यांची ज्येष्ठ कन्या नूर पहलवी (३३ वर्षांची) ही सध्या न्यू यॉर्कमध्ये राहत असून, ‘सोफ्रेह कॅपिटल’ या गुंतवणूक संस्थेत प्राचार्य म्हणून काम करत आहे. तिने जॉर्जटाउन विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवी आणि कोलंबिया बिझनेस स्कूलमधून एमबीए केले आहे. नूर ही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असून, इंस्टाग्रामवर तिचे १ दशलक्षहून अधिक फॉलोअर्स आहेत. आधुनिक विचारसरणी, राजकीय सजगता आणि नेतृत्वगुणांमुळे तिला भावी इराणसाठी एक शक्तिशाली पर्याय मानले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-Canada Relations: CSIS अहवालातून धक्कादायक उघड! कॅनडामधून रचले जात आहेत भारतविरोधी हिंसाचाराचे कट

इमान पहलवी – आधुनिक जीवनशैली आणि अंतरधर्मीय विवाह

दुसरी कन्या इमान पहलवी (३२ वर्षांची) ही अमेरिकन एक्सप्रेस या बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहे. इमानने नुकतेच ब्रॅडली शेरमन या ज्यू व्यावसायिकाशी पॅरिसमध्ये विवाह केला आहे. दोघे २०१७ पासून एकत्र होते आणि २०२३ मध्ये त्यांच्या साखरपुड्याची घोषणा करण्यात आली होती. इमानचा विवाह हा मुक्त विचार आणि धार्मिक सहिष्णुतेचे प्रतिक मानला जात आहे.

फराह पहलवी – तरुण पिढीतील आशा

सर्वात धाकटी मुलगी फराह पहलवी-२ (२१ वर्षांची) ही वॉशिंग्टन येथे जन्मलेली असून सध्या तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करत आहे. याबाबत तिची भूमिका अद्याप सार्वजनिक नाही, परंतु तीही भावी राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

इस्लामिक रिपब्लिक विरोधात क्रांतीचे संकेत?

इराणमध्ये इस्लामिक शासनव्यवस्थेविरोधात असंतोष वाढत चालला आहे. खमेनी यांच्या पुतण्यानेही इस्लामिक रिपब्लिक संपवण्याचे समर्थन केले आहे. अमेरिकेतील निर्वासित रझा पहलवी यांनीही वेळोवेळी खमेनी यांच्यावर टीका केली आहे. देशात युद्धाच्या काळात जनतेचा संयम सुटत असून, अनेकांना राजघराण्याच्या पुनर्स्थापनेची आशा आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran-Israel War : ते करत विनाशकारी हल्ल्याची तयारी? अरक अणुभट्टी रिकामी करण्याचा इस्रायली सैन्याचा इराणींना इशारा

पहलवी घराण्याच्या कन्यांचा उदय

आज जेव्हा इराण एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे, तेव्हा पहलवी घराण्याच्या कन्यांचा उदय एक नवे पर्व सुरू करू शकतो. लोकशाही, मानवी हक्क आणि आधुनिकतेच्या बाजूने उभ्या असलेल्या या तीन महिलांमुळे इराणच्या राजकारणात मोठा बदल घडू शकतो. रझा पहलवी यांचा विश्वास आणि त्यांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता त्यांच्या मुलींवर आहे.

Web Title: Khameneis rule is at risk if toppled reza pahlavis daughters may lead iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2025 | 12:51 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Iran News
  • Iran-Israel War

संबंधित बातम्या

Iran Vs Israel War: युद्धाचा भडका उडणार! इस्त्रायल इराणचा गेम करणार; ‘या’ धमकीने घाबरले खामेनी
1

Iran Vs Israel War: युद्धाचा भडका उडणार! इस्त्रायल इराणचा गेम करणार; ‘या’ धमकीने घाबरले खामेनी

SCO Summit Tianjin Proposal : इराणची ‘नवीन NATO’ रणनीती! चीन-रशियाच्या पाठिंब्याने इस्रायल-अमेरिकेला देणार टक्कर
2

SCO Summit Tianjin Proposal : इराणची ‘नवीन NATO’ रणनीती! चीन-रशियाच्या पाठिंब्याने इस्रायल-अमेरिकेला देणार टक्कर

पुन्हा युद्धाची ठिणगी पेटणार? बेंजामिन नेतन्याहूंचा गुप्त डाव उघड, इस्रायल-इराण युद्धावर सर्वात मोठा खुलासा
3

पुन्हा युद्धाची ठिणगी पेटणार? बेंजामिन नेतन्याहूंचा गुप्त डाव उघड, इस्रायल-इराण युद्धावर सर्वात मोठा खुलासा

आता पुन्हा खदखदू लागलं इराण-इस्रायल युद्ध! इस्रायली ब्लूप्रिंट तयार, काय असणार पहिले लक्ष्य?
4

आता पुन्हा खदखदू लागलं इराण-इस्रायल युद्ध! इस्रायली ब्लूप्रिंट तयार, काय असणार पहिले लक्ष्य?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.