Kumbh Mela 2025 Turkey woman experienced Mahakumbh
अंकारा: पौष पौर्णिमेच्या पहिल्या स्नानाने सोमवारपासून महाकुंभाची सुरुवात होत आहे. महाकुंभासाठी देश-विदेशातून लाखो भाविक येण्याची अपेक्षा असताना, संगमच्या काठावर असलेल्या घुमट आणि तंबूच्या शहरात राहण्याची स्पर्धा देखील सुरू आहे, जी लाखो रुपयांना भाड्याने दिली जाते. महाकुंभचा उत्सव फक्त भारतापुरताच मर्यादित राहिलेले नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला आहे. यंदा तुर्कीतील पिनार या मुस्लिम महिला महाकुंभात सहभागी झाल्या आहेत. त्यांनी भारतीय संस्कृती व परंपरांचा जवळून अनुभव घेतला.
अविस्मरणीय अनुभव
पिनार यांनी प्रयागराजच्या पवित्र संगमात स्नान केले, तिलक लावला आणि सनातन धर्माच्या आध्यात्मिक वाटेवर चालण्याचा अनुभव घेतला. पिनार यांनी आपल्या अनुभवाबद्दल सांगताना म्हटले की, त्यांनी महाकुंभाबद्दल पहिल्यांदा त्यांच्या मित्रांकडून ऐकले होते. याशिवाय, भारताला भेट देण्याची त्यांची इच्छा बऱ्याच काळापासून होती. महाकुंभाचा दिव्य व भव्य संगम पाहून त्या भारावून गेल्या. त्यांनी गंगा स्नान आणि संगमाच्या पवित्र रेतावर चालण्याचा अनुभव अविस्मरणीय असल्याचे नमूद केले.
भारताची परंपरा जाणून घेण्याची संधी
महाकुंभ मेळावा हा पिनार यांच्या दृष्टीने केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक प्रवास ठरल्याचे त्यांनी म्हटले. पिनार यांनी स्नान, ध्यान आणि तिलक लावून सनातर धर्माबद्द आदर व्यकत केला. त्यांनी म्हटले की, महाकुंभाचा अद्वितीय वातावरण भारतीय परंपरांची गती व खोली समजून घेण्याची संधी प्रदान करतो. हा अनुभव जागतिक स्तरावर भारताच्या वैविध्यपूर्ण परंपरा आणि श्रद्धेची ओळख करून देतो.
कडक सुरक्षा व्यवस्था
महाकुंभ 2025 च्या विशाल आयोजनासाठी सुरक्षा व्यवस्खेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. उत्तर प्रदेश पोलीस, कुंभ मेळा पोलीस, एनएसजी, एटीएस, एनडीआरएफ यांसारख्या सुरक्षा दलांनी एकत्रित मॉक ड्रिलद्वारे आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे. 11 जानेवारीला प्रयागराज येथील बोट क्लबवर मोठ्या प्रमाणावर मॉक ड्रिल पार पडली.
सुरक्षा एजन्सींच्या या प्रयत्नांमुळे महाकुंभ दरम्यान भाविकांसाठी सुरक्षित आणि सुव्यवस्थित वातावरण निर्माण होईल. महाकुंभातील पिनारसारख्या परदेशी भाविकांचा अनुभव या आयोजनाच्या जागतिक महत्त्वावर अधोरेखित करतो. महाकुंभ केवळ धार्मिक सोहळा नसून, तो भारतीय संस्कृतीचा एक अद्वितीय ठेवा आहे. विविध देशांतील लोकांना एकत्र आणून तो श्रद्धा व संस्कृतीच्या गाठी घट्ट करतो.