Trump 2026: मैत्री की गळ्याचा फास? ट्रम्प यांनी पुन्हा काढली पाकिस्तानची लायकी; 'एका' विधानाने जागतिक स्तरावर फजिती ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Donald Trump speech on India-Pakistan war 2026 : राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा मित्र नसतो, याचा प्रत्यय सध्या पाकिस्तानला येत आहे. ज्या डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर पाकिस्तानने (Pakistan) स्तुतिसुमने उधळली होती, त्याच ट्रम्प यांनी आता भर सभेत पाकिस्तानचा असा अपमान केला आहे की, शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) सरकारला तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. अमेरिकन काँग्रेसच्या विशेष अधिवेशनात बोलताना ट्रम्प यांनी दावा केला की, भारत आणि पाकिस्तानमधील संभाव्य अण्वस्त्र युद्ध त्यांनीच रोखले आणि जर त्यांनी हस्तक्षेप केला नसता, तर पाकिस्तानी पंतप्रधानांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता.
काही महिन्यांपूर्वी भारत आणि पाकिस्तानमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान प्रचंड तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी पाकिस्तानने धास्तावून वॉशिंग्टनकडे मदतीसाठी धाव घेतली होती. एप्रिल-मे महिन्यात ट्रम्प यांनी शाहबाज शरीफ यांचे “चांगला माणूस” म्हणून वर्णन केले होते, ज्यामुळे पाकिस्तानला वाटले की अमेरिका त्यांच्या पाठीशी उभी आहे. मात्र, आता ट्रम्प यांनी त्याच घटनेचा उल्लेख करून पाकिस्तानच्या लष्करी ताकदीची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Threat: आता ‘पाकिस्तान’ इस्रायलच्या निशाण्यावर; ‘इस्लामिक अणुबॉम्ब’ नष्ट करण्यासाठी ज्यू राष्ट्राचा महाभयंकर प्लॅन
ट्रम्प यांनी काँग्रेसमध्ये आपल्या कामगिरीची यादी वाचून दाखवताना सांगितले की, त्यांनी गेल्या १० महिन्यांत ८ संभाव्य युद्धे रोखली आहेत. कंबोडिया आणि थायलंडच्या वादासोबतच त्यांनी भारत-पाकिस्तान संघर्षाचा उल्लेख केला. ते म्हणाले, “हा केवळ दोन देशांमधील वाद नव्हता, तर ते अण्वस्त्रांचे युद्ध ठरू शकले असते. अनेकांना हे ठाऊक आहे की, जर अमेरिकेने वेळीच पाऊल उचलले नसते, तर आज परिस्थिती वेगळी असती आणि कदाचित पाकिस्तानी पंतप्रधान जिवंतही नसते.”
#WATCH | Addressing the 2026 State of the Union, United States President Donald Trump says, “… In my first 10 months, I ended eight wars… Pakistan and India would have had a nuclear war. 35 million people said the Prime Minister of Pakistan would have died if it were not for… pic.twitter.com/GnrgJKtjID — ANI (@ANI) February 25, 2026
credit – social media and Twitter
ट्रम्प यांच्या या एका विधानामुळे पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेचे धिंडवडे निघाले आहेत. ज्या देशाचे लष्कर स्वतःला जगातील शक्तिशाली सैन्य मानते, त्यांच्या पंतप्रधानांच्या जीवाला एका परकीय शक्तीने वाचवले, असा दावा करणे हा पाकिस्तानसाठी सर्वात मोठा राजनैतिक अपमान आहे. यामुळे पाकिस्तानी लष्कर (Establishment) प्रचंड संतापले असून, शाहबाज शरीफ यांच्यावर टीका होत आहे की त्यांनी अमेरिकेला इतकी मोकळीक का दिली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : UK Election: ब्रिटनच्या निवडणुकीत PM मोदींच्या फोटोवरून राडा; ‘ग्रीन पार्टी’वर गंभीर आरोप; हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा प्रयत्न?
काही दिवसांपूर्वी ‘गाझा बोर्ड ऑफ पीस’च्या बैठकीत शाहबाज शरीफ यांनी अमेरिकेसोबतच्या सहकार्याचा पुनरुच्चार केला होता. त्यांना वाटले होते की ट्रम्प यांच्याशी जवळीक साधल्यास पाकिस्तानला आर्थिक आणि लष्करी मदत मिळेल. पण ट्रम्प यांनी मदतीच्या बदल्यात पाकिस्तानचे सार्वभौमत्वच चव्हाट्यावर आणले आहे. विश्लेषकांच्या मते, ट्रम्प यांची ही टिप्पणी पाकिस्तानला जागतिक स्तरावर ‘कमकुवत’ दाखवणारी आहे.
Ans: ट्रम्प यांनी दावा केला की, जर अमेरिकेने भारत-पाकिस्तान संघर्षात हस्तक्षेप केला नसता, तर अण्वस्त्रांच्या युद्धात पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा जीव गेला असता.
Ans: हे भारत आणि पाकिस्तानमधील अलीकडील लष्करी तणावाचे नाव आहे, ज्यावेळी पाकिस्तानने युद्धाच्या भीतीने अमेरिकेकडे मदतीची याचना केली होती.
Ans: यामुळे पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यांचा देश स्वतःच्या पंतप्रधानांचे रक्षण करण्यास असमर्थ आहे, असा जागतिक संदेश गेला आहे.






