Malaysia decides to send people to jail for missing Friday prayers
Malaysia News in Marathi : क्वालालंपूर : मलेशियाने (Malaysia) एक मोठा निर्णय घेतला आहे. मलेशियाच्या तेरेंगानु राज्यात नमाज अदा न केल्यास कठोर शिक्षेचा कायदा लागू करण्यात आला आहे. दर शुक्रवारी अदा होणाऱ्या नमाजचे पठण लोकांना करावे लागणार आहे. या नव्या नियमांनुसा कोणताही पुरुष अवैध कारणाने शुक्रवारी नमाजसाठी अनुउपस्थित राहिल्या त्याला तुरुंगवासाची शिक्षा आणि हजारो रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे.
सध्या या निर्णयावर आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका केली जात आहे. हा निर्णय मानवाधिकार हक्क्याच्या विरोधात असल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्येही इतके कठोर नियम नाहीत. यामुळे मलेशियावर जगभरातून तीव्र टीका केला जात आहे.
गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
सध्या मलेशियाच्या या निर्णयावर जगभरातून टिका केली जात आहे. तसेच मानवाधिकार संघटनांनी या निर्णयाला धक्कादायक आणि मानवी हक्कांचे उल्लंघन म्हटले आहे. आशियाच्या मानवाधिकार आणि कामगार वकिलांचे संचालक रॉबर्टसन यांनी देखील याला विरोध केला आहे. त्यांनी हा निर्णय धर्म स्वातंत्र्यावर परिणाम करणार म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्तीला धर्मावर विश्वास ठेवण्याच न ठेवण्याचा अधिकार आहे. रॉबर्टसन यांनी पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांना दंडात्मक नियम मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
पाकिस्तानमध्ये शुक्रवारच्या नमाजसाठी कोणतीही विशेष शिक्षा नाही. परंतु पैगंबरांचा अपमान किंवा कुराणचा अपमान केल्यास मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा किंवा १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. इशनिंदा कायद्याअंतर्गत ही शिक्षा दिली जाते.
तर दुसरीकडे सौदी अरेबियामध्ये गैर-मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी नमाजाची परवानगी नाही. तसेच मक्का आणि मदीनामध्ये पवित्र ठिकाणी प्रवेश करण्यासही मनाई आहे. तसेच धर्मांतर केल्यास मृत्यूदंड होऊ शकतो. इथे नमाज पठणावर कोणतीही शिक्षेची तरतुद नाही. सौदीमध्ये १०० टक्के नागरिक मुसलमान आहे. येथे शिराया कायद्याला सर्वोच्च मानले जाते. धर्माचे स्वातंत्र्य सौदीमध्ये नाही.