गाझात पसरतोय खतरनाक व्हायरस; लहान मुलांवर सर्वाधिक परिणाम, तीन महिन्यात मिळाले तब्बल इतके रुग्ण (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Gaza News marathi : गाझा पट्टी : इस्रायल आणि हमास युद्धाने (Israel Hamas War) सध्या गाझातील परिस्थिती अत्यंत बिकट केली आहे. येथील लोकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अन्न-पाणी, निवारा, वैद्यकीय सुविधा यांसारख्या लोकांना पायाभूत सुविधा मिळणेही कठीण झाले आहे. लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. परिस्थिती अत्यंत भयावह होत चालली आहे. यामुळे अनेक आजारा गाझामध्ये वेगाने पसरत आहे.
गाझाचे (Gaza) सर्वात भयानक वास्तव म्हणजे येथे उपासमारीमुळे, कुपोषमामुळे लहाना मुलांचा बळी जात आहे. लोकांना अर्धांगवायूसारखे गंभीर आजार होत आहे. सतत उपाशी राहण्यामुळे आणि पोषक अन्न न मिळाल्यामुळे लोकांमध्ये आवश्यक जीवनसत्वे कमी पडत आहे. याचा मोठा परिणाम गाझातील मुलांवर होत आहे.
गाझातील आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आता गाझामध्ये आणखी एक नवीन आजार पसरत आहे. गेल्या काही दिवसांपासून एक्यूट फ्लैसिड पॅरालिसिस (Acute Flaccid Paralysis) ची अनेक प्रकरणे नोंदवली आहेत. या दुर्मिळ आजारामुळे शरीराचे स्नायू कमकुवत होतात.
लोकांना श्वास घ्यायला, अन्न गिळायला त्रास होतो. सध्या गाझातील लोक या आजाराने त्रस्त आहेत. गाझातील आरोग्य तज्ज्ञांनी या संसर्गजन्य आजारासाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे. इस्रायलच्या हल्ल्यामुळे, बॉम्बस्फोटामुळे गाझातील सांडपाणी आणि स्वच्छतेवर परिणाम झाला आहे. यामुळे हा आजार पसरत असल्याचे म्हटले आहे.
पॉलिटिकोने दिलेल्या अहवालानुसार, २०२३ मध्ये युद्ध सुरु झाल्यापासून दरवर्षी १२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर गेल्या तीन महिन्यात १०० नवी प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या आजारावर डॉक्टरांना इलाजही सापडलेला नाही. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आजार सांडपाणी आणि घाणीतून पसरत आहे.
गाझातील खान युनूस भागात रस्त्यांवर घाणेरडे आणि सांडपाणी साचले आहे. येत्या काही काळात या आजारामुळे रुग्णांचा संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच गुलियन बार सिंड्रोमही वेगाने पसरत आहेत.
जागितक आरोग्य संघटनाने दिलेल्या अहवालानुसार, याचा सर्वात जास्त परिणाम १५ वर्षाखालील मुलांवर होत आहे. आतापर्यंत मुलांमध्ये ३२ प्रकरणे नोदंली गेली आहेत. कुपोषण आणि घाण यामुळे गाझातील लोकांचे जीवन अत्यंत बिकट झाले आहे. इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझामध्ये आरोग्य सेवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. WHO ने दिलेल्या माहितीनुसार, पोलिओच्या आजारातही ७०% वाढ झाली आहे. गुलियन बार सिंड्रोमची २२ प्रकरणे समोर आली आहेत.
गाझातील आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, Acute Flaccid Paralysis, पोलिओ, गुलियन बार सिंड्रोम यांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी ओषधेही उपलब्ध नाहीत. मानवी मदतही पोहोचणे अत्यंत कठीण झाले आहे.
हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…